सरकारला ओबीसी आरक्षण संपवायचंय?; पंकजा मुंडेंचा महाविकास आघाडी सरकारवर कडाडल्या
Pankaja Munde on OBC Reservation : सरकारला ओबीसी आरक्षण संपवायचंय?; पंकजा मुंडेंचा महाविकास आघाडी सरकारवर कडाडल्या
Pankaja Munde on OBC Reservation : "आयोगाला पुरेसा निधी देण्याची गरज असतानाही, सरकारनं 15 महिन्यांमध्ये 7 वेळा तारखा बदलून मागितल्या. त्याशिवाय दुसरं काहीही केलेलं नाही. यापूर्वीही मी म्हटलं होतं की, या सरकारला ओबीसी आरक्षण असुरक्षित करायचंय की, काय? ओबीसी आरक्षण संपुष्टात आणायचंय की, काय? असा प्रश्न राज्यातील ओबीसींमध्ये आहेत.", असं म्हणत भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे. मुंबईत माध्यमांशी बोलताना पंकजा मुंडे यांनी ओबीसी आरक्षणावरुन महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे. मुंबईत माध्यमांशी बोलताना ओबीसी आरक्षणावरुन पंकजा मुंडे यांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे.
"ओबीसी आरक्षण संरक्षित नसताना एक अध्यादेश काढला. कारण लोकांनी आक्रोश केला. लोक रस्त्यावर उतरले. लोकांनी चक्काजाम केला. यानंतर एक अध्यादेश काढून ओबीसी आरक्षण संरक्षित करण्याचं महाराष्ट्र शासनानं ढोंग घेतलेलं आहे. यामध्ये हा अध्यादेश आहे, त्याविरोधात औरंगाबाद खंडपीठात लोकांनी दाद मागितली आहे. न्यायालयाच्या निर्णयाला अधीन राहूनच या अध्यादेशाची कारवाई होणार आहे. आता या अध्यादेशामुळे ओबीसीच्या आरक्षणावर निवडणूक लढणाऱ्या लोकांच्या डोक्यावर टांगती तलवार नेहमीच राहणार आहे, ही दुर्दैवाची बाब आहे, आणि महाराष्ट्राच्या पाठीत खंजीर खुपसणारी गोष्ट आहे, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही.", असं पंकजा मुंडे म्हणाल्या.
"येणाऱ्या काळात जवळपास 86 नगरपालिकांच्या निवडणूका आहेत. फेब्रुवारीत 85 टक्के स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महाराष्ट्रात होणार आहेत. या अध्यादेशाला जास्तीत जास्त ओबीसींसाठी योग्य बनवण्यासाठी इम्पेरिकल डेटावर काम होणं गरजेचं आहे. हे तेव्हाच होऊ शकतं, जेव्हा मागासवर्गीय आयोगाची स्थापना सशक्तपणे करुन इम्पिरिकल डेटा गोळा करण्यासाठी आणि त्यासंदर्भातील इतर गोष्टींसाठी आपण आयोगाला निधी उपलब्ध करुन दिला पाहिजे.", असंही त्या म्हणाल्या.
राज्य सरकारला इम्पिरिकल डेटाची व्याख्या माहीत आहे का? : पंकजा मुंडे
पंकजा मुंडे म्हणाल्या की, "सरकारकडे बलाढ्य मंत्र्यांच्या चुकीच्या गोष्टी पाठीशी घालण्यासाठी निधी आहे. पण या शासनाकडे ओबीसींच्या इम्पिरिकल डेटासाठी निधी नाही. या आयोगाला निधी पूर्वीच उपलब्ध करुन दिला असता, तर अशी वेळ आली नसती, असं माझं स्पष्ट मत आहे. आता अधिवेशन येत आहे. आयोगाला निधी उपलब्ध करुन टाईम बाउंड प्रोग्राम राबवून अध्यादेशाच्या निर्णयाला सक्षमपणे राबवण्यासाठी इम्पिरिकल डेटा गोळा करणं आवश्यक आहे. दरवेळी जेव्हा इम्पिरिकल डेटाचा विषय येतो, त्यावेळी केंद्राकडे बोट दाखवलं जातं. त्यामुळे या सरकारला माझा प्रश्न आहे, तुम्हाला इम्पिरिकल डेटाची व्याख्या माहीत आहे का?"
पंकजा मुंडे म्हणतात, मला कशाचीही अपेक्षा नाही
भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी आपल्याला कशाचीही अपेक्षा नसल्याचे सांगितले. मी लोकांमध्ये असून राज्यभर फिरत आहे. कुठल्या पदाने काही होणार नसल्याचे पंकजा मुंडे यांनी म्हटले. काही दिवसांपूर्वीच पंकजा यांनी पक्षाकडून होत असलेल्या दुर्लक्षाबाबत टिप्पणी केली होती. मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी आपल्याला कसलीही अपेक्षा नसल्याचे म्हटले.