एक्स्प्लोर
'शिवशाहीत'ही आता ज्येष्ठ नागरिकांना तिकिटात सवलत
ज्येष्ठ नागरिकांनाही आता शिवशाही या वातानुकूलित बसमध्ये सवलत मिळणार आहे. येत्या 1 जून 2018 या निर्णयाची अंमलबजावणी होईल.
!['शिवशाहीत'ही आता ज्येष्ठ नागरिकांना तिकिटात सवलत discount to senior citizens in Shivshahi bus ticket from 1st June 'शिवशाहीत'ही आता ज्येष्ठ नागरिकांना तिकिटात सवलत](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2018/04/04172611/shivshahi-sleeper-bus.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : एसटीच्या 70 व्या वर्धापन दिनानिमित्त परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी खुशखबर दिली आहे. ज्येष्ठ नागरिकांनाही आता शिवशाही या वातानुकूलित बसमध्ये सवलत मिळणार आहे. येत्या 1 जून 2018 या निर्णयाची अंमलबजावणी होईल.
सध्या एसटीच्या साध्या, रातराणी आणि निमआराम बसमधून ज्येष्ठ नागरिकांना प्रवास तिकिटात 50 टक्के सवलत मिळते. अशा प्रकारची सवलत नव्याने सुरु झालेल्या शिवशाही बसमध्ये सुद्धा मिळावी, अशी मागणी अनेक ज्येष्ठ नागरिकांनी केली होती.
या मागणीची दखल घेत दिवाकर रावते यांनी याबाबत एसटी प्रशासनाला प्रस्ताव तयार करण्यास सांगितलं होतं. त्यानुसार सध्या सुरु असलेल्या वातानुकूलित शिवशाहीच्या आसन श्रेणीतील बसमध्ये एकूण तिकीट मूल्याच्या 45 टक्के तर वातानुकूलित शिवशाहीच्या शयनयान श्रेणीतील बसमध्ये (एसी स्लीपर) एकूण तिकीट मूल्याच्या 30 टक्के सवलत देण्याचा निर्णय घेण्यात आला.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बातम्या
महाराष्ट्र
विश्व
मुंबई
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)