एक्स्प्लोर

डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटीलची तहसीलदारांना मारहाण, गुन्हा दाखल

विटा तहसीलदार ऋषिकेश शेळके यांना चंद्रहार पाटीलने मारहाण केली. ऋषिकेश शेळके यांनी चंद्रहार पाटीलच्या अवैधपणे वाळू वाहतूक करणाऱ्या गाड्या जप्त केल्या होत्या.

सांगली : तहसीलदाराला मारहाण केल्याप्रकरणी डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील आणि त्याच्या साथीदारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विटा पोलीस स्टेशनमध्ये हा गुन्हा दाखल झाला आहे. रविवारी दुपारच्या सुमारास चंद्रहार पाटीलने विटा तहसिलदारांना मारहाण केली होती.

सांगली जिल्ह्यातील खानापूरचे तहसीलदार ऋषिकेश शेळके यांना डबल महाराष्ट्र केसरी व माजी जिल्हा परिषद सदस्य चंद्रहार पाटील यांच्याकडून मारहाण झाल्याचा प्रकार घडला आहे. विटा शहरातील तहसील कार्यालयाच्या आवारातच चंद्रहार पाटील यांनी तहसीलदार शेळके यांना आपल्या साथीदाराच्या मदतीने मारहाण केली. काही दिवसांपूर्वी तहसीलदार ऋषिकेश शेळके यांनी अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या गाड्यांवर कारवाई केली होती.त्यामध्ये चंद्रहार पाटील यांच्याही वाळू वाहतूक करणाऱ्या गाड्यांचा समावेश होता.

कारवाईत जप्त केलेल्या गाड्यांवर तब्बल साडे सात लाख रुपयांचा दंड तहसीलदार शेळके यांनी ठोठावला होता. हा दंड कमी करावा अशी मागणी वारंवार चंद्रहार पाटीलकडून तहसीलदार शेळके यांच्याकडे करण्यात येत होती. मात्र तहसीलदार शेळके यांनी चंद्रहार पाटील यांना तुम्ही कायदेशीर अपील करा, मी दंड ठोठावला आहे आणि मीच पुन्हा दंड कमी करू शकत नाही, असं सांगितलं होतं. हाच राग मनात धरून आज दुपारी चंद्रहार पाटील हे विटा तहसील कार्यालयात पोहचले आणि तहसीलदार ऋषिकेश साळुंके यांना पुन्हा दंड कमी करण्याच्या मागणी करू लागले.

दरम्यान चंद्रहार पाटील आणि तहसीलदार शेळके यांच्यात वादावादी झाली. त्यातून चंद्रहार पाटील आणि त्यांच्या साथीदाराने तहसीलदार शेळके यांना त्याच्या गाडीतून बाहेर काढून मारहाण केल्याचा जबाब तहसीलदारांनी पोलीस स्टेशनमध्ये दिला. शेळके यांनी दिलेल्या तक्रारीनुसार विटा पोलीस ठाण्यामध्ये चंद्रहार पाटील आणि त्याच्या अन्य एका साथीदारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

पंकजा मुंडे मंत्री होत्या, प्रीतम मुंडे खासदार होत्या, बीडचा विकास का केला नाही, सुषमा अंधारे यांचा हल्लाबोल
पंकजा मुंडे मंत्री होत्या, प्रीतम मुंडे खासदार होत्या, बीडचा विकास का केला नाही, सुषमा अंधारे यांचा हल्लाबोल
Sanjay Raut on Rahul Gandhi :
"मोदी-शाहांना आता रोज राहुल गांधींना राम-राम करुनच संसदेत यावं लागेल"
PM Narendra Modi and Rahul Gandhi अध्यक्षांसाठी एकत्र; लोकसभा अध्यक्ष Om Birla यांचे स्वागत
कट्टर विरोधक अध्यक्षांसाठी एकत्र; मोदीं-गांधींकडून ओम बिर्लांचे स्वागत
Shatrughan Sinha on Rekha : लेक सोनाक्षीच्या रिसेप्शनमध्ये शत्रुघ्न सिन्हांनी रेखासोबत घडलेल्या प्रसंगाची कबुली दिली! नेमकं घडलं तरी काय?
लेक सोनाक्षीच्या रिसेप्शनमध्ये शत्रुघ्न सिन्हांनी रेखासोबत घडलेल्या प्रसंगाची कबुली दिली! नेमकं घडलं तरी काय?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sanjay Raut on Rahul Gandhi : TOP 100 Headlines : सकाळच्या 100 बातम्यांचा वेगवान आढावा : 26 June 2024 : 11 AM :  ABP MajhaABP Majha Headlines : 11 AM : 26 June 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सPM Narendra Modi and Rahul Gandhi अध्यक्षांसाठी एकत्र; लोकसभा अध्यक्ष Om Birla यांचे स्वागत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पंकजा मुंडे मंत्री होत्या, प्रीतम मुंडे खासदार होत्या, बीडचा विकास का केला नाही, सुषमा अंधारे यांचा हल्लाबोल
पंकजा मुंडे मंत्री होत्या, प्रीतम मुंडे खासदार होत्या, बीडचा विकास का केला नाही, सुषमा अंधारे यांचा हल्लाबोल
Sanjay Raut on Rahul Gandhi :
"मोदी-शाहांना आता रोज राहुल गांधींना राम-राम करुनच संसदेत यावं लागेल"
PM Narendra Modi and Rahul Gandhi अध्यक्षांसाठी एकत्र; लोकसभा अध्यक्ष Om Birla यांचे स्वागत
कट्टर विरोधक अध्यक्षांसाठी एकत्र; मोदीं-गांधींकडून ओम बिर्लांचे स्वागत
Shatrughan Sinha on Rekha : लेक सोनाक्षीच्या रिसेप्शनमध्ये शत्रुघ्न सिन्हांनी रेखासोबत घडलेल्या प्रसंगाची कबुली दिली! नेमकं घडलं तरी काय?
लेक सोनाक्षीच्या रिसेप्शनमध्ये शत्रुघ्न सिन्हांनी रेखासोबत घडलेल्या प्रसंगाची कबुली दिली! नेमकं घडलं तरी काय?
Maharashtra Politics: उद्धव ठाकरे यांची राजकीय ताकद खरंच वाढलीय का?
उद्धव ठाकरे यांची राजकीय ताकद खरंच वाढलीय का?
राज ठाकरेंनी महायुतीला पाठींबा देण्याचे आदेश नाही दिले, मग आम्हाला वाटतं त्याला मत देऊ : संदीप देशपांडे
विधान परिषद निवडणुकीत मनसेचा महायुतीला पाठिंबा नाही? संदीप देशपांडेंच्या वक्तव्यानं चर्चांना जोर
Bigg Boss Jay Dudhane : बिग बॉस फेम अभिनेत्यावर कोसळला दुःखाचा डोंगर; वडिलांचं निधन
बिग बॉस फेम अभिनेत्यावर कोसळला दुःखाचा डोंगर; वडिलांचं निधन
Actress Rekha Income Source :  दशकभरापासून चित्रपटांपासून दूर, अभिनेत्री रेखाच्या उत्पन्नाचे स्रोत काय?
दशकभरापासून चित्रपटांपासून दूर, अभिनेत्री रेखाच्या उत्पन्नाचे स्रोत काय?
Embed widget