एक्स्प्लोर
धुळ्यात हुडहुडी वाढली, राज्यात सर्वात कमी तापमानाची नोंद
धुळ्याचा पारा 5 अशं सेल्सिअसपर्यंत पोहोचला आहे. धुळ्यात गेल्या तीन दिवसांपासून असलेल्या गारठ्यात आज आणखी वाढ झाली आहे.
धुळे : राज्यात सध्या थंडीचा कडाका वाढला आहे. धुळ्यात राज्यातील सर्वात कमी तापमानाची नोंद झाली आहे. धुळ्याचा पारा 5 अशं सेल्सिअसपर्यंत पोहोचला आहे. धुळ्यात गेल्या तीन दिवसांपासून असलेल्या गारठ्यात आज आणखी वाढ झाली आहे.
धुळ्यातील आजच्या थंडीने 17 वर्षातील सर्वात नीचांकी तापमानाची नोंद केली आहे. थंडीच्या कडाक्याने जनजीवनावर परिणाम झाला आहे. थंडीचा जोर वाढल्याने सकाळी साडे आठ वाजेपर्यंत रस्ते निर्मनुष्य दिसत आहेत. वाढत्या थंडीचा जनजीवनावर परिणाम झाला असला तरी गहू , हरबरा या पिकांसाठी ही थंडी लाभदायी असल्याचं शेतकरी सांगत आहेत.
धुळ्यातील सर्वात नीचांकी तापमानाची नोंद यापूर्वी 3 जानेवारी 1991 यादिवशी 2.3अंश सेल्सिअस, 5 जानेवारी 1991 या दिवशी 5 अंश सेल्सिअस अशी नोंद आहे. 1991 नंतर 2018 मध्ये तब्बल 17 वर्षानंतर तापमानाचा पारा 5 अंशावर पोहचला आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement