एक्स्प्लोर

Devendra Fadnavis : शिंदे गटाचे खासदार निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणार, बारामतीसह 16 मतदारसंघाकडे विशेष लक्ष : देवेंद्र फडणवीस 

तुम्ही विचार करताय त्यापेक्षाही मंत्रीमंडळाचा विस्तार लवकरच होईल असे मत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी व्यक्त केलं.

Devendra Fadnavis : तुम्ही विचार करताय त्यापेक्षाही मंत्रीमंडळाचा विस्तार लवकर होईल असे मत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी व्यक्त केलं. सर्वोच्च न्यायालयानं मंत्रीमंडळाचा विस्तार करु नका, असे कुठेही म्हटलं नाही. न्यायालयातील सुनावणीचा आणि मंत्रीमंडळ विस्ताराचा कोणाताही संबध नसल्याचे फडणवीस म्हणाले. शिंदे गट आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावं अशी चर्चा अनेकजण करत आहेत. यासंबंधी फडणवीस यांना प्रश्न विचारण्यात आला. यावेळी ते म्हणाले की, कोण काय म्हणतंय याला काही महत्व नाही. त्यावर उत्तरं द्यायला मी काही रिकामटेकडा नाही. परिस्थिती काय आहे याला राजकारणात महत्व असते असे फडणवीस म्हणाले. तसेच शिंदे गटाचे खासदार निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही ते म्हणाले. केवळ भावनिक भाषण देऊन जनता सोबत येत नसते असा नाव न घेता टोलाही फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना लगावला. 

बारामती लोकसभा मतदारसंघाचे प्रभारी म्हणून अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांना जबाबदारी

भाजपने गेल्या सहा महिन्यापासून लोकसभेच्या 16 मतदारसंघामध्ये विशेष लक्ष देण्यास सुरुवात केली आहे. या मतदारसंघामध्ये बारामती लोकसभा मतदारसंघ देखील आहे. गेल्या दोन निवडणुकांमध्ये बारामती मतदारसंघात आम्हाला चांगली मते मिळाली आहेत. त्यामुळे तो मतदारसंघ 16 मतदारसंघात आहेत. या मतदारसंघासाठी काही केंद्रीय नेते प्रभारी म्हणून देण्यात आले आहेत. बारामती मतदारसंघाची जबाबदारी अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांना दिली आहे. त्या सप्टेंबरमध्ये बारामतीत येमार असल्याचे फडणवीस यांनी सांगितले. 

पुढची लोकसभेची निवडणूक ही शिवसेना आणि भाजप युतीत लढणार

विशेष लक्ष असलेल्या 16 मतदारसंघामध्ये श्रीकांत शिंदे यांचा देखील मतदारसंघ होता. पण जे लोक आता युतीत आमच्यासोबत आहेत. त्यांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे फडणवीस म्हणाले. पुढची लोकसभेची निवडणूक ही आम्ही शिवसेना आणि भाजप अशा युतीत लढणार आहोत. त्यामुळं जे आमच्यासोबत आहेत, त्यांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं फडणवीसांनी सांगितलं. आमची शक्ती त्यांना निवडून आणण्यासाठी खर्ची घालणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. 

फडणवीसांचा अजित पवारांना टोला

मंत्रालयाचे सचिवालय झाले असल्याची टीका होत आहे. याबाबत फडणवीस यांना प्रसारमाध्यमांनी प्रश्न विचारला. यावेळी ते म्हणाले की, माहिती असतानाही राजकाराणासाठी अशी डायलॉगबाजी केली जाते. गेल्या सरकारमध्येही देखील सचिवांना काही अधिकार दिले होते. तसेच आमच्या सरकारमध्येही अनेक मंत्र्यांनी सचिवांना काही अधिकार दिले होते असे फडणवीस म्हणाले. ही महाराष्ट्रात नाही तर देशात परंपरा असल्याचं त्यांनी सांगितले. अजित पवार हे विरोधी पक्षनेते आहेत, त्यामुळं त्यांना आता बोलावेच लागेल. त्यामुळं त्यांना हे विसरावे लागेल की त्यांचा काळातही 30 ते 32 दिवस पाचच मंत्री होते असा टोला पडणवीसांनी अजित पवारांना लगावला.

भावनिक भाषण देऊन जनता सोबत येत नसते, उद्धव ठाकरेंना फडणवीसांचा टोला

ज्यावेळी तुम्ही सत्तेत असता त्यावेळी तुम्ही मराठवाडा, कोकण, विदर्भासाठी काय केलं याच्या आधारवर जनता मूल्यमापन करत असते. केवळ भावनिक भाषण देऊन जनता सोबत येत नसते असा टोलाही फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना लगावला. त्यांनी त्यांच्या पक्षाचे काम करावं आम्ही आमच्या पक्षाचं काम करत असल्याचे फडणवीस म्हणाले. तसेच ग्रामपंचायत निवडणुकीत आमच्या युतीला राज्यातील जनतेनं कौल दिला असल्याचे फडणवीस म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या:

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live blog updates: सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचा निकाल, सुनेत्रा पवारांच्या पॅनलने खातं उघडलं
Maharashtra Live blog updates: सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचा निकाल, सुनेत्रा पवारांच्या पॅनलने खातं उघडलं
Kirit Somaiya On Actor Imran Khan: इमरान खान भारताचा नागरिक नव्हे...; किरीट सोमय्या पोलीस स्थानकांत पोहोचले, म्हणाले, खपवून घेतले जाणार नाही!
इमरान खान भारताचा नागरिक नव्हे...; किरीट सोमय्या पोलीस स्थानकांत पोहोचले, म्हणाले, खपवून घेतले जाणार नाही!
Sanjay Raut on Delhi Protest: दिल्लीतील त्या कारमध्ये सापडले पोलिसांचे गणवेश, खाकी वर्दीतील गुंडांकडून आंदोलकांना मारहाण? संजय राऊतांनी शेअर केला धक्कादायक व्हिडीओ
दिल्लीतील त्या कारमध्ये सापडले पोलिसांचे गणवेश, खाकी वर्दीतील गुंडांकडून आंदोलकांना मारहाण? संजय राऊतांनी शेअर केला धक्कादायक व्हिडीओ
Jalgaon Crime News: लग्न होताच सासू-सासऱ्यांना विषारी औषध दिलं; नवरी आणि करवलीचा डेंजर प्लॅन, जळगावमधील थरकाप उडवणारी घटना
लग्न होताच सासू-सासऱ्यांना विषारी औषध दिलं; नवरी आणि करवलीचा डेंजर प्लॅन, जळगावमधील थरकाप उडवणारी घटना

व्हिडीओ

Shetitil Navdurga | Swati Kushare |‘शेतकरी’ म्हणवून घेण्याचा संकोच होता… आज त्याच ओळखीचा अभिमान आहे!
Majha Katta Dr. Abhijit Joshi : जेवण कसं जेवावं?नियम काय? आयुर्वेदात काय? डॉ.अभिजीत जोशी माझा कट्टावर | ABP Majha
Sanjay Raut PC : मोदी सरकार 6-7 महिन्यात दिसणार नाही, राऊतांचा मोठा दावा
Mann Suddha Tujha Season 3 : मंत्रचळ | मन सुद्ध तुझं | Episode 2 ABP Majha
Shetitil Navdurga : Sunita Raite : शिलाईच्या सुईपासून अवजार बँकेपर्यंत स्वावलंबनाचा प्रवास!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi on PM Modi: 'मोदीजी आपल्या सरकारमधील 200 अधिकारी आमच्या संपर्कात; ED, CBI ची आतली माहिती आम्हाला देत आहेत, त्यामुळे तुम्ही..' राहुल गांधींचा सनसनाटी गौप्यस्फोट
'मोदीजी आपल्या सरकारमधील 200 अधिकारी आमच्या संपर्कात; ED, CBI ची आतली माहिती आम्हाला देत आहेत, त्यामुळे तुम्ही..' राहुल गांधींचा सनसनाटी गौप्यस्फोट
Sanjay Raut on Delhi Protest: दिल्लीतील त्या कारमध्ये सापडले पोलिसांचे गणवेश, खाकी वर्दीतील गुंडांकडून आंदोलकांना मारहाण? संजय राऊतांनी शेअर केला धक्कादायक व्हिडीओ
दिल्लीतील त्या कारमध्ये सापडले पोलिसांचे गणवेश, खाकी वर्दीतील गुंडांकडून आंदोलकांना मारहाण? संजय राऊतांनी शेअर केला धक्कादायक व्हिडीओ
Gold Silver Rate : सोन्याच्या दरात मोठी वाढ; भाव दीड लाखांच्या पुढे, तर चांदीचे दर घसरले, वर्षाच्या अखेरीस दरात 'इतक्या' हजारांंची वाढ होण्याची शक्यता, तज्ज्ञांनी दिली माहिती
सोन्याच्या दरात मोठी वाढ; भाव दीड लाखांच्या पुढे, तर चांदीचे दर घसरले, वर्षाच्या अखेरीस दरात 'इतक्या' हजारांंची वाढ होण्याची शक्यता, तज्ज्ञांनी दिली माहिती
माझ्याजवळ मोदींची कुंडली, जोपर्यंत ज्ञानेश कुमारांचा राजीनामा होत नाही, तोपर्यंत सोडणार नाही, देशाचा युवक आता थांबणार नाही; राहुल गांधींनी आरपारच्या लढाईसाठी रणशिंग फुंकलं!
माझ्याजवळ मोदींची कुंडली, जोपर्यंत ज्ञानेश कुमारांचा राजीनामा होत नाही, तोपर्यंत सोडणार नाही, देशाचा युवक आता थांबणार नाही; राहुल गांधींनी आरपारच्या लढाईसाठी रणशिंग फुंकलं!
Pune MPSC Protest: MPSC आंदोलन स्थगित, पण ऋषिकेश गांगुर्डे नाराज; एक दिवस आधीच अहिल्यानगरला परतले, आता सांगितलं धक्कादायक कारण, म्हणाले, 2 दिवसांनी सगळं बोलणार!
MPSC आंदोलन स्थगित, पण ऋषिकेश गांगुर्डे नाराज; एक दिवस आधीच अहिल्यानगरला परतले, आता सांगितलं धक्कादायक कारण, म्हणाले, 2 दिवसांनी सगळं बोलणार!
या फोटोनं महाराष्ट्राच्या गृहखात्याचा निर्दयी चेहरा उघड केला, फडणवीस,मोदी वैगरे लोकांनी समाजाला कोणत्या नरकात ढकललं हेच दिसतं, 'तो' फोटो शेअर करत संजय राऊतांचा प्रहार
या फोटोनं महाराष्ट्राच्या गृहखात्याचा निर्दयी चेहरा उघड केला, फडणवीस,मोदी वैगरे लोकांनी समाजाला कोणत्या नरकात ढकललं हेच दिसतं, 'तो' फोटो शेअर करत संजय राऊतांचा प्रहार
Pune MPSC protest: पुण्यातील एमपीएससी आंदोलनात रात्री अचानक चक्र फिरली, पडद्यामागे काय घडलं? वाचा इनसाईड स्टोरी
पुण्यातील एमपीएससी आंदोलनात रात्री अचानक चक्र फिरली, पडद्यामागे काय घडलं? वाचा इनसाईड स्टोरी
Rohit Pawar and Devendra Fadnavis: रोहित पवारांचं भविष्य फक्त तीन जण घडवू शकतात; देवाभाऊ... देवाभाऊ.. देवाभाऊ! नितेश राणेंचं वक्तव्य
रोहित पवारांचं भविष्य फक्त तीन जण घडवू शकतात; देवाभाऊ... देवाभाऊ.. देवाभाऊ! नितेश राणेंचं वक्तव्य
Embed widget