एक्स्प्लोर
भगवान गड वादः नामदेव शास्त्रींचं जिल्हाधिकाऱ्यांना पत्र
अहमदनगरः भगवान गडावर राजकीय, वैयक्तिक, सामाजिक मेळावे आणि सभा घेण्याची परवानगी देऊ नये, असं पत्र महंत नामदेव शास्त्रींनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलं आहे. त्यामुळे आता पंकजा मुंडे आणि नामदेव शास्त्रींमधला वाद विकोपाला पोहचल्याचं चित्र आहे.
चंद्र-सूर्य असेपर्यंत भगवानगडावर भाषण नाही : नामदेवशास्त्री
भगवानगडावर पंकजा मुंडेंचं भाषण झाल्यास कायदा-सुव्यवस्थेची जबाबदारी सरकारची असेल, अशी भूमिका गडाचे महंत नामदेव शास्त्रींनी घेतलीय. भगवान गडावरील दसरा मेळावा आणि गोपीनाथ मुंडे हे समीकरण होतं. गोपीनाथ मुंडे दसरा मेळाव्याला भगवान गडावरुन भाषण करायचे. मात्र, त्यांच्या मृत्यूनंतर भगवान गडावर राजकीय भाषण होणार नसल्याची भूमिका भगवान गडाचे महंत नामदेव शास्त्री सानप यांनी घेतली.पंकजा खरं बोलल्या, हा घ्या पुरावा : धनंजय मुंडे
मात्र, या दसऱ्याला भगवान गडावर भाषण होणारच, अशी भूमिका पंकजा मुंडेंनी घेतल्याने हा वाद उभा राहिलाय. त्यात गडावरच्या भाषणासंदर्भात पंकजा मुंडेंनी समर्थकांना केलेल्या आवाहनाची ऑडियो क्लिप व्हायरल झाल्याने हा वाद आणखीनच पेटला.पंकजा मुंडे राजीनामा द्या : धनंजय मुंडे
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
महाराष्ट्र
महाराष्ट्र
क्राईम
Advertisement