एक्स्प्लोर

Matoshree Drone: ठाकरेंच्या मातोश्रीबाहेर अज्ञात ड्रोन भिरभिरत आला, सुरक्षारक्षक धास्तावले, व्हिडीओ व्हायरल होताच खळबळ

Matoshree Drone: उद्धव ठाकरेंच्या मातोश्रीबाहेर अज्ञात ड्रोनमुळे उडाली खळबळ. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या ड्रोनबाबत मुंबई पोलिसांनी स्पष्टीकरण दिले आहे.

Matoshree Drone: ठाकरे घराण्याचे निवासस्थान असलेल्या मातोश्री परिसरात एक अज्ञात ड्रोन फिरत असल्याची माहिती समोर आली आहे. हा ड्रोन या परिसरात कोणी पाठवला होता, हे अद्याप समजू शकलेले नाही. मात्र, मातोश्रीसमोरील या ड्रोनचा व्हिडीओ व्हायरल  झाल्यानंतर मातोश्रीवर (Matoshree) ड्रोनच्या माध्यमातून नजर ठेवली जात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. मातोश्री आणि एमएमआरडीए कार्यालयादरम्यान असलेल्या रस्त्यावर हा ड्रोन (Drone) घिरट्या घालत असताना दिसून आला. हा ड्रोन मातोश्रीमधील सुरक्षारक्षकांच्या दृष्टीस पडला. त्यावेळी त्यांनी हवेत उडणाऱ्या या ड्रोनचा व्हिडीओ शुट केला. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या ड्रोनच्या माध्यमातून उद्धव ठाकरे यांना भेटायला येणाऱ्या व्यक्तींवर नजर ठेवली जात असल्याचा आरोप ठाकरे गटाकडून करण्यात आला आहे. या घटनेनंतर मातोश्रीची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. (Mumbai News)

उद्धव ठाकरे हे सध्या मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत. त्यांच्या अनुपस्थितीत मातोश्रीवर नजर ठेवली जात आहे का, असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे. यावरुन आता राजकीय वाद पेटला आहे. ठाकरे गटाकडून भाजप ड्रोनच्या माध्यमातून मातोश्रीची टेहळणी केली जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. मात्र, भाजप आणि शिंदे गटाच्या नेत्यांकडून हा आरोप फेटाळण्यात आला आहे.

या सगळ्या प्रकारानंतर ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी भाजपवर जोरदार टीका केली. मुख्यमंत्री राहिलेल्या आणि एका पक्षाचा प्रमुख असलेल्या नेत्याच्या घराबाहेर अशाप्रकारे टेहळणी केली जात असेल, तर हा प्रकार गंभीर आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी इतक्या लिंबूटिंबू लोकांना सुरक्षा देऊन ठेवली आहे. परंतु, मातोश्रीबाहेरील सुरक्षेत कपात करण्यात आली आहे. भाजपला लोकांच्या किचनमध्ये डोकावण्याचा छंद आहे. मतचोरी उघड झाल्यानंतर भाजप धास्तावली आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांना मातोश्रीवर भेटायला कोण येते, यावर नजर ठेवली जात आहे. असं काही घडलं नसेल तर हा ड्रोन कोणी सोडला होता, मातोश्रीच्या सुरक्षेत हयगय कशी होऊ शकते, असा सवाल सुषमा अंधारे यांनी उपस्थित केला.

Mumbai Police: मातोश्रीबाहेर ड्रोनबाबत मुंबई पोलिसांकडून स्पष्टीकरण

मातोश्रीबाहेर अज्ञात ड्रोन फिरत असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. यानिमित्ताने मातोश्रीच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला होता. या पार्श्वभूमीवर बीकेसी पोलिसांकडून यांसदर्भात महत्त्वाचे स्पष्टीकरण देण्यात आले आहे. हा ड्रोन अज्ञात नसून एमएमआरडीने पाठवला होता. 8 नोव्हेंबर ते 16 नोव्हेंबरदरम्यान हे सर्वेक्षण सुरु होते. पॉडटॅक्सी प्रकल्पासाठी हे सर्वेक्षण सुरु होते. त्यासाठी मुंबई पोलिसांकडून परवानगी घेण्यात आल्याचे बीकेसी पोलिसांनी सांगितले.

इतर बातम्या

300 कोटी गुंतवताना एक वडील म्हणून पार्थने तुम्हाला विचारलं नाही का? अजित पवार म्हणाले....

एबीपी माझा वृत्तवाहिनीमध्ये मागील 7 वर्षांपासून कार्यरत
Read More

महत्त्वाच्या बातम्या

BJP : विनोद तावडे राष्ट्रीय सरचिटणीस, तर स्मृती इराणींना अखेर मोठी जबाबदारी; भाजपची नवी टीम
विनोद तावडे राष्ट्रीय सरचिटणीस, तर स्मृती इराणींना अखेर मोठी जबाबदारी; भाजपची नवी टीम
Girish Mahajan: पांडुरंग पावला! दर्शन घेताना बायकोने कानात बातमी सांगितली; नवनियुक्त पालकमंत्री गिरीश महाजनांची पहिली प्रतिक्रिया, नाशिककरांना दिला मोठा शब्द!
पांडुरंग पावला! दर्शन घेताना बायकोने कानात बातमी सांगितली, आता नाशिकचा चेहरा मोहरा बदललेला दिसेल; नवनियुक्त पालकमंत्री गिरीश महाजनांची पहिली प्रतिक्रिया
Navnath Waghmare controversial statement: मराठा समाजाच्या महिलांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य, ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंवर पोलिसांकडून गुन्हा दाखल
मराठा समाजाच्या महिलांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य, ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंवर पोलिसांकडून गुन्हा दाखल
Vijay Chaudhari: भाजपच्या माजी महामंत्र्यांना ऑडिओ क्लिप प्रकरण भोवले; नंदुरबारच्या विजय चौधरींची पक्षातून हकालपट्टी
भाजपच्या माजी महामंत्र्यांना ऑडिओ क्लिप प्रकरण भोवले; नंदुरबारच्या विजय चौधरींची पक्षातून हकालपट्टी

व्हिडीओ

Celebrity vs Politicians Cricket Match Sangli: सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग
Sanjay Raut Nashik Speech : खड्डे वेळेत न बुजवल्यास पालिकेचे गेट तोडून आत घुसू! प्रशासनाला अल्टिमेटम
Coffee With Kaushik NAFA: Nagraj Manjule, Mahesh Kothare, Prasad Oak पहिली एकत्र मुलाखत, धमाल किस्से
Supriya Sule: NDA सोबत जाणार का? जिल्हाध्यक्षांचा सवाल, सुप्रिया सुळे म्हणाल्या...
Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Navnath Waghmare controversial statement: मराठा समाजाच्या महिलांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य, ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंवर पोलिसांकडून गुन्हा दाखल
मराठा समाजाच्या महिलांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य, ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंवर पोलिसांकडून गुन्हा दाखल
उज्जैनमधील महाकालेश्वर मंदिर परिसरात चेंगराचेंगरीत अनेकजण तुडवले, दात तुटले, बेशुद्ध पडले, करंट पसरल्याची अफवा; 13 जखमी, नागचंद्रेश्वराच्या दर्शनासाठी 40 हजार भाविक रांगेत
उज्जैनमधील महाकालेश्वर मंदिर परिसरात चेंगराचेंगरीत अनेकजण तुडवले, दात तुटले, बेशुद्ध पडले, करंट पसरल्याची अफवा; 13 जखमी, नागचंद्रेश्वराच्या दर्शनासाठी 40 हजार भाविक रांगेत
Chandrapur Accident News: पोलीस मुख्यालयात जाताना काळाचा घाला; भीषण कार अपघातात महिला पोलिसाचा दुर्दैवी अंत, चंद्रपूर-मूल मार्गावरील घटना
पोलीस मुख्यालयात जाताना काळाचा घाला; भीषण कार अपघातात महिला पोलिसाचा दुर्दैवी अंत, चंद्रपूर-मूल मार्गावरील घटना
Uday Samant and Eknath Shinde: उदय सामंतांना उपमुख्यमंत्री व्हायचंय, एकनाथ शिंदेंना टार्गेट करण्यासाठी त्यांनीच मनोज जरांगेला सुपारी दिलेय; नवनाथ वाघमारेंचा सनसनाटी आरोप
उदय सामंतांना उपमुख्यमंत्री व्हायचंय, एकनाथ शिंदेंना टार्गेट करण्यासाठी त्यांनीच मनोज जरांगेला सुपारी दिलेय; नवनाथ वाघमारेंचा सनसनाटी आरोप
Hasan Mushrif: 'मोदी साहेबांना, अमित शाहांना एकेरी भाषेत बोलत आहेत हे राहुल गांधींना शोभत नाही, विरोधी पक्षनेते असतील, पण..' हसन मुश्रीफांचा संताप
'मोदी साहेबांना, अमित शाहांना एकेरी भाषेत बोलत आहेत हे राहुल गांधींना शोभत नाही, विरोधी पक्षनेते असतील, पण..' हसन मुश्रीफांचा संताप
OBC Reservation Sarpanch: ओबीसींसाठी आरक्षित सरपंचपदांची संख्या पूर्वीच्या तुलनेत 512 ने कमी होणार; 15 जिल्ह्यांतील आरक्षणासाठी सुधारित आदेश
ओबीसींसाठी आरक्षित सरपंचपदांची संख्या पूर्वीच्या तुलनेत 512 ने कमी होणार; 15 जिल्ह्यांतील आरक्षणासाठी सुधारित आदेश
कोल्हापूर : पन्हाळा तालुक्यातील बाजारभोगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांच्या अंथरुणात साप; रुग्णांच्या नातेवाईकांना साप पकडण्याची वेळ आली
कोल्हापूर : पन्हाळा तालुक्यातील बाजारभोगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांच्या अंथरुणात साप; रुग्णांच्या नातेवाईकांना साप पकडण्याची वेळ आली
Palghar Blast Tarapur: तारापूर एमआयडीसीतील कंपनीत भीषण स्फोट, शक्तिशाली हादऱ्याने पत्रे उडाले, आजुबाजूचा परिसर हादरला
तारापूर एमआयडीसीतील कंपनीत भीषण स्फोट, शक्तिशाली हादऱ्याने पत्रे उडाले, आजुबाजूचा परिसर हादरला
Embed widget