एक्स्प्लोर

Ajit Pawar: लोकसभा निवडणूक संपल्यानंतर शरद पवार आणि तुम्ही पुन्हा एकत्र येणार का? अजित पवार म्हणाले, एकदा मतदान होऊ द्या...

Maharashtra Politics: बारामती लोकसभेची निवडणूक झाल्यानंतर जुनं नातं पूर्वीसारखं होणार? तुम्ही आणि शरद पवार एकत्र येणार का, असा प्रश्न अजित पवार यांना विचारण्यात आला होता. अजित पवारांचं उत्कंठा वाढवणारं उत्तर.

मुंबई: आगामी लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील सर्वात प्रतिष्ठेची लढत असलेल्या बारामती मतदारसंघात (Baramati Loksabha) शरद पवार आणि अजित पवार एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. अजित पवार (Ajit Pawar) भाजपसोबत सरकारमध्ये सामील झाल्यानंतर पवार कुटुंबाच्या एकीला तडा गेला होता. मात्र, 2024 ची लोकसभा निवडणूक संपल्यानंतर अजित पवार आणि शरद पवार (Sharad Pawar) यांच्यातील जुनं नातं पुन्हा पूर्ववत होणार का? काका आणि पुतण्या पुन्हा एकत्र येणार का, याविषयी अजित पवार यांनी सूचक भाष्य केले आहे. ते सोमवारी 'एबीपी माझा'ला दिलेल्या विशेष मुलाखतीत बोलत होते. 

यावेळी अजित पवार यांना लोकसभा निवडणुकीनंतर शरद पवार आणि तुमच्यातील जुन नातं पुन्हा पूर्वीसारखं होणार का, असा प्रश्न विचारण्यात आला. यावर अजित पवार यांनी म्हटले की, एकदा 7 तारखेला बारामतीचं मतदान होऊ द्या. तोपर्यंत मी या विषयावर काहीच बोलणार नाही. कारण सध्या बारामतीत वेगळा प्रचार सुरु आहे. आम्ही तर पुढे एकत्रच येणार, असे सांगितले जात आहे. हा प्रचार लोकांना बुचकाळ्यात टाकणारा आहे. त्यासंदर्भात माझे मतदार, सहकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये संदेश गेला पाहिजे की, मी जी राजकीय भूमिका घेतली त्याला मी धरुन राहणार आहे. लोकांनी मला साथ द्यावी, मोठ्यांनी आशीर्वाद द्यावेत आणि मतदारांना मला भरभक्कम पाठिंबा द्यावा, असे अजित पवार यांनी सांगितले. 

बारामतीच्या लढाईसाठी अजित पवारांनी मन घट्ट केलं

आजपर्यंत बारामती म्हणजे पवार कुटुंब, असे समीकरण होते. परंतु, यंदा बारामतीमध्ये पवार कुटुंबातील दोन दिग्गज नेते एकमेकांविरोधात उभे ठाकले आहेत. शरद पवार यांची कन्या सुप्रिया सुळे आणि अजित पवारांची पत्नी सुनेत्रा पवार या एकमेकांविरोधात रिंगणात आहेत. कुटुंबातील या लढाईबाबत अजित पवार यांना मुलाखतीमध्ये प्रश्न विचारण्यात आला. बहिणीच्या विरोधात प्रचार करताना वेदना होतात का, असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. त्यावर अजित पवार यांनी म्हटले की, निवडणुकीत या भावनिक नातं चालत नाही.  7 मे पर्यंत भावनिक, मऊ व्हायचं नाही असे मी ठरवले आहे. बारामतीचा अधिक विकास पाहिजे असेल तर राज्य सरकार आणि केंद्र सरकार मिळून करता आला तर तो अधिक जलद गतीनं करता येईल.   बारामतीची जागा लढत असताना समोरचे उमेदवार त्यांच्या परीनं प्रयत्न करत आहेत. ही  लढाई भावकी किंवा गावकीची लढाई नाही.  देशासाठी ही लढाई लढायची आहे, असे अजित पवार यांनी सांगितले.

आणखी वाचा

उद्धव ठाकरेंचं सरकार धोक्यात असताना आमची अमित शाहांशी चर्चा सुरु होती; अजितदादांकडून त्या गुपिताचा पुनरुच्चार

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 एप्रिल 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 एप्रिल 2026 | गुरुवार
Video: आदित्य ठाकरेंनी महिलेला मारलं, निशिकांत दुबेंच्या आरोपाने सभागृह तापलं, अरविंद सावंत कडाडून म्हणाले, तडीपार माणसाचं नाव घेऊ का?
Video: आदित्य ठाकरेंनी महिलेला मारलं, निशिकांत दुबेंच्या आरोपाने सभागृह तापलं, अरविंद सावंत कडाडून म्हणाले, तडीपार माणसाचं नाव घेऊ का?
Maharashtra Vidhan Parishad Election 2026: विधान परिषद निवडणूक जाहीर, काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचं मोठं वक्तव्य; सपकाळ म्हणाले, 'उद्धव ठाकरे ⁠विधान परिषदेवर जात असतील तर आमचा पाठिंबा, पण...'
विधान परिषद निवडणूक जाहीर, काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचं मोठं वक्तव्य; सपकाळ म्हणाले, 'उद्धव ठाकरे ⁠विधान परिषदेवर जात असतील तर आमचा पाठिंबा, पण...'
Maharashtra Vidhan Parishad Election 2026: विधानपरिषद निवडणुकीत ट्विस्ट, 10 उमेदवारांसाठी एकाच दिवशी दोनवेळा मतदान, मतदानाआधीच महायुतीचा एक विजय निश्चित, प्रज्ञा सातवांच्या रिक्त जागेवरही पोटनिवडणूक!
विधान परिषद निवडणुकीत ट्विस्ट, 10 उमेदवारांसाठी एकाच दिवशी दोनवेळा मतदान, मतदानाआधीच महायुतीचा एक विजय निश्चित, प्रज्ञा सातवांच्या रिक्त जागेवरही पोटनिवडणूक!

व्हिडीओ

Animal Parlor : साताऱ्यातील पाटणमध्ये जनावरांचं ब्युटी पार्लर Special Report
Women Reservation : महिला आरक्षण विधेयकावरून सत्ताधारी-विरोधक आमने-सामने Special Report
Nashik TCS : नाशिकच्या टीसीएसप्रकरणी रिसॉर्टवर कारवाई, कारागृहात धुलाई Special Report
Ayan Ahmad Amravati : रील स्टार अयान अहमद कसा बनला गुन्हेगार? Special Report
Bhondu Baba : मुंबईच्या मालाडमधील भोंदूबाबाचा पर्दाफाश Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Shreyas Iyer : सरपंच श्रेयस अय्यरची सीमारेषेवर अफलातून उडी, यानसेनच्या साथीनं हार्दिक पांड्याचा करेक्ट कार्यक्रम, रोहित-सूर्या पाहत राहिले, पाहा व्हिडिओ
श्रेयस अय्यरची सीमारेषेवर अफलातून उडी, यानसेनची अचूक साथ, रोहित-सूर्या पाहत राहिले
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इस्त्रायल-लेबनॉनच्या शस्त्रसंधीची घोषणा, दोन्ही देशांचे नेते 34 वर्षानंतर भेटले
ट्रम्प यांच्याकडून आणखी एका युद्धाच्या शस्त्रसंधीची घोषणा, इस्त्रायल-लेबनॉन संघर्षाला 10 दिवस ब्रेक
धक्कादायक! नाशिकमध्ये विजेचा धक्का लागून दोन शेतकऱ्यांचा जागीच मृत्यू, वीजपंप दुरुस्ती करताना घडली घटना
धक्कादायक! नाशिकमध्ये विजेचा धक्का लागून दोन शेतकऱ्यांचा जागीच मृत्यू, वीजपंप दुरुस्ती करताना घडली घटना
MI vs PBKS : वानखेडेवर पंजाबच्या प्रभसिमरन आणि श्रेयस अय्यरचं वादळ,  पंजाबचा 7 विकेटनं मुंबईवर दणदणीत विजय, गुणतालिकेत टॉपवर
पंजाबचा 7 विकेटनं मुंबईवर दणदणीत विजय, गुणतालिकेत टॉपवर,वानखेडेवर प्रभसिमरन आणि श्रेयसचं वादळ
जपानी मेंदूज्वराविरोधात महाराष्ट्र सतर्क; लसीकरण मोहिमेला वेग, मुख्यमंत्री फडणवीसांनी दिली माहिती
जपानी मेंदूज्वराविरोधात महाराष्ट्र सतर्क; लसीकरण मोहिमेला वेग, मुख्यमंत्री फडणवीसांनी दिली माहिती
शासकीय कर्मचाऱ्यांना गुडन्यूज; 7 व्या वेतनगटानुसार सरकारी घरं मिळणार, सा. बांधकाम विभाग चटईक्षेत्र वाढवणार
शासकीय कर्मचाऱ्यांना गुडन्यूज; 7 व्या वेतनगटानुसार सरकारी घरं मिळणार, सा. बांधकाम विभाग चटईक्षेत्र वाढवणार
Suryakumar Yadav : रोहित दुखापतीमुळं संघाबाहेर सूर्यकुमार यादवचा खराब फॉर्म कायम, पहिल्याच बॉलवर बाद, अर्शदीप सिंगचा धमाका
सूर्यकुमार यादवचा खराब फॉर्म कायम, पहिल्याच बॉलवर बाद,अर्शदीप सिंगचा धमाका
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 एप्रिल 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 एप्रिल 2026 | गुरुवार
Embed widget