एक्स्प्लोर

तात्काळ रेल्वेच्या तिकीटासाठी IRCTC वर कसरत नको, फक्त काही मिनीटं आधी या स्मार्ट युक्तीनं मिळवा बर्थ...

अनेकांना आपल्या अचानक ठरलेल्या प्लॅनसाठी वेळेत बुकींग होत नाही मग तात्काळमध्ये रेल्वेचं तिकीट मिळवण्यसाठी कसरत सुरु होते. पण आता अशी धडपड करून तिकीट मिळवण्याची गरज नाही.

IRCTC Instant Train Ticket: राज्यात आता सणावारांना सुरुवात होत आहे. गणेशोत्सव जवळ आल्याने अनेकजण रेल्वे तिकीटे बूक करण्याच्या लगबगीत आहेत. चाकरमानी कोकणात जाण्यासाठी आता तयारीला लागलेत. तर अनेकांना पावसाळ्यात ट्रेकचे वेध लागले आहेत. कोणत्याही ट्रेनचं तिकीट बूक करण्यासाठी तुम्ही IRCTC चा वापर नक्की केला असेल. अनेकांना आपल्या अचानक ठरलेल्या प्लॅनसाठी वेळेत बुकींग होत नाही मग तात्काळमध्ये रेल्वेचं तिकीट मिळवण्यसाठी कसरत सुरु होते. पण आता अशी धडपड करून तिकीट मिळवण्याची गरज नाही. एक छोटीशी पण स्मार्ट युक्ती वापरून तुम्हाला कन्फर्म बर्थ मिळू शकते.

तुमच्यापैकी अनेकजण IRCTC हा रेल्वे तिकीट बुकींग करणाऱ्या ॲपचा वापर करणारे असतील.  कोणत्याही ट्रेनचं तात्काळ तिकीट मिळवणं म्हणजे पोटात गोळा येण्याइतकं कठीण काम.
 तिकीट मिळेल की नाही याची धाकधूक सतात असते . अनेकदा ट्रॅफीकमुळे तर कधी बुकींग करण्यास उशीर झाल्यानं तिकीट मिळत नाही. पण एका विशिष्ट वेळेत जर तुम्ही या ॲपवर लॉगइन केलं तर तुम्हाला तात्काळमध्ये तिकीट मिळण्याची शक्यता चांगली वाढते. 

तात्काळ बुकींग सुरु होते सकाळी दहा वाजता

कोणत्याही ट्रेनचं तात्काळ बुकिंग करण्यासाठी IRCTC संकेतस्थळावरून दररोज सकाळी10 वाजल्यापासून तात्काळ बुकींगला सुरुवात होते. स्लीपर श्रेणीसाठीच्या गाड्यांसाठी हे बुकींग दररोज सकाळी ११ वाजता सुरु होते.

IRCTC वर काही मिनिटे आधी लॉगिन करावे

अनेकदा तात्काळ सीट बुक करण्यासाठी खूप ट्रॅफिक असल्याने कधीकधी IRCTC वर लॉगिनही होत नाही. यासाठी तात्काळ बुकींगसाठी 10-15 मिनिटे आगोदर लॉगइन करू नये. असे केेल्याने विंडो उघडल्यानंतर तुमचे सत्र आपोआप बंद होऊ शकते. अशा वेळी तीन चार मिनिटे आधी लॉग इन केल्यानं तुम्हाला सीट मिळण्यास कोणतीही अडचण येणार नाही. 

शेवटच्या दोन मिनीटात लॉगीन केल्यास...

अनेकजण ट्रॅफीक काही वेळाने कमी होईल या अपेक्षेने शेवटच्या दोन मिनीटात IRCTC लॉगीन करतात. पण यामुळे तात्काळ तिकीट मिळण्याची शक्यता कमी होती. त्यामुळे शेवटच्या क्षणाची वाट न पाहता तीन चार मिनीट आधी लॉगीन केल्याने तात्काळ तिकीट मिळू शकते.

IRCTC पर्याय योजना

भारतीय रेल्वेने आपल्या प्रवाशांसाठी सहजपणे निश्चित जागा मिळवण्यासाठी 'विकल्प'चा पर्याय आणला आहे. ही एक अशी सुविधा आहे ज्याचा वापर करून तुम्ही तुमचे कन्फर्म तिकीट मिळण्याची शक्यता वाढवू शकता. हे फ्युचर कसं काम करतं आणि तुम्ही त्याचा कसा फायदा घेऊ शकता? 

हेही वाचा:

गणेशोत्सव जवळ आलाय, रेल्वेचं कन्फर्म तिकीट हवंय? 'हा' पर्याय वापरून तर पहा..

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

पगारवाढ 2020 नाही, तर 2024 पासून मिळणार, एसटी कामगारांना फसवलं; श्रीरंग बरगेंकडून संताप
पगारवाढ 2020 नाही, तर 2024 पासून मिळणार, एसटी कामगारांना फसवलं; श्रीरंग बरगेंकडून संताप
निरोप कॉम्रेड...  कामगार, शेतकऱ्यांचा आवाज हरपला; येचुरींच्या निधनानंतर शरद पवार, राहुल गांधींकडून शोक
निरोप कॉम्रेड... कामगार, शेतकऱ्यांचा आवाज हरपला; येचुरींच्या निधनानंतर शरद पवार, राहुल गांधींकडून शोक
दोन महिन्यांनी लाडकी बहीण योजनेच्या 1500 रुपयांचे तीन हजार होणार; राऊतांची घोषणा
दोन महिन्यांनी लाडकी बहीण योजनेच्या 1500 रुपयांचे तीन हजार होणार; राऊतांची घोषणा
मृत्यूनंतरही यातना संपेना... महिलेचा मृतदेह पंधरा दिवसांपासून अंत्यसंस्काराच्या प्रतीक्षेत
मृत्यूनंतरही यातना संपेना... महिलेचा मृतदेह पंधरा दिवसांपासून अंत्यसंस्काराच्या प्रतीक्षेत
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Mumbai : शिंदे आणि फडणवीसांच्या हस्ते कोस्टल रोड आणि सी-लिंकला जोडणाऱ्या पुलाचं लोकार्पणABP Majha Headlines : 5.00 PM : 12 Sep 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सPune :राष्ट्रीय हरित लवादाने दिलेल्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाची स्थगितीABP Majha Headlines : 04.00 PM : 12 Sep 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पगारवाढ 2020 नाही, तर 2024 पासून मिळणार, एसटी कामगारांना फसवलं; श्रीरंग बरगेंकडून संताप
पगारवाढ 2020 नाही, तर 2024 पासून मिळणार, एसटी कामगारांना फसवलं; श्रीरंग बरगेंकडून संताप
निरोप कॉम्रेड...  कामगार, शेतकऱ्यांचा आवाज हरपला; येचुरींच्या निधनानंतर शरद पवार, राहुल गांधींकडून शोक
निरोप कॉम्रेड... कामगार, शेतकऱ्यांचा आवाज हरपला; येचुरींच्या निधनानंतर शरद पवार, राहुल गांधींकडून शोक
दोन महिन्यांनी लाडकी बहीण योजनेच्या 1500 रुपयांचे तीन हजार होणार; राऊतांची घोषणा
दोन महिन्यांनी लाडकी बहीण योजनेच्या 1500 रुपयांचे तीन हजार होणार; राऊतांची घोषणा
मृत्यूनंतरही यातना संपेना... महिलेचा मृतदेह पंधरा दिवसांपासून अंत्यसंस्काराच्या प्रतीक्षेत
मृत्यूनंतरही यातना संपेना... महिलेचा मृतदेह पंधरा दिवसांपासून अंत्यसंस्काराच्या प्रतीक्षेत
Eknath Khadse : एकनाथ खडसेंना आता शरद पवारांच्या राष्ट्रवादीतूनच आव्हान, माजी मंत्र्यांनी खडसावलं; म्हणाले, त्यांनी आपली...
एकनाथ खडसेंना आता शरद पवारांच्या राष्ट्रवादीतूनच आव्हान, माजी मंत्र्यांनी खडसावलं; म्हणाले, त्यांनी आपली...
Ambadas Danve:विधानसभेत मुस्लिम उमेदवार देणार का? अंबादास दानवे म्हणाले, 'शिवसेनेला हिंदुत्वासाठी कोणाच्याही सर्टिफिकेटची गरज नाही..'
विधानसभेत मुस्लिम उमेदवार देणार का? अंबादास दानवे म्हणाले, 'शिवसेनेला हिंदुत्वासाठी कोणाच्याही सर्टिफिकेटची गरज नाही..'
Manoj Jarange: देवेंद्र फडणवीसांच्या जीवावर मस्ती आली ना; राऊतांच्या आंदोलनावर जरांगेंचा पलटवार
Video: देवेंद्र फडणवीसांच्या जीवावर मस्ती आली ना; राऊतांच्या आंदोलनावर जरांगेंचा पलटवार
Kavita Raut : सरकारी नोकरी मिळाली तरी कविता राऊत नाराज! कोर्टात जाणार; अर्थ खात्यावरही केला गंभीर आरोप, नेमकं काय आहे कारण?
सरकारी नोकरी मिळाली तरी कविता राऊत नाराज! कोर्टात जाणार; अर्थ खात्यावरही केला गंभीर आरोप, नेमकं काय आहे कारण?
Embed widget