Devendra Fadnavis : वसुलीबाजांना सोडणार नाही, सगळ्यांच्यावर कारवाई करणार; मस्साजोग सरपंच हत्याकांडावर देवेंद्र फडणवीस यांचे एका वाक्यात उत्तर
Maharashtra Assembly Session : बीडमधील केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुखांची हत्या करण्यात आली आहे. या प्रकरणात पाच आरोपींना अटक करण्यात आली असून इतर दोन आरोपी फरार आहेत.
Santosh Deshmukh Murder Case : गेल्या काही दिवसांपासून राज्यात गाजणाऱ्या बीडमधील मस्साजोग सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका उत्तर दिलं आहे. राज्यातल्या सगळ्या वसुलीबाजांवर कारवाई केल्याशिवाय राहणार नाही असं फडणवीस म्हणाले. सरपंच संतोष देशमुख हत्येवर देवेंद्र फडणवीस शुक्रवारी सकाळी सविस्तर निवेदन देणार असल्याची माहिती आहे. राज्याचे मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड यांच्यावर पवनचक्की कंपनीकडून दोन कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप आहे. याच प्रकरणातील आरोपींनी संतोष देशमुखांची हत्या केली आहे.
सगळ्या वसुलीबाजांवर कारवाई केल्यास महाराष्ट्रात गुंतवणूकदार येतील आणि राज्याचा विकास होईल असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
आमदार-खासदारांनी आवाज उठवला
बीडमधील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी भाजपचे आमदार सुरेश धर, नमिता मुंडदा, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागर, जितेंद्र आव्हाड यांनी विधानसभेत आवाजा उठवला होता. त्याचसोबत माजी खासदार छत्रपती संभाजीराजे आणि रजनी पाटील यांनीही या प्रकरणी सरकारवर टीका केली होती. तर बीडचे खासदार बजरंग सोनावणे यानी संसदेत यावर आवाज उठवला होता.
मुंडेंचे निकटवर्तीय वाल्मिक कराड यांच्यावर खंडणीचा गुन्हा
या प्रकरणी प्रश्न विचारलेल्या सर्वच आमदारांनी आणि नेत्यांनी राज्याचे मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड यांचे नाव घेतलं होतं. ज्या पवनचक्की प्रकरणातील वादातून संतोष देशमुखांची हत्या करण्यात आली होती त्याच पवनचक्कीकडे दोन कोटींची खंडणी मागितल्या प्रकरणी वाल्मिक कराड यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात सात जणांवर गुन्हा नोंदवला असून त्यापैकी पाच जणांना पोलिसांनी अटक केली आहे. हे सर्वच आरोपी वाल्मिक कराड यांच्याशी संबंधित आहेत.
ईव्हीएमवर शंका उपस्थित करणाऱ्यांवर टीका
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, निकाल आपल्या बाजूने लागला तर जनतेचा निकाल आणि निकाल दुसऱ्या बाजून लागला तर ईव्हीएम दोषी असं विरोधकांचं सुरू आहे. हा लोकशाहीचा एक प्रकारे खून आहे. पवार साहेब यांनी कधीही ईव्हीएमचा मुद्दा काढला नाही. मात्र यावेळी त्यांनी मुद्दा काढला. ते म्हणाले की छोटे राज्य आम्हाला देतात आणि मोठे ते घेतात. पवार साहेबांचं मला नवल वाटलं. पवारांनी कधीही ईव्हीएमबद्दल टिप्पणी केली नाही. पण यावेळी तेही बोललेत. आता तर ओमर अब्दुल्ला आणि ममता बॅनर्जी यांनी म्हटलंय की ईव्हीएमवर बोलू नका. ज्या ठिकाणी तुम्ही हरता त्या ठिकाणी जाऊन लोकांना उसकवता.लोकशाहीत ही दादागिरी नाही खपवून घेतली जाणार नाही.
ही बातमी वाचा :