एक्स्प्लोर

फडणीस घोटाळ्याची ईडीकडून चौकशी सुरु

नाशिक : नाशिकसह महाराष्ट्रात गाजलेल्या फडणीस घोटाळ्याची आता ईडीकडून चौकशी सुरु करण्यात आली आहे. नाशिक आर्थिक गुन्हे शाखेकडून याबाबत सर्व माहिती मागवण्यात आली आहे. पुण्यातील फडणीस ग्रुपचा सूत्रधार विनय फडणीसला नाशिक आर्थिक गुन्हे शाखेने  काल (21 एप्रिल) मुंबईतील विक्रोळीतून अटक केली. त्यानंतर त्याला कोर्टात हजर केले गेले. कोर्टाने विनय फडणीसला 29 एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. त्याला न्यायालयात आणताच गुंतवणूकदारांनी गर्दी करत त्याच्या विरोधात घोषणाबाजी देखील केली होती. मूळच्या पुण्यातील असलेल्या विनय फडणीस आणि फडणीस ग्रुपवर आजपर्यंत नाशिकमध्ये फसवणुकीचे एकूण 5 गुन्हे दाखल झाले आहेत. विशेष म्हणजे नाशिक शहरातूनच फडणीस ग्रुपविरोधात तब्बल 275 तक्रारी आर्थिक गुन्हे शाखेकडे प्राप्त झाल्या असून त्यानुसार आतापर्यत जवळपास 11 कोटी रूपयांचा घोटाळा झाल्याचं उघडकीस आले आहे. फडणीस ग्रुपवर गुन्हा दाखल होताच 6 महिन्यापासून या ग्रुपचा मुख्य सूत्रधार विनय फडणीस फरार होता. पोलिस त्याचा शोध घेत होते. अखेर पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार फडणीसला मुंबईतून अटक केली. फडणीस घोटाळ्याची व्याप्ती मोठी असून मागील 3 वर्षांपासून गुंतवणूकदारांना त्यांचे व्याज तसेच मुद्दल देखील मिळालेली नाही. फडणीस ग्रुपचे महाराष्ट्रातच 8000 च्या आसपास  गुंतवणूकदार असून नाशिकमध्येच 2500 गुंतवणूकदार आहेत. एकूण तब्बल 300 कोटींचा हा घोटाळा असण्याची शक्यता वर्तवली जाते आहे. पुण्यातील एक मोठ प्रस्थ म्हणून विनय फडणीस यांची ओळख असून बांधकाम, हॉटेल, रिअल इस्टेट मध्ये ते कार्यरत आहेत. फडणीस ग्रुपच्या विनय फडणीससह त्यांची पत्नी आणि नातेवाईकांवरही गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यांनाही अटक होण्याची शक्यता वर्तवली जाते आहे. अनेक महिन्यांपासून गुन्हे दाखल होऊनही विनय फडणीसला अटक होत नसल्याने गुंतवणूकदारांनी पोलिस आयुक्तालयातच आंदोलनही केले होते. मात्र, आता फडणीसला अटक होताच, विशेष पथकामार्फत या प्रकरणाची चौकशी करण्यात येणार असल्याचे पोलिस सांगत आहे. संबंधित बातमी : शेकडो लोकांची फसवणूक करणारा विनय फडणीस मुंबईतून अटक

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

संतोष देशमुखांना मारहाणीचा व्हिडिओ पाहण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपचं नाव 'मोकारपंती'; आरोपींच्या राक्षसी कृत्याचा खुलासा
संतोष देशमुखांना मारहाणीचा व्हिडिओ पाहण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपचं नाव 'मोकारपंती'; आरोपींच्या राक्षसी कृत्याचा खुलासा
मंत्रिपदावर असूनही नितेश राणेंचे भडकाऊ अन् द्वेषपूर्ण भाषण, संविधान पाळत नाही; असीम सरोदेंकडून कायदेशीर नोटीस
मंत्रिपदावर असूनही नितेश राणेंचे भडकाऊ अन् द्वेषपूर्ण भाषण, संविधान पाळत नाही; असीम सरोदेंकडून कायदेशीर नोटीस
Rohit Sharma : रोहित शर्मानं न्यूझीलंड विरुद्ध मोठा डाव खेळला, वरुण चक्रवर्तीच्या जाळ्यात किवी फलंदाजांची दैना 
रोहित शर्माचा विश्वास सार्थ ठरवला, वरुणनं जाळं टाकलं अन् मायदेशातील पराभवाचा वचपा काढला 
पुण्यात तब्बल 10 कोटींच लाल चंदन पकडलं, कंटेनरसह चालक ताब्यात; सिंडीकेट मेंबर पुष्पाचा शोध सुरू
पुण्यात तब्बल 10 कोटींच लाल चंदन पकडलं, कंटेनरसह चालक ताब्यात; सिंडीकेट मेंबर पुष्पाचा शोध सुरू
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Lahore Fort Special Report |'माझा'वर लाहोर किल्यावरचा रिपोर्ट,रघुनाथराव पेशव्यांनी भेट दिल्याची नोंदSpecial Report | Budget Session 2025 |  विरोधक रान उठवणार, सरकारची कोंडी करणार?Uddhav Thackeray Group On Eknath Shinde | आमचा पक्ष चोरला, तुमच्या बापाची प्रॉपर्टी आहे का? ठाकरेंचे शिलेदार कडाडले..Special Report | Mobile Recharge Fraud | रिचार्जचा फंडा, अनेकांना गंडा; मोबाईल रिचार्जचा नवीन स्कॅम?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
संतोष देशमुखांना मारहाणीचा व्हिडिओ पाहण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपचं नाव 'मोकारपंती'; आरोपींच्या राक्षसी कृत्याचा खुलासा
संतोष देशमुखांना मारहाणीचा व्हिडिओ पाहण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपचं नाव 'मोकारपंती'; आरोपींच्या राक्षसी कृत्याचा खुलासा
मंत्रिपदावर असूनही नितेश राणेंचे भडकाऊ अन् द्वेषपूर्ण भाषण, संविधान पाळत नाही; असीम सरोदेंकडून कायदेशीर नोटीस
मंत्रिपदावर असूनही नितेश राणेंचे भडकाऊ अन् द्वेषपूर्ण भाषण, संविधान पाळत नाही; असीम सरोदेंकडून कायदेशीर नोटीस
Rohit Sharma : रोहित शर्मानं न्यूझीलंड विरुद्ध मोठा डाव खेळला, वरुण चक्रवर्तीच्या जाळ्यात किवी फलंदाजांची दैना 
रोहित शर्माचा विश्वास सार्थ ठरवला, वरुणनं जाळं टाकलं अन् मायदेशातील पराभवाचा वचपा काढला 
पुण्यात तब्बल 10 कोटींच लाल चंदन पकडलं, कंटेनरसह चालक ताब्यात; सिंडीकेट मेंबर पुष्पाचा शोध सुरू
पुण्यात तब्बल 10 कोटींच लाल चंदन पकडलं, कंटेनरसह चालक ताब्यात; सिंडीकेट मेंबर पुष्पाचा शोध सुरू
अधिवेशनाच्या आदल्यादिवशी मुख्यमंत्र्‍यांकडून धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावर भाष्य; अण्णा हजारेंबद्दलही बोलले
अधिवेशनाच्या आदल्यादिवशी मुख्यमंत्र्‍यांकडून धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावर भाष्य; अण्णा हजारेंबद्दलही बोलले
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 03 मार्च 2025 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 03 मार्च 2025 | रविवार
Rohini Khadse : CM फडणवीस म्हणाले ते विशिष्ट पक्षाचे; रोहिणी खडसेंनी दिले पुरावे, ते शिंदेंच्या शिवसेना आमदाराचेच कार्यकर्ते
CM फडणवीस म्हणाले ते विशिष्ट पक्षाचे; रोहिणी खडसेंनी दिले पुरावे, ते शिंदेंच्या शिवसेना आमदाराचेच कार्यकर्ते
Video : मी तिथं आले ना धिंगाणा करेन, ती माझी पोरगीय; मुलीच्या छेडप्रकरणी रक्षा खडसेंनी फोनवरुन झापलं, क्लीप व्हायरल
Video : मी तिथं आले ना धिंगाणा करेन, ती माझी पोरगीय; मुलीच्या छेडप्रकरणी रक्षा खडसेंनी फोनवरुन झापलं, क्लीप व्हायरल
Embed widget