एक्स्प्लोर
Advertisement
पनवेल : मतदानाचा सेल्फी पाठवा, मालमत्ता करात सूट मिळवा!
पनवेल : पनवेलकरांनी आगामी महापालिकेच्या निवडणुकीत मतदान केलं तर त्यांना मालमत्ता करात सूट मिळार आहे. मतदान अधिकाधिक व्हावं यासाठी पनवेल महापालिकेच्या आयुक्तांनी हा फंडा काढलाय.
त्यासाठी तुम्हाला मतदान करुन त्याचा सेल्फी पाठवायचा आहे. ज्यामुळे तुम्हाला मालमत्ता करात 25 टक्क्यांची सुट मिळेल. महानगरपालिका झाल्यापासून पनवेलमध्ये यंदा पहिल्यांदाच निवडणूक होत आहे.
प्रत्येक प्रभागात पाच अशा प्रकारे 100 मतदारांना ही सूट देण्यात येईल. उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये निवडणूक होत असल्याने मतदानाचा टक्का घसरण्याची शक्यता आहे. त्यामुळे पनवेल महापालिकेने हा उपक्रम सुरु केला आहे.
पनवेलसोबतच मालेगाव आणि भिवंडी महापालिकेची निवडणूक होत आहे. 24 मे रोजी मतदान होणार आहे, तर 26 मे रोजी मतमोजणी होईल.
पनवेल महापालिका निवडणूक कार्यक्रम :
- अर्ज दाखल करण्याची तारीख : 29 एप्रिल ते 6 मे
- अर्ज छाननी तारीख : 8 मे
- चिन्ह वाटप : 12 मे
- मतदानाची तारीख : 24 मे
- मतमोजणी : 26 मे
पनवेल, भिवंडी, मालेगाव महापालिकेच्या निवडणुका जाहीर
पनवेल महापालिका निवडणुकीसाठी शिवसेनेचा मेगाप्लॅन
‘पनवेल’ जिंकण्यासाठी महाआघाडी, शेकाप, काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र
पनवेल महापालिकेत भाजप स्वबळावर, आ. प्रशांत ठाकूर यांचे संकेत
‘पनवेल’ जिंकण्यासाठी महाआघाडी सज्ज, जागावाटपही पूर्ण
Khelo khul ke, sab bhool ke - only on Games Live
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भंडारा
बातम्या
विश्व
मुंबई
Advertisement