एक्स्प्लोर

Devendra Fadnavis : अजित पवार पुन्हा मुख्यमंत्री होण्याच्या चर्चा? फडणवीसांनी सोडले मौन म्हणाले आता बदल नाहीच

अजित पवार मुख्यमंत्री होणार या चर्चांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट विधानसभेत आपल्या शैलीत  उत्तर दिले आहे.

मुंबई : राष्ट्रवादीत बंडाळी करून पक्षावर दावा केलेल्या अजित पवार (Ajit Pawar) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यात झालेल्या वाटाघाटीनुसार संसदेचे पावसाळी अधिवेशन संपल्यानंतर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी अजित पवार विराजमान होणार अशा चर्चांना सध्या  राजकीय वर्तुळात उधाण आले आहे. अजित पवार यांचे समर्थक, कार्यकर्त्यांकडून अजित पवारांचे मुख्यमंत्री म्हणून झळकावले जातात. विशेष म्हणजे विरोधी पक्षातील नेत्यांकडून देखील सातत्याने वेगवेगळ्या तारखा देण्यात येतात. मात्र आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट विधानसभेत आपल्या शैलीत  उत्तर दिले आहे. 2019 सालापासून राज्यातील जनतेने अनेक बदल पाहिले आहेत. आता मात्र कोणतेही बदल होणार नाहीत, असे म्हणत अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदांच्या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. 

विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांचे अभिनंदन करताना देवेंद्र फडणवीस आज सभागृहात बोलत होते. देवेंद्र फडणवीस म्हणाले, 2019 साल हे खास वर्ष आहे. 2019 साली अनेक विक्रम झाले.  एक विक्रम मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा आहे. 2019 सालचे  हिरो एकनाथ शिंदे आहेत आणि आता दुसरे हिरो अजित पवार आहेत. अजित पवार पहिल्यांदा उपमुख्यमंत्री झाले त्यानंतर परत उद्धव ठाकरे यांच्यासोबत उपमुख्यमंत्री आणि त्यानंतर विरोधी पक्षनेते झाले आणि आता उपमुख्यमंत्री झाले. राज्याच्या जनतेने अनेक बदल पाहिले आता मात्र कोणताही बदल होणार नाही

मुख्यमंत्रीपदाच्या चर्चांचे अजित पवारांनी केले खंडण

मुख्यमंत्रीपदाबाबत स्वत: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी  या अगोदर देखील प्रसारमाध्यमांसमोर स्पष्ट भूमिका मांडली आहे.आज तर थेट त्यांनी विधानसभेतच आपली भूमिका मांडली आहे . दोन दिवसापूर्वी पुणे दौऱ्यात देखील अजित पवारांनी आपली बाजू मांडली होती. अजित पवार म्हणाले होते,  राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेच आहेत.मी आणि देवेंद्र फडणवीस  आम्ही दोघे उपमुख्यमंत्री म्हणून जबाबदारी म्हणून काम करतोय. त्यामुळे आम्हाला मिळालेली जबाबदारी तर नीट पार पाडू द्या. कार्यकर्त्यांचं समाधान होण्याकरता त्यांनी मुख्यमंत्रीपदाचे बॅनर लावले असावेत.

येत्या काळात आणखी एक राजकीय अंक रंगण्याची शक्यता

एकनाथ शिंदे-देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्याने, विद्यमान मुख्यमंत्री लवकरच पदावरून बाजूला होतील आणि त्यांच्या जागी पवार येतील, अशी अटकळ बांधली जात आहे. दरम्यान, भाजपकडून अजित पवारांना मुख्यमंत्रीपदाची ऑफर असल्याचा दावा पृथ्वीराज चव्हाण, शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला होता. त्यामुळे राज्यात येत्या काळात आणखी एक राजकीय अंक रंगण्याची शक्यता नाकारता येत नाही. 

हे ही वाचा :

Ajit Pawar: अजित पवार थेट मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीत, एकनाथ शिंदेंचं स्टिकर काढून दादा विराजमान!

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
Morocco to cull 3 million stray dogs : 30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
Walmik Karad Property: कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 11 PM 18 January  2024Special Report Saif Ali Khan : करिनाचा जबाब, कोणते धागेदोरे? करिनाने सांगितला हत्येचा घटनाक्रमBeed Santosh Deshmukh Accuse CCTV : संतोष देशमुख यांच्या आरोपींचे तिरंगा हॉटेल येथिल CCTV पोलिसांच्या हातीABP Majha Marathi News Headlines 10 PM TOP Headlines 10 PM 18 January  2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
Morocco to cull 3 million stray dogs : 30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
Walmik Karad Property: कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
Nashik Crime : खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
Rohit Sharma : बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
Beed News : बीडमध्ये महिला सरपंचाकडे खंडणीची मागणी, महिलेचा गंभीर इशारा; म्हणाल्या, आम्हाला न्याय द्या,नाहीतर...
बीडमध्ये महिला सरपंचाकडे खंडणीची मागणी, महिलेचा गंभीर इशारा; म्हणाल्या, आम्हाला न्याय द्या,नाहीतर...
Embed widget