E Shivneri : एसटी महामंडळाच्या ताफ्यात नव्याने दाखल होणार ई-शिवनेरी, महाराष्ट्र दिनी ठाणे-पुणे महामार्गावर बस उतरवण्याचा मानस
E-Shivneri Bus : एसटी महामंडळाच्या ताफ्यात ई-शिवनेरी बस नव्याने दाखल होणार आहेत. 1 मे महाराष्ट्र दिनाचा मुहूर्त साधत ठाणे ते पुणे महामार्गावर ई-शिवनेरी बस उतरण्याचा एसटी महामंडळाचा मानस आहे.
E-Shivneri Bus : एसटी महामंडळाच्या ताफ्यात ई-शिवनेरी बस (E-Shivneri) नव्याने दाखल होणार आहेत. 1 मे महाराष्ट्र दिनाचा (Maharashtra Day) मुहूर्त साधत ठाणे ते पुणे महामार्गावर ई-शिवनेरी बस उतरण्याचा एसटी महामंडळाचा (MSRTC) मानस आहे. सध्याच्या शिवनेरीच्या तिकीट दराच्या तुलनेत या गाड्यांचे भाडे कमी असणार आहे. ठाणे-पुणे महामार्गावर धावणाऱ्या बसचे भाडे 350 रुपये असेल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
सुरुवातीला आठ ई-शिवनेरी दाखल होणार
एसटी महामंडळाच्या ताफ्यात सुरुवातीला आठ इलेक्ट्रिक शिवनेरी बस दाखल होणार आहेत. मार्च महिन्यापर्यंत 150 इलेक्ट्रिक बस एसटीच्या ताफ्यात दाखल होणार होत्या. मात्र इलेक्ट्रिक गाड्यांना (Electric Bus) असलेल्या प्रचंड मागणीमुळे फक्त आठ गाड्या दाखल होतील. संपूर्ण वातानुकूलित, मोबाईल चार्जिंगसह अत्याधुनिक इन्फोटेन्मेंटची सुविधा या बसमध्ये मिळणार आहे. तर एकदा बॅटरी चार्ज झाल्यानंतर 400 किमीचा टप्पा पार करण्याची क्षमता या बसमध्ये आहे.
आरामदायी, वातानुकूलित, वेगवान प्रवासासाठी शिवनेरीला प्राधान्य
डिझेल बसच्या तुलनेमध्ये इलेक्ट्रिक बस चालवण्याचा खर्च कमी आहे. सध्या भारतामध्ये 'फेम' योजने अंतर्गत राज्य परिवहन महामंडळामध्ये काही बस दाखल करुन घेण्यात आल्या आहेत. शिवनेरी ही एसटी महामंडळाच्या ताफ्यातील प्रीमियम बस सेवांपैकी एक आहे. व्होल्वो श्रेणीतील ही बस आरामदायी आणि वेगवान असल्याने अनेक जण त्याला प्राधान्य देतात. शिवाय मुंबई-पुणे प्रवास करणारे अनेक जण यातून प्रवास करतात. त्यामुळे हा प्रवासी कायम राहावा, यासाठी ई-बसचे नामकरण ई-शिवनेरी करण्यात आलं आहे.
ई-शिवनेरीची वैशिष्ट्ये
- ई शिवनेरी बसची क्षमता 43 प्रवाशांची
- एकदा बॅटरी पूर्ण चार्ज केल्यानंतर 400 किमीचा टप्पा पार करण्याची क्षमात
- ई शिवनेरी संपूर्ण वातानुकुलित बस
- आरामदायी आसन व्यवस्था
- मोबाईल चर्जिंगची सोय
- बॅग ठेवण्यासाठी सवतंत्र व्यवस्था
पुणे-नगर मार्गावर पहिली शिवाई धावली
दरम्यान, मागील वर्षी तत्कालीन परिवहन मंत्री अनिल परब यांच्या हस्ते दोन शिवाई (Shivai) इलेक्ट्रिक गाड्यांचे लोकार्पण करण्यात आले होते, ज्या सध्या पुणे-अहमदनगर महामार्गावर धावत आहेत. 1 जून 2022 रोजी पुणे-नगर मार्गावर पहिली इलेक्ट्रिक बस शिवाई धावली.
दरम्यान, 'जिथे गाव, तिथे एसटी' अशी संकल्पना अनेक वर्षांपूर्वी एसटी महामंडळाने राबवली होती. त्यानुसार आज प्रत्येक गावागावात एसटी सहज बघायला मिळते. पेट्रोल-डिझेलच्या किमतीने उच्चांक गाठल्यामुळे येत्या काळात या इलेक्ट्रिक बसचा सर्वसाधारण नागरिकांना फायदा होणार आहे. शिवाय तिकीटांच्या दरात देखील तफावत जाणवण्याची शक्यता आहे.
हेही वाचा