एक्स्प्लोर

Sai Resort Dapoli:  दापोलीतील साई रिसॉर्टवर ईडीकडून जप्तीची कारवाई; अनिल परब यांचा संबंध असल्याचा आरोप

Sai Resort Dapoli:  दापोली येथील साई रिसॉर्ट ईडीने जप्त केले आहे. शिवसेना ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांचे निकटवर्तीय सदानंद कदम यांच्या मालकीचे हे रिसॉर्ट आहे. मनी लाँड्रिंग प्रकरणात अनिल परब हेच सूत्रधार असल्याचा आरोप ईडीचा आहे.

Sai Resort Dapoli:  अंमलबजावणी संचालनालयानं (ED) आज मोठी कारवाई केली आहे. ईडीने दापोली येथील साई रिसॉर्ट (Sai Resort Dapoli) जप्त केले आहे. मनी लॉंड्रिंग प्रकरणी ईडीकडून ही तात्पुरत्या जप्तीची कारवाई करण्यात आली आहे. सीरआरझेड कायद्याचे उल्लंघन करून या रिसॉर्टचे बांधकाम करण्यात आल्याचा आरोप आहे. रिसॉर्टच्या बांधकामासाठी मनी लाँड्रिंग झाल्याचा संशय ईडीला आहे. ईडीने हायकोर्टात या प्रकरणी आरोपपत्र दाखल केले आहे.

ईडीने जवळपास 10.20 कोटी रुपये किंमतीची मालमत्ता तात्पुरती जप्त केली आहे. यामध्ये दोन कोटी 73 लाख 91 हजार रुपये किंमतीची  जवळपास 42 गुंठे जमीन आणि 7 कोटी 46 लाख 47 हजार रुपये किंमतीचे रिसॉर्ट याचा समावेश असल्याची माहिती ईडीने दिली. 

साई रिसॉर्टचे बांधकाम हे CRZ कायद्याचं उल्लंघन करून करण्यात आले असून यात मनी लाँड्रिंग केल्याचा आरोप भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केला होता. मागील जवळपास दीड-दोन वर्षांपासून ते या प्रकरणाचा पाठपुरावा करत आहेत. या प्रकरणी सोमय्या यांनी शिवसेना ठाकरे गटाचे नेते आमदार अनिल परब यांच्यावर आरोप केले होते. हे रिसॉर्ट अनिल परब यांच्याशी संबंधित असल्याचा आरोप सोमय्यांनी केला होता. तर, अनिल परब यांनी आरोप फेटाळून लावताना आपला या साई रिसॉर्टशी संबंध नसल्याचे स्पष्ट केले होते. 

शिवसेना ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांचे निकटवर्तीय सदानंद कदम यांच्या मालकीचं हे साई रिसॉर्ट आहे. या प्रकरणी अनिल परब यांना तूर्तास हायकोर्टाकडून अटकेपासून संरक्षण आहे. तर, सदानंद कदम यांना ईडीने अटक केली आहे. 

> ईडीने दाखल केलेल्या आरोपपत्रात आहे तरी काय?

साई रिसॉर्ट प्रकरणाी जयराम देशपांडे व  सदानंद कदम यांना ईडीनं अटक केली आहे. देशपांडे आणि कदम यांच्यासह सुधीर शांताराम परदुले, विनोद दिपोलकर, सुरेश तुपे, अनंत कोळी यांच्या नावांचाही आरोपपत्रात समावेश आहे या प्रकरणात तपास अद्यापही सुरू असून भविष्यात पुरवणी आरोपपत्र दाखल करण्याची ईडीला मुभा आहे. या आरोपपत्रात सध्या 6 आरोपींविरोधात आरोप आहे. विशेष म्हणजे अनिल परब यांच्या विरोधात कोणताही आरोप नाही. मात्र, या प्रकरणाचे सूत्रधार अनिल परब असल्याचे ईडीने म्हटले आहे. 

ईडीला तपासात काय आढळले?

- वर्ष 2017 च्या सुरुवातीच्या महिन्यात विभास साठे यांनी दापोलीतील जमीन विकण्यासाठी विनोद डेफोलकर या एजंटशी संपर्क साधला
- एजंटने खरेदीदार शोधण्यास सुरुवात केली आणि दापोली पुलाजवळ जमीन खरेदी करू पाहणाऱ्या सदानंद कदम यांच्या तो संपर्कात आला
- एप्रिल 2017 मध्ये एजंट विभास साठे यांना सदानंद कदम यांच्या कार्यालयात घेऊन गेला
- संभाषणादरम्यान सदानंद कदम यांनी दोघांकडे खुलासा केला की अनिल परब यांच्यावतीने हा व्यवहार करत आहेत
- सदानंद कदम म्हणाले की, अनिल परब 1 कोटी 80 लाखांतील 1 कोटी, खाते हस्तांतरणाद्वारे आणि तर उर्वरित 89 लाख रोखीनं देतील.
- 2 मे 2017 रोजी अनिल परब यांनी साठे यांच्या बँक खात्यातून एक कोटी रुपये दिले
- कालांतराने कदम यांनी साठे यांच्याकडे पास झालेल्या एजंटकडे रोख रक्कम सुपूर्द केली
- एजंटला कमिशन म्हणून 3 लाख मिळाले होते
- जमीन खरेदी करण्यामागे अनिल परबांचा त्यांच्या वैयक्तिक वापरासाठी तिथं बंगला बांधण्याचा हेतू होता."
- वास्तुविशारदांनीही जमिनीला भेट दिली होती. परब यांनी जुळे बंगला बांधण्याची चर्चा केली होती. वास्तुविशारदाचाही जबाब नोंदवला आहे.
- कदम आणि परब यांच्या उपस्थित असलेल्या बैठकीत आर्किटेक्ट यांनी जमीन CRZ असल्याचं सांगितलं होतं.
- या जमिनीवर कोणतंही बांधकाम होऊ शकत नाही, हे आरोपी कदम आणि परब यांना चांगलेच ठाऊक होते
- अशाप्रकारे परस्पर समजुतीनुसार संपर्काचं काम केलं गेलं. संपर्काचे काम कदम यांनीच केले.
- अनिल परब यांच्या सूचनेवरून कदम यांनी डेफोलकर यांच्या संगनमताने प्रांतधिकारी, दापोली यांच्याकडे जुळ्या बंगल्याच्या बांधकामासाठी शेतजमिनीचे रूपांतर अकृषिक करण्यासाठी साठे यांची सही खोटी करून अर्ज केला गेला.
- परब यांच्यावतीनं कदम यांनी परबच्या प्रभावाचा वापर करून जमीन वापरात रूपांतरित करण्याची परवानगी मिळवली
- सदानंद कदम यांच्या दबावामुळे आणी अनिल परब यांच्या प्रभावामुळे आरोपी सुधीर परधुळे, तत्कालीन मंडळ अधिकारी दापोली यांनी घटनास्थळी न भेटता SDO यांना 31 जुलै 2017 रोजी तपासणी अहवाल सादर केला.
- परब यांनी सीआरझेड नियमांचे उल्लंघन करून बेहिशेबी पैसे रोखीत गुंतवून रिसॉर्ट बांधले
- फसवणूक उघडकीस आल्यानंतर कदम यांनी उशिरानं त्यांच्या वहीत बांधकामाचा खर्च दाखवला
- त्यानं साल 2020 ते 2021 दरम्यान खर्च केलेले 3.59 कोटी दाखवले
- तपासयंत्रणांनी छाननी सुरू केल्यानंतर बेहिशेबी रोख खर्चाला कायदेशीर मान्यता देण्यात आली
- विविध विक्रेत्यांकडे चौकशी केली असता असे उघड झाले आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Prakash Ambedkar : विधानसभा निकालापूर्वी प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य; पॉलिटिकल स्टँड क्लिअर करुन टाकला, म्हणाले...
विधानसभा निकालापूर्वी प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य; पॉलिटिकल स्टँड क्लिअर करुन टाकला, म्हणाले...
वर्ध्यात 2019 च्या तुलनेत मतदानात सात टक्क्यांनी वाढ, जनतेचा कौल महायुती की मविआला? चर्चांना उधाण
वर्ध्यात 2019 च्या तुलनेत मतदानात सात टक्क्यांनी वाढ, जनतेचा कौल महायुती की मविआला? चर्चांना उधाण
मोठी बातमी! चिपळूमध्ये स्ट्राँग रुमच्या परिसरात तीन संशयित, भर रात्री अजितदादांच्या हजारो कार्यकर्त्यांची गर्दी
मोठी बातमी! चिपळूमध्ये स्ट्राँग रुमच्या परिसरात तीन संशयित, भर रात्री अजितदादांच्या हजारो कार्यकर्त्यांची गर्दी
Health: शाकाहारी की मांसाहारी? आरोग्यासाठी कोणता आहार उत्तम आहे? तज्ज्ञ काय म्हणतात? जाणून घ्या
Health: शाकाहारी की मांसाहारी? आरोग्यासाठी कोणता आहार उत्तम आहे? तज्ज्ञ काय म्हणतात? जाणून घ्या
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rajkiya Sholay : एक्झिट पोल आऊट, मुख्यमंत्रिपदावरुन रस्सीखेच? जनतेची पसंती नेत्यांची कुस्तीSpecial Report Maharashtra Politics : मुख्यमंत्रीपदावरुन रस्सीखेच, मविआत वादाची ठिणगीSpecial Report Gautam Adani : अदानींच्या शेअर्समध्ये 20 टक्क्यांची घसरण, वाद काय?Maharashtra Assembly Election Poll : मतदानाचा टक्का वाढला, कोणाचा विजय पक्का

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Prakash Ambedkar : विधानसभा निकालापूर्वी प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य; पॉलिटिकल स्टँड क्लिअर करुन टाकला, म्हणाले...
विधानसभा निकालापूर्वी प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य; पॉलिटिकल स्टँड क्लिअर करुन टाकला, म्हणाले...
वर्ध्यात 2019 च्या तुलनेत मतदानात सात टक्क्यांनी वाढ, जनतेचा कौल महायुती की मविआला? चर्चांना उधाण
वर्ध्यात 2019 च्या तुलनेत मतदानात सात टक्क्यांनी वाढ, जनतेचा कौल महायुती की मविआला? चर्चांना उधाण
मोठी बातमी! चिपळूमध्ये स्ट्राँग रुमच्या परिसरात तीन संशयित, भर रात्री अजितदादांच्या हजारो कार्यकर्त्यांची गर्दी
मोठी बातमी! चिपळूमध्ये स्ट्राँग रुमच्या परिसरात तीन संशयित, भर रात्री अजितदादांच्या हजारो कार्यकर्त्यांची गर्दी
Health: शाकाहारी की मांसाहारी? आरोग्यासाठी कोणता आहार उत्तम आहे? तज्ज्ञ काय म्हणतात? जाणून घ्या
Health: शाकाहारी की मांसाहारी? आरोग्यासाठी कोणता आहार उत्तम आहे? तज्ज्ञ काय म्हणतात? जाणून घ्या
ब्रेकअप झाल्यामुळे पुरुषावर बलात्काराचा गुन्हा दाखल होऊ शकत नाही, सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
ब्रेकअपमुळे पुरुषावर बलात्काराचा गुन्हा दाखल होऊ शकत नाही, सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
Election Voting: राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज ठाकरे मुख्यमंत्री होणार? सर्वेक्षण काय सांगतं, मतदारराजा कुणाच्या हाती सत्तेची चावी देणार?
राज ठाकरे मुख्यमंत्री होणार? सर्वेक्षण काय सांगतं, मतदारराजा कुणाच्या हाती सत्तेची चावी देणार?
Maharashtra Vidhan Sabha Exit Poll 2024: महाड, कागल आणि वर्सोव्यात धक्कादायक निकालाची शक्यता, राज्यातील या 32 उमेदवारांचा विजय पक्का, प्रजातंत्रचा एक्झिट पोल
महाड, कागल आणि वर्सोव्यात धक्कादायक निकाल? राज्यातील 'या' 32 उमेदवारांचा विजय पक्का, प्रजातंत्रचा एक्झिट पोल
Embed widget