'राम मंदिर लोकार्पणाचं उद्धव ठाकरेंना निमंत्रण देऊ नका', अजित पवार गटाच्या नेत्याची मागणी
आज बाळासाहेब असते तर शेकडो शिवसैनिक अयोध्येत असते. मात्र उद्धव ठाकरे हिंदूत्व सोडून काँग्रेससोबत गेल्यामुळे लाचारीतून ते टीका करत आहे, असे सुबोध मोहिते म्हणाले.
!['राम मंदिर लोकार्पणाचं उद्धव ठाकरेंना निमंत्रण देऊ नका', अजित पवार गटाच्या नेत्याची मागणी Don't invite Uddhav Thackeray to Ram Mandir Opening Ceremony Ajit Pawar group leader Subodh Mohite demands Maharashtra Marathi News 'राम मंदिर लोकार्पणाचं उद्धव ठाकरेंना निमंत्रण देऊ नका', अजित पवार गटाच्या नेत्याची मागणी](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/01/02/b6e90ec60784be8dfa88ee72514ed7d0170416435492989_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
नागपूर : अयोध्येतल्या (Ayodhya) राम मंदिर (Ram Mandir) लोकार्पण सोहळ्यावरुन राज्यात सध्या एक वेगळाच सामना सुरु झालाय. राम मंदिर लोकार्पण सोहळ्यासाठी देशातल्या व्हीव्हीआयपी व्यक्तींना निमंत्रित करण्यात येतंय. महाराष्ट्रातूनही अनेक व्हीव्हीआयपींना निमंत्रणं आली आहे. मात्र व्हीव्हीआयपी व्यक्तींच्या यादीत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) निमंत्रणावरुन विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये चांगलीच जुंपली आहे. दरम्यान राम मंदिर सोहळ्यावर टीका करणाऱ्या उद्धव ठाकरेंना राममंदिर लोकर्पणाचं निमंत्रण देऊ नका, अशी मागणी अजित पवार गटाचे राष्ट्रीय महासचिव आणि माजी केंद्रीय मंत्री सुबोध मोहिते (Subodh Mohite) यांनी केली आहे. तसेच राम मंदिर उद्घाटन सोहळ्यावरून सुबोध मोहिते यांनी उद्धव ठाकरेंवर सडकून टीका केली आहे.
सुबोध मोहिते म्हणाले, बाळासाहेब ठाकरे यांना अभिप्रेत असलेले राम मंदिर अयोध्येत साकारले जात आहे. मात्र त्यांचे पुत्र उद्धव ठाकरे त्या मंदिर सोहळ्यावरून वारंवार टीका करत आहे. उद्धव ठाकरे यांना राम मंदिर लोकार्पणाची निमंत्रण पत्रिका देऊ नये. आज बाळासाहेब असते तर शेकडो शिवसैनिक अयोध्येत असते. मात्र उद्धव ठाकरे यांनी हिंदूत्व सोडून काँग्रेससोबत गेल्यामुळे लाचारीतून ते टीका करत आहे.
उद्धव ठाकरे खरच हिंदूत्ववादी असतील तर त्यांनी स्वत:हून रामलल्लाच्या दर्शनासाठी जावे : मोहिते
हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आज असते तर त्यांनी निमंत्रणाची वाट पाहिली नसती. लाखो शिवसैनिक अयोध्येला गेले असते कट्टर हिंदूत्वाचे दैवत राम आहे. उद्धव ठाकरेंनी हिंदूत्व सोडले आहे. सत्तेसाठी त्यांनी हिंदूत्व सोडले आहेआणि राम मंदिराच्या दर्शनासाठी त्यांना जायचे आहे. उद्धव ठाकरे खरच हिंदूत्ववादी असतील तर त्यांनी स्वत:हून रामलल्लाच्या दर्शनासाठी जावे निमंत्रणाची वाट पाहू नये, असे सुबोध मोहिते म्हणाले.
राम मंदिरावरून सुरू असलेले राजकारण ही अत्यंत लाजिरवाणी गोष्ट : मोहिते
सुबोध मोहिते म्हणाले, राम मंदिर सोहळ्याच्या लोकार्पणावरून भाजपवर सातत्याने टीका होत आहे. यावर उत्तर देताना सुबोध मोहिते म्हणाले, राम मंदिर ट्रस्टला मदत म्हणून सरकार मदत करत आहे. मंदिर हे भाजप आणि उत्तरप्रदेश सरकारचे नाही, मंदिर हे संपूर्ण जगाचे आहे. त्याच्यावरून सुरू असलेले राजकारण ही अत्यंत लाजिरवाणी गोष्ट आहे.
बाळासाहेबांचे स्वप्न आज पूर्ण झाले : मोहिते
बाळासाहेब ठाकरे आज जीवंत असते तर लाखो शिवसैनिक जय श्री रामचा जयघोष करत अयोध्येला गेले असते. हिंदूत्वाची लाट महाराष्ट्रात आली असती. बाळासाहेबांच्या मते हा हिंदूता देश आहे,हिंदूचे दैवत राम आहे. मी जीवंत असेपर्यंत मंदिर झाले पाहिजे ही बाळासाहेबांची इच्छा होते. ते स्वप्न आज पूर्ण झाले आहे, असे देखील सुबोध मोहिते म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)