एक्स्प्लोर
Advertisement
धस यांच्याविरोधात उपोषण, सतीश शिंदेंच्या भेटीसाठी धनंजय मुंडे मध्यरात्री रुग्णालयात
जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये सुरेश धस यांच्या पत्नीचा पराभव त्यांच्या नात्यातील सतीश शिंदे यांनी केला होता. त्यानंतर सतीश शिंदे आणि सुरेश धस हे कट्टर विरोधक म्हणून ओळखले जाऊ लागले.
बीड: राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन भाजपकडून विधानपरिषदेवर गेलेल्या सुरेश धस यांच्या आष्टी मतदारसंघांत भाजप विरुद्ध राष्ट्रवादी असा मोठा संघर्ष पहायला मिळतोय.
भाजपचे पदाधिकारी सतीश शिंदे यांनी सुरेश धस यांच्याविरोधात उपोषण सुरु केलं आहे. पोलिसांनी त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे. सतीश शिंदे हे सध्या रुग्णालयात आहेत. असं असताना, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी रात्री बारा वाजता रुग्णालयात जाऊन सतीश शिंदे यांची भेट घेतली आणि त्यांना उपोषण सोडायला लावलं.
जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये सुरेश धस यांच्या पत्नीचा पराभव त्यांच्या नात्यातील सतीश शिंदे यांनी केला होता. त्यानंतर सतीश शिंदे आणि सुरेश धस हे कट्टर विरोधक म्हणून ओळखले जाऊ लागले.
काही दिवसांपूर्वी आष्टी शहरातील जय हनुमान तालीम पाडण्यात आली. ही तालीम सतीश शिंदे यांच्या ताब्यात होती. मात्र मार्केट कमिटीच्या जागेत असलेली ही तालीम काढतेवेळी सुरेश धस त्याठिकाणी हजर होते, म्हणूनच तालीम पाडणाऱ्यांवर कारवाई करा, अशी मागणी सतीश शिंदे यांची आहे.
तसेच पिस्तुल लावून जीवे मारण्याची धमकी दिल्याने सुरेश धस यांच्यावर कारवाई करा अशी तक्रार सतीश शिंदे यांनी पोलिसांत दिली आहे.
याच मागण्यांसाठी सतीश शिंदे यांनी आपल्या समर्थकांसह आष्टी तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरु केले. उपोषणाच्या तीन दिवसानंतरही शिंदे यांनी उपचार घेण्यास नकार दिल्याने, पोलिसांनी त्यांना रुग्णालयात दाखल केले. याच काळामध्ये त्यांच्यावर प्रतिबंधात्मक जमावबंदीची कारवाई करण्यात आली आणि न्यायालयीन कोठडीमध्ये त्यांना ठेवण्यात आले. मात्र तरीही आंदोलनावर ठाम असलेल्या सतीश शिंदे यांनी रुग्णालयातच उपचार घेत, आंदोलन चालूच ठेवले.
काल रात्री बारा वाजता धनंजय मुंडे यांनी रुग्णालयात सतीश शिंदे यांची भेट घेतली आणि त्यांना उपोषण सोडायला लावले. भाजपमध्ये असलेल्या सतीश शिंदे यांचे उपोषण सोडायला राष्ट्रवादीचे धनंजय मुंडे रुग्णालयात आले आणि त्यांनी उपोषण सोडले. यामुळे बीडच्या राजकारणात नव्या चर्चांना उधाण आलं आहे.
यापुढे सतीश शिंदे हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचेही यावेळी जाहीर करण्यात आले.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
पुणे
निवडणूक
निवडणूक
Advertisement