एक्स्प्लोर

Devendra Fadnavis : महायुती सरकारमध्ये फडणवीसच 'बॉस'! भंडाऱ्यातील सभेत नेमकं काय झालं?

Devendra Fadnavis CM Eknath Shinde : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भरसभेत केलेली मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तात्काळ मान्य केली. त्यामुळे महायुती सरकारमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा शब्द महत्त्वाचा असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

भंडारा :  महायुती सरकारमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचा शब्द अत्यंत महत्वाचा असतो आणि आज भंडाऱ्यात (Bhandara) त्याचीच प्रचिती आली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भरसभेत केलेली मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी तात्काळ मान्य केली. त्यामुळे महायुती सरकारमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा शब्द महत्त्वाचा असल्याची चर्चा सुरू झाली आहे.  

'शासन आपल्या दारी' या कार्यक्रमाच्या निमित्ताने आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच देवेंद्र फडणवीस व अजित पवार हे दोन्ही उपमुख्यमंत्री भंडाऱ्यात होते. यावेळी फडणवीस यांनी आपल्या भाषणात विविध मु्द्यांवर भाष्य केले. आपल्या भाषणात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, मुख्यमंत्री आज भंडारा जिल्ह्यात आले असून भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांची सरकारकडून धनाला हमी भावासह बोनस देण्याची मागणी असल्याचे सूतोवाच केले. सोबतच फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांनी धान उत्पादक शेतकऱ्यांना मागील वर्षी सारखाच बोनस जाहीर करावा अशी आपली ही मागणी असल्याचे म्हटले. 

फडणवीस यांच्या भाषणानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाषण केले. त्यावेळी त्यांनी धानाला बोनस देण्याची मागणी करणारे फडणवीस तर अर्थ मंत्री म्हणून त्याची पूर्तता करणारे अजित पवारही या ठिकाणी उपस्थित असल्याचे सांगितले. धानाला बोनस देताना कोणतीही अडचण होणार नाही असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले. 

काही दिवसानंतर सुरू होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात आम्ही धानाला बोनस जाहीर करू अशी घोषणाही मुख्यमंत्री शिंदे यांनी केली. त्यामुळे फडणवीस यांनी मागणी करतात लगेच मुख्यमंत्र्यांनी त्यासंदर्भात निर्णय दिल्याचे आज भंडारामध्ये सर्वांना पाहायला मिळाले. या मुद्यावरून फडणवीस हेच महायुती सरकारमध्ये 'बॉस' असल्याची चर्चा सुरू झाली आहे. 

अजित पवारांचे भाषण सुरु असताना घोषणाबाजी

 भंडाऱ्यातील (Bhandara) शासन आपल्या दारी कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आरक्षणाच्या मुद्द्यावर भाष्य करताना गोंधळ झाला. काही जणांनी घोषणाबाजी केली. आमच्या मागण्या पूर्ण करा नाही तर खुर्च्या खाली करा अशी घोषणा देत हातातले बॅनर फडकावले.  दरम्यान, घोषणा देणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतले. 

 राज्यात सध्या आरक्षणाच्या मुद्द्यावरुन घमासान सुरु असल्याचं चित्र आहे. त्याच पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार हे आरक्षणाच्या मुद्द्यावर भाष्य करत होते. त्याचवेळी हा गोंधळ झाला असल्याची माहिती समोर येत आहे. 

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates: एसआयआर फॉर्म भरण्याचा आजचा शेवटचा दिवस
Maharashtra Live News Updates: एसआयआर फॉर्म भरण्याचा आजचा शेवटचा दिवस
उपचाराच्या नावाखाली तंत्र-मंत्र करत मौलवीचा महिलेवर अत्याचार; युपीला पळून जाण्याच्या तयारीत, पोलिसांनी उचलला
उपचाराच्या नावाखाली तंत्र-मंत्र करत मौलवीचा महिलेवर अत्याचार; युपीला पळून जाण्याच्या तयारीत, पोलिसांनी उचलला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
धक्कादायक! शिवसेना शिंदे गटाच्या माजी नगरसेवकाकडून विमानतळावरच गोळीबार, दोन जण जखमी, नेमकं प्रकरण काय?
धक्कादायक! शिवसेना शिंदे गटाच्या माजी नगरसेवकाकडून विमानतळावरच गोळीबार, दोन जण जखमी, नेमकं प्रकरण काय?

व्हिडीओ

Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report
Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
FPI : गुड न्यूज, विदेशी गुंतवणूकदारांनी ऑगस्टमध्ये ट्रेंड सुरुच ठेवला, भारतीय शेअर बाजारात 16621 कोटींची गुंतवणूक, जोरदार खरेदी
गुड न्यूज, विदेशी गुंतवणूकदारांनी ऑगस्टमध्ये ट्रेंड कायम ठेवला, भारतीय शेअर बाजारात 16621 कोटींची गुंतवणूक
वीजचोरांना महावितरणचा दणका! 30 कोटी 36 लाख रुपयांची चोरी उघड, कोणत्या विभागात किती वीजचोऱ्या?
वीजचोरांना महावितरणचा दणका! 30 कोटी 36 लाख रुपयांची चोरी उघड, कोणत्या विभागात किती वीजचोऱ्या?
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
Rohit Pawar : उद्योजकांनी प्रेस घेतल्यावर गडबड झाली, उद्योगमंत्री रविवारी चाकणमध्ये गेलेत, एवढ्या दिवसात काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
उदय सामंतांची चाकण एमआयडीसीत रविवारी बैठक, एवढ्या दिवसात काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
Prashant Kishor : आता सरकारनं कायदा केलाय, ...तर भाजपनं भाषणबाजी करण्याऐवजी सोनिया गांधी यांच्यावर केस करावी, प्रशांत किशोर यांची वंदे मातरमच्या वादावर भूमिका  
सरकारनं कायदा केलाय, ...तर भाजपनं भाषणबाजी करण्याऐवजी सोनिया गांधी यांच्या केस करावी : प्रशांत किशोर
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला

Embed widget