एक्स्प्लोर
EXCLUSIVE : धनगर आरक्षणाचा मार्ग किती खडतर?
अत्यंत विश्वासार्ह सूत्रांच्या माहितीच्या आधारे या अभ्यास गटाने नोंदवलेल्या शक्यता एबीपी माझाच्या हाती आल्या आहेत.
उस्मानाबाद : धनगर समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसंदर्भात सर्वात मोठी बातमी आहे. धनगड या नावाच्या एका जातीचा एसटी कॅटेगरीमध्ये समावेश आहे. महाराष्ट्रातील धनगर आणि धनगड हे एकच आहेत. त्यामुळे धनगर समाजाला एसटीतून आरक्षण द्यावे अशी मागणी करणारी आंदोलन गेल्या काही वर्षांपासून महाराष्ट्रात सुरू आहेत.
धनगड आणि धनगर हे एकच का याचा अभ्यास करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने टाटा सामाजिक विज्ञान संस्थेचा एक अभ्यास गट दोन वर्षांपूर्वी नियुक्त केला होता. या अभ्यास गटाने महाराष्ट्र सरकारला आपला अहवाल सादर केला. अत्यंत विश्वासार्ह सूत्रांच्या माहितीच्या आधारे या अभ्यास गटाने नोंदवलेल्या शक्यता एबीपी माझाच्या हाती आल्या आहेत.
महाराष्ट्रातला धनगर समाज हाच धनगड का ? आणि समाजशास्त्र आणि मानववंशशास्त्राच्या आधारे धनगर समाज किती मागास आहे ?
या दोन प्रश्नांची उत्तर मिळवण्यासाठी फडणवीस सरकारने एक अभ्यास गट नेमला होता. टाटा सामाजिक विज्ञान संस्थेच्या या गटात 2016 नोव्हेंबरपासून अभ्यास सुरू केला.
या अभ्यास गटात मानववंशशास्त्राचे पाच समाजशास्त्राचे ४ अर्थशास्त्राचे ३ सामाजिक विज्ञान शास्त्राचे ३ लोकसंख्या शास्त्राचे २ आणि बरेचसे सांख्यिकी विभागाचे तज्ज्ञ सहभागी झाले होते. अभ्यास गटाने मध्य प्रदेश ओदिशा, झारखंड, छत्तीसगड आणि बिहार या पाच राज्यांचा अभ्यास केला. महाराष्ट्रातल्या ३२४ पैकी ११३ तालुक्यातली प्रत्येकी मोठी मध्यम आणि छोटी अशी तीन गाव सर्वेक्षणासाठी निवडण्यात आली.
या अभ्यास गटाने केलेल्या पहिल्या निष्कर्षांना धनगर समाजाची निराशा होण्याची शक्यता आहे.
अभ्यास गटांने धनगड आणि धनगर हे एक नाहीत असं मत नोंदवलं आहे. केंद्राच्या एसटीचा ३६ या क्रमांकावरचा आरक्षणाचा जात धनगडांना लाभ होतो ते धनगर नाहीत. बिहार झारखंड छत्तीसगड आणि मध्य प्रदेशमध्ये आढळणाऱया ओंराव जातीचे पोटजात आहे धनगड. आधी घनगडाचा धांगड असा उल्लेख होता. धांगडचेच धनगड झालेत आणि धनगड हे मूळचे आदिवासी आहेत.
अभ्यास समितीला ओडिसा मधल्या अभ्यासानंतर तिथल्या राज्य सरकारच्या अहवालानंतर असं लक्षात आलं विदर्भातल्या चंद्रपूरच्या बल्लारपूर पेपर मिल्ससाठी ब्रिटिशांनी आेंराव काही मंडळींना विदर्भात आणलं. ते आेंराव म्हणजे धनगड किंवा धांगड १९२१ जातनिहाय सर्वेक्षणात धनगडांची पहिल्यांदा नोंद आढळते. राज्याच्या नोंदणीमध्ये सुद्धा १९८० पर्यंत धनगड सापडतात परंतु धनगड धनगर एक नाहीत असं मोतअभ्यास गटाने नोंदवलं असण्याची शक्यता आहे.
धनगरांचा समाजशास्त्र आणि मानववंशशास्त्राच्या आधारे शैक्षणिक सामाजिक आणि आर्थिक मागासलेपण गटांनं तपासलं. महाराष्ट्रात धनगरांच्या सुमारे २३ पोटजाती आहेत. त्यापैकी विभागनिहाय कांही जातींचे मागासलेपण अभ्यासगटाला दिसलं.
- उत्तर महाराष्ट्रातले ठेलारी
- विदर्भातले कुरमार
- कोकणातला गवळी धनगर
- मध्य महाराष्ट्रातले सनगर, शेगर, हाटकर .
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement