एक्स्प्लोर
आठ दिवसांपूर्वी प्रेमविवाह, एकाच झाडाला, एकाच दोरीने गळफास!
धुळ्यात प्रेम विवाह केलेल्या जोडप्याने एकाच झाडाला एकाच दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली
धुळे: आठ दिवसांपूर्वीच प्रेम विवाह केलेल्या दाम्पत्यानं, एकाच झाडाला एकाच दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली.
धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील धाडणे गावात आज सकाळी ही घटना उघडकीस आली. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
पोलिसांना घटनास्थळी सुसाईड नोटदेखील आढळून आली आहे.
साक्री तालुक्यातील धाडणे येथील कैलास रमेश बागुल आणि नाशिक जिल्ह्यातील अभोणा येथील दीपाली सोमनाथ चव्हाण या दोघांनी आठ दिवसांपूर्वीच प्रेम विवाह केला होता.
प्रेम विवाह केल्यानंतर झालेल्या मत-मतांतरांमुळे या जोडप्यानं आत्महत्या केल्याची माहिती पोलिसांनी दिली. मात्र असं असलं तरी आत्महत्येमागचं हेच कारण आहे की अजून दुसरे काही कारण आहे, याचा तपास पोलीस करत आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
विश्व
व्यापार-उद्योग
सोलापूर
महाराष्ट्र
Advertisement