एक्स्प्लोर

92 व्या मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. अरुणा ढेरेंची निवड

92 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन यवतमाळमधील पोस्टल मैदानावर होणार आहे. 11, 12 आणि 13 जानेवारी असे दिवस साहित्याचा मेळा यवतमाळमध्ये भरणार आहे.

यवतमाळ : ज्येष्ठ साहित्यिका डॉ. अरुणा ढेरे यांची 92 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमलेनाच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. डॉ. अरुणा ढेरे यांच्या नावावर साहित्य महामंडळाच्या बैठकीत एकमत झालं. काव्य, समीक्षण, ललित, वैचारिक अशा साहित्याच्या विविध प्रांगणात अरुणा ढेरे यांनी मुक्तसफर केली आहे. लोकसंस्कृतीचा अभ्यास, हा त्यांच्या साहित्यप्रवासातला महत्त्वाचा टप्पा मानला जातो. 92 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन यवतमाळमधील पोस्टल मैदानावर होणार आहे. 11, 12 आणि 13 जानेवारी 2018 असे तीन दिवस साहित्याचा मेळा यवतमाळमध्ये भरणार आहे. पहिल्यांदाच साहित्य संमलेनाच्या अध्यक्षपदासाठी निवडणुका झाल्या नाहीत. सर्वानुमते संमेलनाध्यक्षाची निवड करण्याचे साहित्य महामंडळाने ठरवले होते. त्यानुसार डॉ. अरुण ढेरे यांची एकमताने निवड झाली. अरुणा ढेरे यांचा थोडक्यात परिचय पिता आणि गुरुच्या रूपात लाभलेली, साहित्य अकादमी पारितोषिक विजेते, ज्येष्ठ साहित्यिक डॉ. रा.चिं. ढेरे यांची कृपा-साऊली, घरात जमिनीपासून छतापर्यंत रचलेल्या पुस्तकांमुळे ग्रंथांचा सहवास आणि साहित्याने भारावलेलं एक विलक्षण वातावरण! त्यात भर म्हणून शब्दांवरचं त्यांचं प्रभुत्व, मानवी नात्यांतील आर्तता शोधणारी त्यांची संवेदना, आणि एका मातब्बर 'स्टोरीटेलर'चं उपजत 'टायमिंग'... डॉ. अरुणा ढेरे आपल्या लेखनाने वाचकाला मंत्रमुग्ध करणार हे ठरलंच होतं. सहा कवितासंग्रह, तीन कादंबरी, सहा कथा संग्रह, अकरा ललित लेखसंग्रह आणि समीक्षात्मक पुस्तक असे विविधांगी लेखन करणार्‍या डॉ. ढेरे या 21 व्या शतकपूर्वीच्या काही दशकांतील अशा प्रकारच्या कदाचित एकमेव लेखिका म्हणता येतील. या शिवाय स्फुटलेख संग्रह, कादंबरी, समीक्षात्मक लेख यांतून त्यांच्या प्रतिभेची ओळख पटते. त्यांचा 'विस्मृतिचित्रे' हा ग्रंथ अतिशय गाजला. त्याच बरोबर 'अंधारातील दिवे', 'उंच वाढलेल्या गवताखाली' सारखी वैचारिक पुस्तकं; 'निरंजन', 'प्रारंभ','यक्षरात्र', यांसारखे कविता संग्रह; कृष्णकिनारा','नागमंडल','मैत्रेय' यांसारखेकथासंग्रह वाचकांच्या वाङ्मयीन प्रवासातील श्रद्धास्थानं बनली आहेत. डॉ. अरुणा ढेरे यांचं साहित्यविश्व : वैचारिक पुस्तके : अंधारातील दिवे उंच वाढलेल्या गवताखाली उमदा लेखक -उमदा माणूस उर्वशी कवितेच्या वाटेवर काळोख आणि पाणी कवितेच्या वाटेवर जाणिवा जाग्या होताना जावे जन्माकडे त्यांची झेप त्यांचे अवकाश पावसानंतरचं ऊन प्रकाशाचे गाणे प्रतिष्ठेचा प्रश्न प्रेमातून प्रेमाकडे महाद्वार लोक आणि अभिजात लोकसंस्कृतीची रंगरूपे विवेक आणि विद्रोह डॉ. विश्राम रामजी घोले आणि त्यांचा परिवार’ विस्मृतिचित्रे शाश्वताची शिदोरी शोध मराठीपणाचा' (सुभाष केळकर यांच्याबरोबर सहलेखन-मुख्य लेखक - दिनकर गांगल) स्त्री आणि संस्कृती कविता संग्रह : निरंजन प्रारंभ मंत्राक्षर यक्षरात्र बंद अधरो से (हिंदी) कथासंग्रह : अज्ञात झर्‍यावर काळोख आणि पाणी कृष्णकिनारा नागमंडल प्रेमातून प्रेमाकडे मन केले ग्वाही मनातलं आभाळ मैत्रेय रूपोत्सव लावण्ययात्रा वेगळी माती वेगळा वास
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

निवडणुकीत जात-धर्म आणला जातो, सिल्लोडची पुढची विधानसभा लढणार नाही; अब्दुल सत्तारांची मोठी घोषणा
निवडणुकीत जात-धर्म आणला जातो, सिल्लोडची पुढची विधानसभा लढणार नाही; अब्दुल सत्तारांची मोठी घोषणा
Makar Sankranti 2025 Wishes : मकर संक्रांतीच्या प्रियजनांना द्या 'या' खास शुभेच्छा; वाढवा सणाचा गोडवा, पाठवा 'हे' हटके शुभेच्छा संदेश
मकर संक्रांतीच्या प्रियजनांना द्या 'या' खास शुभेच्छा; वाढवा सणाचा गोडवा, पाठवा 'हे' हटके शुभेच्छा संदेश
मोठी बातमी ! UGC-NET ची 15 जानेवारीला होणारी परीक्षा रद्द; लवकरच जाहीर होईल नवी तारीख
मोठी बातमी ! UGC-NET ची 15 जानेवारीला होणारी परीक्षा रद्द; लवकरच जाहीर होईल नवी तारीख
सीमा लढ्यातील ज्येष्ठ सत्याग्रही, साहित्यिक व पत्रकार कॉम्रेड कृष्णा मेणसे यांचे निधन
सीमा लढ्यातील ज्येष्ठ सत्याग्रही, साहित्यिक व पत्रकार कॉम्रेड कृष्णा मेणसे यांचे निधन
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 10 PM TOP Headlines 10 PM 13 January 2025Sanjay  Raut Meet Sharad Pawar | मिशन पालिका इलेक्शन! संजय राऊतांनी घेतली शरद पवारांची भेटCity Sixty | सिटी 60 बातम्यांचा वेगवान आढावा एका क्लिकवर सुपरफास्ट ABP MajhaSantosh Deshmukh Case | धनंजय देशमुखांचं 'शोले' स्टाईल आंदोलन, सरकारला अल्टिमेटम Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
निवडणुकीत जात-धर्म आणला जातो, सिल्लोडची पुढची विधानसभा लढणार नाही; अब्दुल सत्तारांची मोठी घोषणा
निवडणुकीत जात-धर्म आणला जातो, सिल्लोडची पुढची विधानसभा लढणार नाही; अब्दुल सत्तारांची मोठी घोषणा
Makar Sankranti 2025 Wishes : मकर संक्रांतीच्या प्रियजनांना द्या 'या' खास शुभेच्छा; वाढवा सणाचा गोडवा, पाठवा 'हे' हटके शुभेच्छा संदेश
मकर संक्रांतीच्या प्रियजनांना द्या 'या' खास शुभेच्छा; वाढवा सणाचा गोडवा, पाठवा 'हे' हटके शुभेच्छा संदेश
मोठी बातमी ! UGC-NET ची 15 जानेवारीला होणारी परीक्षा रद्द; लवकरच जाहीर होईल नवी तारीख
मोठी बातमी ! UGC-NET ची 15 जानेवारीला होणारी परीक्षा रद्द; लवकरच जाहीर होईल नवी तारीख
सीमा लढ्यातील ज्येष्ठ सत्याग्रही, साहित्यिक व पत्रकार कॉम्रेड कृष्णा मेणसे यांचे निधन
सीमा लढ्यातील ज्येष्ठ सत्याग्रही, साहित्यिक व पत्रकार कॉम्रेड कृष्णा मेणसे यांचे निधन
मंत्रालयातील ती काळी लम्बोर्गिनी कोणाची; रोहित पवारांनी नावासह कुंडलीच काढली, 700 कोटी, मुंडेंचाही संदर्भ
मंत्रालयातील ती काळी लम्बोर्गिनी कोणाची; रोहित पवारांनी नावासह कुंडलीच काढली, 700 कोटी, मुंडेंचाही संदर्भ
Education : शालेय शिक्षणामध्ये महाराष्ट्र पुन्हा नंबर 1 होणार; मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास
शालेय शिक्षणामध्ये महाराष्ट्र पुन्हा नंबर 1 होणार; मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास
नायलॉन मांजाने पतंग उडवाल तर तुमच्यावर येणार संक्रात; विक्रेत्यांसह पालक, मुलांवर थेट 'सदोष मनुष्यवधाच्या प्रयत्नाचा' गुन्हा
नायलॉन मांजाने पतंग उडवाल तर येणार संक्रात; विक्रेत्यांसह पालक, मुलांवर थेट 'सदोष मनुष्यवधाच्या प्रयत्नाचा' गुन्हा
OBC विद्यार्थ्यांसाठी पुण्यासह 5 शहरात उत्कृष्ठता केंद्र स्थापन होणार; मुख्यमंत्र्यांकडून महाज्योतीचा आढावा
OBC विद्यार्थ्यांसाठी पुण्यासह 5 शहरात उत्कृष्ठता केंद्र स्थापन होणार; मुख्यमंत्र्यांकडून महाज्योतीचा आढावा
Embed widget