एक्स्प्लोर

Dr. Ambedkar Jayanti Live Updates : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त राज्यभर विविध कार्यक्रम

Dr. B.R. Ambedkar Jayanti : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. B.R. Ambedkar Jayanti) यांची आज जयंती आहे. त्यानिमित्त राज्यभर विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे.

Key Events
Dr. B.R. Ambedkar Jayanti 2023 Live Updates News Maharashtra Chaityabhoomi Babasaheb Ambedkar Smarak Various programs across the Maharashtra Dr. Ambedkar Jayanti Live Updates : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त राज्यभर विविध कार्यक्रम
Dr. B.R. Ambedkar Jayanti 2023

Background

Dr. B.R. Ambedkar Jayanti 2023 Live Updates : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. B.R. Ambedkar Jayanti) यांची आज 132 वी जयंती आहे. त्यानिमित्त देशभरातून त्यांना अभिवादन करण्यात येत आहे. जयंतीनिमित्त आज राज्यभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलं आहे. चैत्यभूमी परिसरात मुंबई महानगर पालिकेकडून सुशोभीकरण आणि अनुयायांसाठी योग्य व्यवस्था करण्यात आली आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आज राज्यभर उत्साह पाहायला मिळत आहे. काही ठिकाणी रॅली काढून बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात येणार आहे. तर काही ठिकाणी सलग 18 तास अभ्यास करुन त्यांना अभिवादन करण्यात येणार आहे. दरम्यान, चैत्यभूमी परिसरात महानगरपालिकेकडून योग्य व्यवस्था करण्यात आली आहे. समाजमाध्यमांवर थेट प्रक्षेपणासह डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारीत लेजर शो आणि छायाचित्र प्रदर्शन दाखवण्यात येणार आहे. यंदाच्या जयंती दिनानिमित्त नियंत्रण कक्ष, रुग्णवाहिका, आरोग्य सेवा, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, स्वच्छता, शौचालये, बैठक व्यवस्थेसाठी बाकडे, इत्यादी सोयी-सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. यंदा प्रथमच अनुयायांसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनपटावर आयोजित एका विशेष लेजर शो चे आयोजन माता रमाबाई व्ह्युईंग डेक येथे सायंकाळी करण्यात येणार आहे. बीएमसीकडून भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारीत छायाचित्रांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. 

बुलढाण्यात आंबेडकर जयंतिनिमित्त फटाक्याची आतिषबाजी 

बुलढाण्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जन्मोत्सवाचे स्वागत 13 एप्रिल च्या मध्यरात्री 12 वाजता फटाक्याच्या आतिषबाजीने करण्यात आले. स्थानिक जयस्तंभ चौकात शहरातील हजारो युवक जमले होते. तेव्हा मोठ्या प्रमाणात फटाक्याची आतिषबाजी करण्यात आली. तसेच घोषणाबाजी करत जल्लोष साजरा करण्यात आला. ही फटाक्यांची आतिषबाजी पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.

परभणी 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंतीनिमित्त परभणीत विविध कार्यक्रमांच आयोजन करण्यात आलं आहे. सकाळी 7.30 वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर महावंदना होणार आहे. या वंदनेला प्रचंड मोठ्या प्रमाणावर जनसमुदाय उपस्थित राहणार आहे. 

धुळे

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून शहरातील त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला आंबेडकरी अनुयायांच्या वतीने मोठ्या प्रमाणावर अभिवादन केले जाणार आहे. तर शहरातील संदेश भूमी येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पदस्पर्श झाला आहे.

चंद्रपूर

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त चंद्रपूर शहरात रॅली काढून अनेक संघटना बाबासाहेबांच्या पुतळ्याला अभिवादन करतात. पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार देखील बाबासाहेबांच्या स्मृतीला अभिवादन करतील.

वर्धा 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त वर्धा शहरासह जिल्ह्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. आंबेडकर चौकामध्ये विविध रॅली आणि कार्यक्रम आयोजित करण्यात आलेत. पहाटेपासूनच आंबेडकर अनुयायी अभिवादन करण्यासाठी पोहोचत आहेत.

15:40 PM (IST)  •  14 Apr 2023

Ambedkar Jayanti: राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून चैत्यभूमीवर बाबासाहेबांना अभिवादन

Ambedkar Jayanti: देशासह राज्यभरात आज भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी केली जात आहे. मुंबईत चैत्यभूमीवर उत्साहात जयंती साजरी केली जाते. राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चैत्यभूमीवर जाऊन बाबासाहेबांना अभिवादन केलं. यावेळी शिवसेना आणि भाजप नेते देखील हजर होते.  यावेळी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी आंबेडकरी अनुयायींना जयंतीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच इंदू मिल स्मारकाच्या कामाचा आढावाही त्यांनी घेतला. 

12:41 PM (IST)  •  14 Apr 2023

पालकमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत आंबडवेत प्रथमच शासकीय डॉ. आंबेडकर जयंती साजरी...

Dr. B.R. Ambedkar Jayanti 2023 :  मंत्री उदय सामंत आणि आमदार योगेश कदम यांनी महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाला केले अभिवादन. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूळ गावी आंबडवेत प्रथमच शासकीय आंबेडकर जयंती पालकमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत साजरी केली. 

Load More
New Update
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Santosh Deshmukh : लोखंडी रॉड, तारा गुंडाळलेल्या लाकडी दांड्याने दोन तास मारहाण, अंगावर 56 जखमा; त्या दिवशी नेमकं काय घडलं?
लोखंडी रॉड, तारा गुंडाळलेल्या लाकडी दांड्याने दोन तास मारहाण, अंगावर 56 जखमा; त्या दिवशी नेमकं काय घडलं?
अग्नितांडवानंतर गोव्यातील तो नाईट क्लब जमीनदोस्त; मुख्यमंत्र्यांचा आदेश, फिरला बुलडोझर
अग्नितांडवानंतर गोव्यातील तो नाईट क्लब जमीनदोस्त; मुख्यमंत्र्यांचा आदेश, फिरला बुलडोझर
बावनकुळे म्हणाले, वेगळा विदर्भ भाजपजा अजेंडा,आम्ही काम करतोय; राज ठाकरेंचा जुना व्हिडिओ व्हायरल
बावनकुळे म्हणाले, वेगळा विदर्भ भाजपजा अजेंडा,आम्ही काम करतोय; राज ठाकरेंचा जुना व्हिडिओ व्हायरल
त्या भाजप नेत्याला मी माफ करू शकत नाही; ठाकरेंच्या सांगण्यावरुन बाहेर काढल्याचा राग, किरीट सोमय्यांनी स्पष्टच सांगितलं
त्या भाजप नेत्याला मी माफ करू शकत नाही; ठाकरेंच्या सांगण्यावरुन बाहेर काढल्याचा राग, किरीट सोमय्यांनी स्पष्टच सांगितलं

व्हिडीओ

Mahapalikecha Mahasangram Pune : नव्या लोकप्रतिनिधींकडून पुणेकरांना कोणत्या अपेक्षा
Mahapalikecha Mahasangram Nashik : नाशिक महानगरपालिका निवडणुकीत कुणाची बाजी?
Ganesh Naik On Leopard : बिबट्यांवर नसबंदीच्या प्रयोगाला केंद्राने परवानगी दिली - गणेश नाईक
Shrikant Shinde Lok Sabha : निवडणुका, उद्धव ठाकरे ते काँग्रेस; श्रीकांत शिंदे लोकसभेत कडाडले
Baba Adhav Funeral : समाजसेवक बाबा आढाव यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Santosh Deshmukh : लोखंडी रॉड, तारा गुंडाळलेल्या लाकडी दांड्याने दोन तास मारहाण, अंगावर 56 जखमा; त्या दिवशी नेमकं काय घडलं?
लोखंडी रॉड, तारा गुंडाळलेल्या लाकडी दांड्याने दोन तास मारहाण, अंगावर 56 जखमा; त्या दिवशी नेमकं काय घडलं?
अग्नितांडवानंतर गोव्यातील तो नाईट क्लब जमीनदोस्त; मुख्यमंत्र्यांचा आदेश, फिरला बुलडोझर
अग्नितांडवानंतर गोव्यातील तो नाईट क्लब जमीनदोस्त; मुख्यमंत्र्यांचा आदेश, फिरला बुलडोझर
बावनकुळे म्हणाले, वेगळा विदर्भ भाजपजा अजेंडा,आम्ही काम करतोय; राज ठाकरेंचा जुना व्हिडिओ व्हायरल
बावनकुळे म्हणाले, वेगळा विदर्भ भाजपजा अजेंडा,आम्ही काम करतोय; राज ठाकरेंचा जुना व्हिडिओ व्हायरल
त्या भाजप नेत्याला मी माफ करू शकत नाही; ठाकरेंच्या सांगण्यावरुन बाहेर काढल्याचा राग, किरीट सोमय्यांनी स्पष्टच सांगितलं
त्या भाजप नेत्याला मी माफ करू शकत नाही; ठाकरेंच्या सांगण्यावरुन बाहेर काढल्याचा राग, किरीट सोमय्यांनी स्पष्टच सांगितलं
IPL 2026 Auction : आयपीएल लिलावाची अंतिम लिस्ट जाहीर; 77 जागेसाठी, 350 खेळाडूंवर लागणार बोली, त्यातील किती भारतीय?
आयपीएल लिलावाची अंतिम लिस्ट जाहीर; 77 जागेसाठी, 350 खेळाडूंवर लागणार बोली, त्यातील किती भारतीय?
ZP अन् पंचायत समितीची तयारी, उद्धव ठाकरेंची जिल्हा संपर्क प्रमुखांसोबत बैठक; मनसेबाबतही सूचना
ZP अन् पंचायत समितीची तयारी, उद्धव ठाकरेंची जिल्हा संपर्क प्रमुखांसोबत बैठक; मनसेबाबतही सूचना
फडणवीस साहेब आम्हाला न्याय कधी मिळणार? लेकरांनी दम कुठपर्यंत धरायचा? संतोष देशमुखांच्या आईने जरांगेंसमोर फोडला टाहो
फडणवीस साहेब आम्हाला न्याय कधी मिळणार? लेकरांनी दम कुठपर्यंत धरायचा? संतोष देशमुखांच्या आईने जरांगेंसमोर फोडला टाहो
आधी देवदर्शनाला गेले, किरकोळ वादानंतर संपवलं जीवन; कला केंद्रातील नर्तिकेसाठी युवकाचं टोकाचं पाऊल
आधी देवदर्शनाला गेले, किरकोळ वादानंतर संपवलं जीवन; कला केंद्रातील नर्तिकेसाठी युवकाचं टोकाचं पाऊल
Embed widget