एक्स्प्लोर
Advertisement
औरंगाबाद महापालिकेत पुन्हा राडा, तीन नगरसेवकांचं सदस्यत्व रद्द
वार्षिक अंदाजपत्रक सादर करण्यासाठी बोलावलेल्या सभेच्या सुरुवातीलाच पालिकेमध्ये गोंधळ झाला.
औरंगाबाद : विविध कारणांमुळे चर्चेत येणाऱ्या औरंगाबाद महापालिकेमध्ये जोरदार राडा झाला. वार्षिक अंदाजपत्रक सादर करण्यासाठी बोलावलेल्या सभेच्या सुरुवातीलाच पालिकेमध्ये गोंधळ झाला.
स्थायी समिती सभापती गजानन बारवाल यांना वार्षिक अंदाजपत्रक सादर करण्यास अडथळा आणून घोषणाबाजी करणाऱ्या तीन नगरसेवकांचं सदस्यत्व एका दिवसासाठी रद्द करण्यात आलं.
तीन दिवसांपूर्वीच स्थायी समितीच्या निवृत्त आठ सदस्यांच्या जागी नवीन आठ सदस्यांची नियुक्ती करण्यात आली. यामध्ये शहर विकास आघाडीचे गटनेते आणि मावळते सभापती गजानन बारवाल यांनी त्यांचा कार्यकाळ संपल्यानंतर पुन्हा स्वतःचीच शिफारस केली. यामुळे बारवाला यांच्यावर संतापलेल्या शहर विकास आघाडीतील सदस्यांनी त्यांना वार्षिक अंदाजपत्रक सादर करण्याला विरोध केला.
आघाडीच्या नगरसेवकांनी यावेळी अंदाजपत्रकाच्या प्रती भिरकावल्या आणि प्रचंड घोषणाबाजी करत गोंधळ सुरु केला. त्यामुळे महापौरांनी कैलास गायकवाड, गोकुळ मलके, राहुल सोनवणे या तीन नगरसेवकांचं सदस्यत्व एका दिवसासाठी रद्द केलं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
सांगली
निवडणूक
Advertisement