एक्स्प्लोर

धनंजय मुंडेंच्या पोटाचं ऑपरेशन झालं, प्रकृतीविषयी डॉक्टरांची महत्त्वाची अपडेट, म्हणाले...

राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांना रुग्णालयात दाखल केल्याची बातमी समोर येत आहे. मागील दोन दिवसांपासून गिरगाव येथील रिलायन्स रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू असून प्रकृती स्थीर असल्याचे माहिती आहे

राज्याचे कृषीमंत्री व बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या तब्येबतीबाबत एक मोठी अपडेट समोर येत आहे. कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर पित्ताशयाची यशस्वी शस्त्रक्रिया झाली असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले आहे. आणखी 4-5 दिवस रुग्णालयातच विश्रांतीचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. दरम्यान,मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह दोन्ही उपमुख्यमंत्री, आमदार पंकजा मुंडे यांच्याकडून तब्येतीची विचारपूस करण्यात आली आहे.

राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर पित्ताशयाची यशस्वी शस्त्रक्रिया मुंबईतील सर एच.एन. रिलायन्स फाउंडेशन रुग्णालयात करण्यात आली आहे. त्यांना अनेक दिवसांपासून पित्त व पोटदुखीचा त्रास होता. मात्र सतत दौरे, सभा, कामकाज यामुळे त्यांचे प्रकृतीकडे दुर्लक्ष होत होते. मात्र आता पोटदुखीचा त्रास वाढल्याने शस्त्रक्रिया करावी लागली आहे. 

आणखी ४-५ दिवस उपचार घेण्याचा सल्ला

मुंबईच्या गिरगाव भागातील सर एच.एन. रिलायन्स फाउंडेशन रुग्णालयात मुंडेंच्या पित्ताशयावर (gall bladder) डॉ.अमित मायदेव यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. बुधवारी (ता.24) त्यांना दवाखान्यात दाखल करण्यात आले होते, त्यानंतर शुक्रवारी (ता.26) त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. धनंजय मुंडे यांची प्रकृती आता स्थिर असून, डॉक्टरांनी आणखी चार ते पाच दिवस रुग्णालयातच विश्रांती व पुढील उपचार घेण्याचा सल्ला दिला आहे. 

मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी केली तब्येतीची चौकशी

दरम्यान राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुंडेंच्या तब्येतीची दूरध्वनीवरून विचारपूस करत काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे. तसेच भाजप आमदार पंकजा मुंडे यांच्यासह माजी खासदार प्रीतमा मुंडे यांनी देखील रुग्णालयात धनंजय मुंडे यांची भेट घेऊन तब्येतीची विचारपूस केली आहे.

पित्ताशयाचा त्रासामुळे रुग्णालयात उपचार 

कृषिमंत्री धनंजय मुंडे यांना पित्ताशयाचा त्रास झाल्यामुळे गिरगाव येथील रुग्णालयात दाखल केले होते. मागील दोन दिवसांपासून त्यांच्यावर उपचार करण्यात येत असून पित्ताशयाची पिशवी काढण्याची शस्त्रक्रिया रविवारी पार पडली आहे. सध्या धनंजय मुंडेंची प्रकृती स्थिर असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. सध्या धनंजय मुंडे यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती असून याबाबत रुग्णालय प्रशासनाकडून कोणतीही माहिती मिळालेली नाही. मागील काही दिवसांपासून पित्ताशयाचा त्रास त्यांना होत असल्याने मुंबईतील गिरगावातील रिलायन्स हॉस्पीटलमध्ये त्यांना हलवण्यात आले होते. मागील दोन दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरु असून रविवारी पित्ताशयाची पिशवी काढण्यात आली. दरम्यान, मुंडे यांची प्रकृती स्थिर असल्याचेही सांगण्यात येत आहे .

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nitish Kumar : भाजपच्या उपमुख्यमंत्र्यांचं वक्तव्य अन् नितीशकुमारांची शांतता, बिहारच्या राजकारणात नेमकं काय घडणार? राजदची भूमिका काय असणार?
नितीशकुमारांच्या शांततेतून राजकीय वादळाचे संकेत की आणखी काही? एनडीए सोडणं जदयूला सोपं आहे का?
दोन भावांची भांडणं सोडवायला गेला, मध्यस्थी करणाऱ्या सचिनचाच खून झाला; आरोपीला पोलिसांनी उचचलं
दोन भावांची भांडणं सोडवायला गेला, मध्यस्थी करणाऱ्या सचिनचाच खून झाला; आरोपीला पोलिसांनी उचचलं
पुढील अडीच वर्षात काय होईल ते आज सांगता येणार नाही; सत्काराच्या भाषणात अब्दुल सत्तांरांनी सगळंच काढलं
पुढील अडीच वर्षात काय होईल ते आज सांगता येणार नाही; सत्काराच्या भाषणात अब्दुल सत्तांरांनी सगळंच काढलं
Shirdi News : नववर्षात शिर्डी संस्थानचा मोठा निर्णय; सर्वसामान्य भाविकाला थेट आरतीचा मान, साई दरबारीही पंढरीचा पॅटर्न
नववर्षात शिर्डी संस्थानचा मोठा निर्णय; सर्वसामान्य भाविकाला थेट आरतीचा मान, साई दरबारीही पंढरीचा पॅटर्न
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Milind Narvekar On X Post : फडणवीसांचे गुणगान,  मिलिंद नार्वेकरांच्या X पोस्टचा अर्थ काय?Naresh Mhaske : ठाकरेंचे मुंबईतील आमदार पक्ष सोडणार? नरेश म्हस्केंचं खळबळजनक वक्तव्यRaj Thackeray On Marathi Manus : मराठी हल्ला केल्यास मराठी म्हणून अंगावर येईनDevendra Fadnavis Gadchiroli : गडचिरोलीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते विविध कामांच्या उद्धाटन

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nitish Kumar : भाजपच्या उपमुख्यमंत्र्यांचं वक्तव्य अन् नितीशकुमारांची शांतता, बिहारच्या राजकारणात नेमकं काय घडणार? राजदची भूमिका काय असणार?
नितीशकुमारांच्या शांततेतून राजकीय वादळाचे संकेत की आणखी काही? एनडीए सोडणं जदयूला सोपं आहे का?
दोन भावांची भांडणं सोडवायला गेला, मध्यस्थी करणाऱ्या सचिनचाच खून झाला; आरोपीला पोलिसांनी उचचलं
दोन भावांची भांडणं सोडवायला गेला, मध्यस्थी करणाऱ्या सचिनचाच खून झाला; आरोपीला पोलिसांनी उचचलं
पुढील अडीच वर्षात काय होईल ते आज सांगता येणार नाही; सत्काराच्या भाषणात अब्दुल सत्तांरांनी सगळंच काढलं
पुढील अडीच वर्षात काय होईल ते आज सांगता येणार नाही; सत्काराच्या भाषणात अब्दुल सत्तांरांनी सगळंच काढलं
Shirdi News : नववर्षात शिर्डी संस्थानचा मोठा निर्णय; सर्वसामान्य भाविकाला थेट आरतीचा मान, साई दरबारीही पंढरीचा पॅटर्न
नववर्षात शिर्डी संस्थानचा मोठा निर्णय; सर्वसामान्य भाविकाला थेट आरतीचा मान, साई दरबारीही पंढरीचा पॅटर्न
Adani Group News: तामिळानाडू सरकारकडून स्मार्ट मीटर प्रकल्पाचं टेंडर रद्द, अदानी ग्रुपच्या कंपनीनं लावलेली सर्वात कमी दरावर बोली 
तामिळानाडू सरकारकडून स्मार्ट मीटर प्रकल्पाचं टेंडर रद्द, अदानी ग्रुपच्या कंपनीनं लावलेली सर्वात कमी दरावर बोली
राजन साळवी शिवसेनेला जय महाराष्ट्र करणार?; उद्धव ठाकरेंसोबत फोनवर चर्चा, दोन दिवसांत निर्णय
राजन साळवी शिवसेनेला जय महाराष्ट्र करणार?; उद्धव ठाकरेंसोबत फोनवर चर्चा, दोन दिवसांत निर्णय
अभिनेता एजाज खानकडून दोघांना मारहाण, व्हिडिओ व्हायरल; 31 डिसेंबरच्या 2 घटना, पोलिसांकडून दखल
अभिनेता एजाज खानकडून दोघांना मारहाण, व्हिडिओ व्हायरल; 31 डिसेंबरच्या 2 घटना, पोलिसांकडून दखल
अमेरिका हादरली,नववर्षाचा जल्लोष करणाऱ्यांना चारचाकी वाहनानं चिरडलं अन् गोळीबार,12 जणांचा मृत्यू 30 जखमी, दहशतवादी हल्ल्याचा दावा
अमेरिकेत नववर्षाचा जल्लोष करणाऱ्यांवर कार चढवली, अंदाधुंद गोळीबार,12 जणांचा मृत्यू,दहशतवादी हल्ल्याचा दावा
Embed widget