Ashadhi Wari 2022 : रुक्मिणी मातेची पालखी पंढरपूरकडे रवाना, ठिकठिकाणी होणार स्वागत
Ashadhi Wari 2022 : रुक्मिणी मातेची (Devi Rukmini) पालखी आज पंढरपूरकडे रवाना झाली आहे. टाळ मृदंग, वीणाच्या गजरात भगवा पताका घेऊन आणि श्री नामाच्या जयघोषात वारकरी बांधव यात सहभागी होणार आहेत.
Ashadhi Wari 2022 : रुक्मिणी मातेची (Devi Rukmini) पालखी आज सासरी म्हणजे पंढरपूरकडे रवाना झाली आहे. आषाढी एकादशीला (Ashadhi Ekadashi) दरवर्षी रुक्मिणीच्या पादुका पालखीत घेऊन वारकरी सासरी म्हणजेच पंढरपूरला जातात. 400 वर्षांपासून ही चालत आलेली सर्वात जुनी परंपरा आहे.
कोरोना नंतर प्रथमच आज सायंकाळी पाच वाजता पायदळी पालखी निघाली आहे. 10 पालख्यातील विदर्भातील एकमेव पालखी म्हणजे कौंडण्यपूर येथील रुक्मिणीची माहेरची पालखी आहे. टाळ मृदंग, वीणाच्या गजरात भगवा पताका घेऊन आणि श्री नामाच्या जयघोषात वारकरी बांधव यात सहभागी होणार आहेत. या पालखीचे जागोजागी स्वागत होईल.
राज्यभरातील विविध ठिकाणांहून दरवर्षी आषाढी एकादशीच्या निमित्ताने संतांच्या पालख्या पंढरपुरला येत असतात. परंतु, अमरावतीमधील कौंडण्यपूर येथून निघणारी रुक्मिणी देवीची ही एकमेव देवीची पालखी आहे.
आषाढी एकादशी काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. त्यामुळे अनेक पालख्या पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान होत असतात. दरवर्षी एकादशी निमित्त होणाऱ्या पंढरपूरच्या वारीला कोरोनामुळे गेल्या दोन वर्षांपासून भाविक मुकले होते. परंतु, आता कोरोनाचे हे संटक काहीशा प्रमाणात कमी झाले आहे. त्यामुळे यंदा पायी वारीला परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे अमरावती जिल्ह्यातील कौंडण्यपूर येथील आई रुक्मिणीची पालखी आषाढी यात्रेनिमित्त पंढरपूरला निघाली आहे.
कौंडण्यपूरमध्ये कार्तिकी एकादशीला मोठी यात्रा
श्री क्षेत्र कौंडण्यपूर हे श्रीकृष्णपत्नी रुक्मिणीचे माहेर आहे. येथे कार्तिकी एकादशीला मोठी यात्रा भरते. शिवाय आषाढी एकादशीला येथून सुमारे 425 वर्षांपासून पालखी पंढरपूरला जाते. रुक्मिणी मातेची पालखी ही पहिली मानाची पालखी मानली जाते.
दरम्यान, नाशिक येथील मुक्ताईनगरहून संत मुक्ताईच्या पालखीचं आज जयघोषात पंढरीकडे प्रस्थान झाले आहे. तर यंदाच्या आषाढी वारीसाठी गजानन महाराजांच्या पालखीचे 6 जूनला प्रस्थान होणार आहे. आळंदी येथून संत ज्ञानेश्वरांच्या पालखीचे प्रस्थान 21 जूनला तर संत तुकारामांच्या पालखीचे प्रस्थान 20 जूनला होणार आहे.
महत्वाच्या बातम्या