एक्स्प्लोर

Dhule : महापालिकेच्या शाळेत पाणी साचलं, शिक्षण 'पाण्यात'; विद्यार्थ्यांवर आली आंदोलनाची वेळ

Dhule School News : धुळे महापालिकेच्या (Dhule Manapa) शाळांकडे महापालिकेचे कमालीचे दुर्लक्ष झाले असल्याची चित्र सध्या बघायला मिळत आहे.

Dhule School News : धुळे महापालिकेच्या (Dhule Manapa) शाळांकडे महापालिकेचे कमालीचे दुर्लक्ष झाले असल्याची चित्र सध्या बघायला मिळत आहे. त्यामुळे मनपाच्या शाळांचे भवितव्य धोक्यात आले असून विद्यार्थ्यांचे शिक्षणही 'पाण्यात ' जाण्याची भीती निर्माण झाली आहे. काल रात्री झालेल्या पावसामुळे धुळे शहरातील मनपाच्या शाळा क्रमांक 20 मध्ये गुढघ्याएवढे पाणी साचल्याने विद्यार्थ्यांना शाळेत जाणेही कठीण झाले आहे. परिणामी, शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षांसह विद्यार्थी आणि पालकांना महापालिकेत येवून आंदोलन करावे लागले. या शाळेच्या कामातून टक्केवारी मिळणार नसल्यानेच शाळांकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा गंभीर आरोपही यावेळी करण्यात आला.

धुळे महापालिकेच्या शाळा क्रमांक 20 मध्ये नेहमीच पावसाचे पाणी साचत असते. त्यामुळे या शाळेच्या आवारात मुरुम टाकावा, अशी मागणी सातत्याने होत होती. परंतु, धुळे महापालिकेने कायम दुर्लक्षच केले आहे. काल रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे मनपा शाळा क्र.20 च्या आवारात गुढघाभर पाणी साचल्याने आज सकाळी विद्यार्थ्यांना शाळेत जाता आले नाही. सकाळी शाळेच्या पूर्ण वेळ विद्यार्थी शाळेबाहेरच थांबून होते.

याबाबत धुळे महापालिका शाळा क्रमांक 20 चे अध्यक्ष जमिल शाह यांनी मनपा आयुक्त, अतिरिक्त आयुक्तांना माहिती दिली. त्यानंतर दोन तास वाट पाहुन देखील शाळेजवळ कोणी फिरकले नाही. त्यामुळे संताप अनावर झाल्याने अध्यक्ष जमील शाह, उपाध्यक्ष अताऊर्रहेमान आदींनी विद्यार्थ्यांसह महापालिका गाठली आणि आयुक्त देवदास टेकाडे यांच्या दालनाबाहेर विद्यार्थ्यांसह पालक आणि शिक्षकांनी आंदोलन केले. धुळे मनपाच्या उदासिनतेमुळे विद्यार्थ्यांवरही आंदोलन करण्याची वेळ आल्याचे विदारक चित्र आज धुळे महानगरपालिकेत दिसून आले.

प्रशासनाच्या या उदासीनतेमुळं विद्यार्थी आणि पालकांना नाहक त्रासाचा सामना करावा लागत आहे. याकडे लक्ष देऊन लवकरात लवकर यावर तोडगा काढावा, अशी मागणी केली जात आहे.

इतर महत्वाच्या बातम्या

Dhule : साक्री तालुक्यात सर्वाधिक पावसाची हजेरी, पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान; अद्याप पंचनामे अपूर्ण

Maharashtra Rains : कोकणसह पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता, नागरिकांना सतर्कतेचं आवाहन

महत्त्वाच्या बातम्या

Manoj Jarange Patil: '29 ऑगस्टला जीव गेला तरी चालेल पण आंदोलनावर ठाम'; अभ्यासकांसोबतच्या अंतरवाली सराटीतील बैठकीत मनोज जरांगेंचा निर्धार
'29 ऑगस्टला जीव गेला तरी चालेल पण आंदोलनावर ठाम'; अभ्यासकांसोबतच्या अंतरवाली सराटीतील बैठकीत मनोज जरांगेंचा निर्धार
हायकोर्टाच्या लिपिक पदाच्या परीक्षेत गडबड, परीक्षा केंद्रावर उडाला गोंधळ; विद्यार्थ्यांचा ठिय्या, पोलीस घटनास्थळी
हायकोर्टाच्या लिपिक पदाच्या परीक्षेत गडबड, परीक्षा केंद्रावर उडाला गोंधळ; विद्यार्थ्यांचा ठिय्या, पोलीस घटनास्थळी
Chhatrapati Sambhajinagar: गाडीला जॅमर लावलं, चालक संतापला; भररस्त्यात चक्क स्वतःचीच कार पेटवली, छत्रपती संभाजीनगरमध्ये खळबळजनक घटना
गाडीला जॅमर लावलं, चालक संतापला; भररस्त्यात चक्क स्वतःचीच कार पेटवली, छत्रपती संभाजीनगरमध्ये खळबळजनक घटना
जातनिहाय जनगणनेबाबत छगन भुजबळ धादांत खोटं बोलतायंत; ओबीसी नेते हरिभाऊ राठोडांचा दावा, म्हणाले, ते भाजपकडे झुकलेत
जातनिहाय जनगणनेबाबत छगन भुजबळ धादांत खोटं बोलतायंत; ओबीसी नेते हरिभाऊ राठोडांचा दावा, म्हणाले, ते भाजपकडे झुकलेत

व्हिडीओ

Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Manoj Jarange Patil: '29 ऑगस्टला जीव गेला तरी चालेल पण आंदोलनावर ठाम'; अभ्यासकांसोबतच्या अंतरवाली सराटीतील बैठकीत मनोज जरांगेंचा निर्धार
'29 ऑगस्टला जीव गेला तरी चालेल पण आंदोलनावर ठाम'; अभ्यासकांसोबतच्या अंतरवाली सराटीतील बैठकीत मनोज जरांगेंचा निर्धार
Jaykumar Gore and Sushma Andhare: जयकुमार गोरे, सुरुवात तुम्ही केलेय, आता शेवट आम्हाला करावाच लागेल; सुषमा अंधारेंचा इशारा
जयकुमार गोरे, सुरुवात तुम्ही केलेय, आता शेवट आम्हाला करावाच लागेल; सुषमा अंधारेंचा इशारा
पत्नीला मारहाण करताच बेशुद्ध पडली, घाबरून इंजिनिअर पतीनं सुद्धा आईला फोन करून गळ्याला दोरी लावली, कौटुंबिक वादात दोघांचाही हकनाक जीव गेला
पत्नीला मारहाण करताच बेशुद्ध पडली, घाबरून इंजिनिअर पतीनं सुद्धा आईला फोन करून गळ्याला दोरी लावली, कौटुंबिक वादात दोघांचाही हकनाक जीव गेला
हायकोर्टाच्या लिपिक पदाच्या परीक्षेत गडबड, परीक्षा केंद्रावर उडाला गोंधळ; विद्यार्थ्यांचा ठिय्या, पोलीस घटनास्थळी
हायकोर्टाच्या लिपिक पदाच्या परीक्षेत गडबड, परीक्षा केंद्रावर उडाला गोंधळ; विद्यार्थ्यांचा ठिय्या, पोलीस घटनास्थळी
शाळेत शिक्षक नाही, रस्ते नाहीत, शिक्षणाची ऐशी तैशी झाली, प्रयागराजबरोबर स्पर्धा करत कुंभमेळ्यावर इतका पैसा खर्च करण्याची गरज काय? 20 हजार कोटी गिळंकृत करायचा डाव; विजय वडेट्टीवारांचा हल्लाबोल
शाळेत शिक्षक नाही, रस्ते नाहीत, शिक्षणाची ऐशी तैशी झाली, प्रयागराजबरोबर स्पर्धा करत कुंभमेळ्यावर इतका पैसा खर्च करण्याची गरज काय? 20 हजार कोटी गिळंकृत करायचा डाव; विजय वडेट्टीवारांचा हल्लाबोल
जातनिहाय जनगणनेबाबत छगन भुजबळ धादांत खोटं बोलतायंत; ओबीसी नेते हरिभाऊ राठोडांचा दावा, म्हणाले, ते भाजपकडे झुकलेत
जातनिहाय जनगणनेबाबत छगन भुजबळ धादांत खोटं बोलतायंत; ओबीसी नेते हरिभाऊ राठोडांचा दावा, म्हणाले, ते भाजपकडे झुकलेत
Video: 'म्हणून मी डान्स करायचा नाही का?' टीम इंडियाची क्रिकेटर श्रेयंका पाटीलचा 'बबली बदमाश है' वर भन्नाट डान्स व्हायरल, ट्रोल करणाऱ्यांनाही सडेतोड प्रत्युत्तर
Video: 'म्हणून मी डान्स करायचा नाही का?' टीम इंडियाची क्रिकेटर श्रेयंका पाटीलचा 'बबली बदमाश है' वर भन्नाट डान्स व्हायरल, ट्रोल करणाऱ्यांनाही सडेतोड प्रत्युत्तर
माजी उपसभापती, मंत्री अन् पाचवेळा आमदार; थेट पक्षाच्या कार्यालयातच लटकलेल्या अवस्थेत आढळल्याने खळबळ; लिहून ठेवलेली नोट सुद्धा सापडली, कार्यकर्त्यांचा विश्वास बसत नसल्याने प्रकरणाचे गूढ वाढलं
माजी उपसभापती, मंत्री अन् पाचवेळा आमदार; थेट पक्षाच्या कार्यालयातच लटकलेल्या अवस्थेत आढळल्याने खळबळ; लिहून ठेवलेली नोट सुद्धा सापडली, कार्यकर्त्यांचा विश्वास बसत नसल्याने प्रकरणाचे गूढ वाढलं
Embed widget