एक्स्प्लोर
Advertisement
डीएसके प्रकरणातील मुख्य तपास अधिकारी ICU मध्ये!
निलेश मोरे यांनी डीएसके प्रकरणात बँक ऑफ महाराष्ट्रच्या चार अधिकाऱ्यांना अटक केल्यानंतर त्यांच्यावर प्रचंड दबाव होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यात येऊन या प्रकरणात लक्ष घातले आणि तपास करणाऱ्या पोलिसांचीच चौकशी करण्यासाठी आयपीएस दर्जाच्या अधिकाऱ्याची नियुक्ती केली.
पुणे : डी. एस. कुलकर्णी प्रकरणातील मुख्य तपास अधिकारी सहाय्यक पोलीस आयुक्त निलेश मोरे यांची प्रकृती अचानक खालावली आहे. निलेश मोरे यांना वानवडीमधील रुबी हॉल क्लिनिकमध्ये उपचारांसाठी भरती करण्यात आले असून, त्यांच्यावर सध्या आयसीयूमध्ये उपचार सुरु आहेत.
निलेश मोरे यांनी डीएसके प्रकरणात बँक ऑफ महाराष्ट्रच्या चार अधिकाऱ्यांना अटक केल्यानंतर त्यांच्यावर प्रचंड दबाव होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यात येऊन या प्रकरणात लक्ष घातले आणि तपास करणाऱ्या पोलिसांचीच चौकशी करण्यासाठी आयपीएस दर्जाच्या अधिकाऱ्याची नियुक्ती केली.
त्यानंतर पोलिसांनी रविंद्र मराठे आणि बँक ऑफ महाराष्ट्रच्या इतर तीन अधिकाऱ्यांची जामिनावर सुटका करण्यात यावी, असं न्यायालयात लिहून दिलं होतं. आज न्यायालयात बँक ऑफ महाराष्ट्रच्या इतर तीन अधिकाऱ्यांच्या जामिनावर सुनावणी होणार होती. मात्र निलेश मोरे या सुनावणीला हजर नव्हते.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement