एक्स्प्लोर

कोल्हापुरात महाडिक, रायगडातून तटकरेंच्या उमेदवारीला हिरवा कंदिल

राष्ट्रवादीतील अंतर्गत वाद मिटवण्यात पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना यश आलं आहे. कोल्हापुरातून धनंजय महाडिक, तर रायगडमधून सुनिल तटकरे यांच्या उमेदवारीचा मार्ग मोकळा झाला आहे

मुंबई : लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीच्या गोटात हालचालींना वेग आला आहे. कोल्हापुरातून धनंजय महाडिक, तर रायगडमधून सुनिल तटकरे यांच्या उमेदवारीला हिरवा कंदील मिळाला आहे. धनंजय महाडिक हे कोल्हापूर मतदारसंघातून लोकसभेचे खासदार आहेत. मात्र धनंजय महाडिकांच्या उमेदवारीला माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे आमदार हसन मुश्रीफ यांचा विरोध होता. मात्र राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी बैठक घेऊन अंतर्गत वाद मिटवल्याची माहिती आहे. त्यामुळे महाडिकांच्या उमेदवारीचा मार्ग मोकळा झाला. दुसरीकडे, रायगडमधला वाद सोडवण्यातही शरद पवारांना यश आलं आहे. रायगडमधून निवडणूक लढवण्यास माजी मंत्री आणि आमदार भास्कर जाधव इच्छुक होते. मात्र शरद पवारांनी तटकरेंच्या बाजूने कौल दिल्यामुळे त्यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. याआधीच पुणे लोकसभा मतदारसंघाचा हट्ट राष्ट्रवादीने सोडला होता. शरद पवार निवडणूक लढवण्यास तयार नसल्याने राष्ट्रवादीने पुण्याच्या जागेवरील हट्ट सोडला. त्यामुळे जागावाटपात पुणे लोकसभा मतदारसंघ राखण्यात काँग्रेसला यश आलं. शरद पवारांनी पुण्याची जागा लढवावी, असा राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांचा आग्रह होता. परंतु आपण 2019 ची लोकसभा निवडणून लढवणार नाही, असं पवारांनी स्पष्ट केलं होतं. 2014 लोकसभा निवडणुकीवेळी काँग्रेसच्या डॉ. विश्वजीत पतंगराव कदम पुण्याच्या जागेवर लढले होते. इथे भाजपच्या अनिल शिरोळे यांचा विजय झाला होता. अहमदनगर, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, नंदुरबार, यवतमाळ, औरंगाबाद आणि रावेर या सहा जागांवरुन काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात चर्चा सुरु आहे. विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे सुपुत्र सुजय विखे पाटील लोकसभा निवडणूक लढवण्याच्या तयारीत असल्याची माहिती आहे. सुजय विखे पाटील यांच्यासाठी काँग्रेसने अहमदनगरची जागा मागितल्याची चर्चा आहे. तर राष्ट्रवादीने काँग्रेसकडे पुणे आणि काँग्रेस नेत्या प्रिया दत्त यांची उत्तर-मध्य मुंबईची जागा मागितल्याचंही म्हटलं जातं. त्यापैकी पुण्याचा तिढा सुटला.

महत्त्वाच्या बातम्या

लोकशाही मार्गाने आंदोलन करु देणार नसाल तर जगायंच कसं? विद्यार्थ्यांसाठी मनोज जरांगे पाटील मैदानात, उद्या थेट दिल्ली गाठणार
लोकशाही मार्गाने आंदोलन करु देणार नसाल तर जगायंच कसं? विद्यार्थ्यांसाठी मनोज जरांगे पाटील मैदानात, उद्या थेट दिल्ली गाठणार
AI तंत्रज्ञानाच्या मदतीने अंधत्वावर मात; गडचिरोली जिल्हा परिषदेचा उपक्रम, 34 विद्यार्थ्यांच्या हाती अत्याधुनिक स्मार्ट उपकरणे
AI तंत्रज्ञानाच्या मदतीने अंधत्वावर मात; गडचिरोली जिल्हा परिषदेचा उपक्रम, 34 विद्यार्थ्यांच्या हाती अत्याधुनिक स्मार्ट उपकरणे
Sonam wangchuk: उद्धव ठाकरे जंतरमंतरवर, राज ठाकरे आझाद मैदानात; नीट पेपरफुटीवरुन ठाकरे बंधू थेट आंदोलनात, काँग्रेसंही रस्त्यावर
उद्धव ठाकरे जंतरमंतरवर, राज ठाकरे आझाद मैदानात; नीट पेपरफुटीवरुन ठाकरे बंधू थेट आंदोलनात, काँग्रेसंही रस्त्यावर
आषाढी एकादशीपर्यंत पावसाचा जोर कायम राहणार, द्वादशीपासून उघडीप, राज्यात नेमकं कसं असणार हवामान?
आषाढी एकादशीपर्यंत पावसाचा जोर कायम राहणार, द्वादशीपासून उघडीप, राज्यात नेमकं कसं असणार हवामान?

व्हिडीओ

Priyanka Gandhi On CJP Protest : पोलिसांच्या ताब्यातून सुटका, प्रियांका गांधींची पहिली प्रतिक्रिया
Raj Thackeray on Delhi : पोलिसांचा विद्यार्थ्यांवर बेछूट लाठीमार, राज ठाकरेंनी केंद्र सरकारला सुनावलं
Sandeep Deshpande:मोदींपेक्षा जास्त अहंकार अश्विनी भिडेंना; चेंबूर दुर्घटनेवरून संदीप देशपांडे भडकले
Sanjay Raut PC : 20 जुलै हा लोकशाहीतील 'डरपोक दिवस' म्हणून साजरा करा; संजय राऊत आक्रमक
Delhi CJP Protest | जंतर-मंतर ते सफदरजंग, वांगचुक-दिपके आंदोलनाचा निर्णायक दिवस | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sonam wangchuk: उद्धव ठाकरे जंतरमंतरवर, राज ठाकरे आझाद मैदानात; नीट पेपरफुटीवरुन ठाकरे बंधू थेट आंदोलनात, काँग्रेसंही रस्त्यावर
उद्धव ठाकरे जंतरमंतरवर, राज ठाकरे आझाद मैदानात; नीट पेपरफुटीवरुन ठाकरे बंधू थेट आंदोलनात, काँग्रेसंही रस्त्यावर
शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी काँग्रेसचं दिल्लीत आंदोलन, राहुल गांधींसह महाराष्ट्रातील खासदारही पोलिसांच्या ताब्यात
शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी काँग्रेसचं दिल्लीत आंदोलन, राहुल गांधींसह महाराष्ट्रातील खासदारही पोलिसांच्या ताब्यात
AI तंत्रज्ञानाच्या मदतीने अंधत्वावर मात; गडचिरोली जिल्हा परिषदेचा उपक्रम, 34 विद्यार्थ्यांच्या हाती अत्याधुनिक स्मार्ट उपकरणे
AI तंत्रज्ञानाच्या मदतीने अंधत्वावर मात; गडचिरोली जिल्हा परिषदेचा उपक्रम, 34 विद्यार्थ्यांच्या हाती अत्याधुनिक स्मार्ट उपकरणे
Uddhav Thackeray : एका राजीनाम्यानं चालणार नाही, व्यवस्था बदलावी लागेल, सरकार बदलत नाही तोपर्यंत आयुष्य बदलणार नाही : उद्धव ठाकरे
भाषण करायला नाही युवा शक्तीला नमन करायला आलोय, उद्धव ठाकरेंच्या जंतरमंतरवरील भाषणाला जोरदार प्रतिसाद
Rahul Gandhi : राहुल गांधींची नीट पेपरफुटीवरील संसदेतील चर्चेची मागणी मान्य, धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर जितेंद्र सिंह नेमकं काय म्हणाले? 
राहुल गांधींची नीट पेपरफुटीवरील संसदेतील चर्चेची मागणी मान्य, धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर जितेंद्र सिंह नेमकं काय म्हणाले? 
अमरावतीतून वारी, काठी टेकत आली 80 वर्षांची आजी; कलेक्टरांनी दिलं विठ्ठलाचं VIP दर्शन, पुंडलिकाची आठवण
अमरावतीतून वारी, काठी टेकत आली 80 वर्षांची आजी; कलेक्टरांनी दिलं विठ्ठलाचं VIP दर्शन, पुंडलिकाची आठवण
दिल्लीत नरेंद्र मोदींच्या घरासमोर राडा, पोलिसांनी राहुल गांधींना उचललं; प्रियंका गांधींसह माजी मुख्यमंत्रीही ताब्यात
दिल्लीत नरेंद्र मोदींच्या घरासमोर राडा, पोलिसांनी राहुल गांधींना उचललं; प्रियंका गांधींसह माजी मुख्यमंत्रीही ताब्यात
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 21 जुलै 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 21 जुलै 2026 | मंगळवार
Embed widget