एक्स्प्लोर

Devendra Fadnavis : ED जवळ मलिकांवरोधात पुरावे, दाऊदच्या माणसाचा राजीनामा घेतलाच पाहिजे

Devendra Fadnavis : जोपर्यंत नवाब मलिकचा राजीनामा घेत नाही,हे मावळे झुकणार नाही

Devendra Fadnavis : राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांना ईडीनं अटक (Arrest) केल्यानंतर भाजपने (BJP) आक्रमक पवित्रा घेतला आहे. मलिक यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी भाजप (BJP) आज मुंबईत (Mumbai) मोर्चा काढणार आहे. आझाद मैदानातून (Azad Maidan) या मोर्चाला सुरुवात झाली आहे. नवाब मलिक (Nawab Malik) यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी भाजप (BJP) आक्रमक झालीय. ठाकरे सरकारकडून मलिकांचा त्वरित राजीनामा घेण्यात यावा या मागणीसाठी आज मुंबईत विराट मोर्चा काढण्यात आला आहे. यावेळी भाजपचे प्रमुख नेते आझाद मैदानावर दाखल झाले असून त्यांच्याकडून जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली. मोर्च्याचे नेतृत्व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस करत असून राणीची बाग ते आझाद मैदानापर्यंत हा मोर्चा काढण्यात आला आहे,

नवाब मलिक यांचा राजीनामा घेतला जात नाही तोपर्यंत शांत बसणार नाही : देवेंद्र फडणवीस

हा संघर्ष देशद्रोह्यांविरोधात आहे. दाऊदच्या गुर्ग्यांविरोधात संघर्ष आहे. भारतमातेसाठी ज्यांनी बलिदान दिलं त्यांच्यासाठी हा संघर्ष आहे. हे छत्रपतींचे मावळे आहेत, ते झुकणार नाहीत, वाकणार नाहीत, थकणार नाहीत, बॉम्बस्फोटातील आरोपीसोबत व्यवहार करुन जेलमध्ये गेलेल्या नवाब मलिकांचा राजीनामा होत नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही. ही मागणी आमची केवळ राजकीय मागणी नाही. रोज घटना घडतात, पण रोज आम्ही राजीनामा मागत नाही. पण ही घटना बघितली तर लाजिरवाणी आहे. बॉम्बस्फोटातील आरोपी शहावली खान याकूब मेमनसोबत बसून बॉम्बस्फोटाचा कट केला, बॉम्बस्फोट कसा घडवायचा, स्कूटरमध्ये ठेवून बॉम्बस्फोट केले. दुसरा सलीम पटेल दाऊदची बहिण हसिना पारकर या दोघांनी मिळून हा कट रचला. या हरामखोरांनी नवाब मलिकांना जमीन विकली, मुंबईत उकिरड्याची जागाही 25 रुपये चौरस फुटाने मिळत नाही. या हरामखोरांसोबत व्यवहार करताना तुम्हाला लाज कशी वाटली नाही. जे मुंबईकर ज्यांचे बॉम्बस्फोटत चिंधड्या उडाल्या, ज्यांचे पती मेले, बाप मेले, घरदार उद्ध्वस्त झाले त्यांचे अश्रू दिसले नाहीत का? पैशासाठी इतके आंधळे झालात का? असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

दाऊदविरोधात लढतोय, मुंबईविरोधात नाही

नवाब मलिकांचा राजीनामा होत नाही तोपर्यंत स्वस्थ बसणार नाही. काल आम्ही तुमचं पितळ उघडं केलंय. मोदींना संपवण्याकरीता तुम्ही सर्व एकत्र येता आहात. आमचे संबंधी गुन्हेगारांशी नाही. कालचा बाॅम्ब पहिला बाॅम्ब आहे. अजून अनेक बाॅम्ब येतील. आपला संघर्ष पोलिसांशी नाही. पोलिसांनी अटक केली तर काही होत नाही. शांत राहा. यांनी राजीनामा घेतला नाही तर अजून अनेक गोष्टी बाकी आहे, अजून संघर्ष बाकी आहे. रस्ता रोको करायचा नाही. आपण दाऊदविरोधात लढतोय, मुंबईविरोधात नाहीदाऊदच्या गुंडाविरोधात हा संघर्ष आहे. 1993 साली मुंबईत 13 बॉम्बस्फोट झाले, त्यावेळी हसीना पारकर, सलीम पटेलनं षडयंत्र रचलं. मलिकांनी आरोपीकडून जमीन विकत घेतली. 25 रु चौरस फुटाने ही जमीन विकत घेतली, हसीना पारकरने बॉंम्बस्फोटाचा कट रचला. ईडीजवळ मलिकांवरोधात पुरावे आहेत. दाऊदच्या माणसाचा राजीनामा घेतलाच पाहिजे असे मागणी फडणवीसांनी केलीय. 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

अशोक मामांच्या 'साडे माडे तीन'चा पुन्हा कल्ला, टीझर रिलीज; सैराट फेम अभिनेत्री दिसणार प्रमुख भूमिकेत
अशोक मामांच्या 'साडे माडे तीन'चा पुन्हा कल्ला, टीझर रिलीज; सैराट फेम अभिनेत्री दिसणार प्रमुख भूमिकेत
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 जानेवारी 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 जानेवारी 2026 | सोमवार
आठवडा झाला तरी 'एबी फॉर्म' सापडेना, अपक्ष उमेदवार राष्ट्रवादीचा कसा झाला? पिंपरीतील आयुक्तांनी दिलं उत्तर
आठवडा झाला तरी 'एबी फॉर्म' सापडेना, अपक्ष उमेदवार राष्ट्रवादीचा कसा झाला? पिंपरीतील आयुक्तांनी दिलं उत्तर
Pune NCP : अजितदादांच्या राष्ट्रवादीचे पुण्यातील कार्यालय बळकावलेल्या जागेवर, 300 कोटींच्या व्यवहाराशी पार्थ पवारांचा थेट संबंध; विजय कुंभार यांचा दावा
अजितदादांच्या राष्ट्रवादीचे पुण्यातील कार्यालय बळकावलेल्या जागेवर, 300 कोटींच्या व्यवहाराशी पार्थ पवारांचा थेट संबंध; विजय कुंभार यांचा दावा

व्हिडीओ

CM Devendra Fadnavis Parbhani : लाडक्या बहणींना लखपती बनवणार, देवाभाऊची मोठी घोषणा
Aaditya Thackeray Mumbai : आदित्य ठाकरे यांची भाजपवर सडकून टीका
Kishori Pednekar Mumbai : 'भाजप आणि सेनेने धमक्या दिल्या नाहीत आजूबाजूला चाय कम किटली गरम असता'
Amit Thackeray Solapur : अमित ठाकरेंकडून बाळासाहेब सरवदेयांच्या कुटुंबियांचं सांत्वन
Gulabrao Patil Jalgaon : मला सर्वांसोबत आय लव यू करावं लागतं गुलाबराव पाटलांची तुफान फटकेबाजी

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अशोक मामांच्या 'साडे माडे तीन'चा पुन्हा कल्ला, टीझर रिलीज; सैराट फेम अभिनेत्री दिसणार प्रमुख भूमिकेत
अशोक मामांच्या 'साडे माडे तीन'चा पुन्हा कल्ला, टीझर रिलीज; सैराट फेम अभिनेत्री दिसणार प्रमुख भूमिकेत
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 जानेवारी 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 जानेवारी 2026 | सोमवार
आठवडा झाला तरी 'एबी फॉर्म' सापडेना, अपक्ष उमेदवार राष्ट्रवादीचा कसा झाला? पिंपरीतील आयुक्तांनी दिलं उत्तर
आठवडा झाला तरी 'एबी फॉर्म' सापडेना, अपक्ष उमेदवार राष्ट्रवादीचा कसा झाला? पिंपरीतील आयुक्तांनी दिलं उत्तर
Pune NCP : अजितदादांच्या राष्ट्रवादीचे पुण्यातील कार्यालय बळकावलेल्या जागेवर, 300 कोटींच्या व्यवहाराशी पार्थ पवारांचा थेट संबंध; विजय कुंभार यांचा दावा
अजितदादांच्या राष्ट्रवादीचे पुण्यातील कार्यालय बळकावलेल्या जागेवर, 300 कोटींच्या व्यवहाराशी पार्थ पवारांचा थेट संबंध; विजय कुंभार यांचा दावा
शिवशाही बस अन् दुचाकीचा भीषण अपघात; तीन युवक जागीच ठार, हायवेवर मोठी गर्दी
शिवशाही बस अन् दुचाकीचा भीषण अपघात; तीन युवक जागीच ठार, हायवेवर मोठी गर्दी
माझी तब्येत ठीक, शुगर वाढली होती; नारायण राणेंनी दिली माहिती, राजकीय निवृत्तीबाबतही स्पष्टच सांगितलं
माझी तब्येत ठीक, शुगर वाढली होती; नारायण राणेंनी दिली माहिती, राजकीय निवृत्तीबाबतही स्पष्टच सांगितलं
Nashik Municipal Election 2026 : नाशिक महानगरपालिका: प्रभाग निहाय पक्षीय उमेदवारांची 'अशी' होणार लढत, उमेदवारांची यादी एका क्लिकवर
नाशिक महानगरपालिका: प्रभाग निहाय पक्षीय उमेदवारांची 'अशी' होणार लढत, उमेदवारांची यादी एका क्लिकवर
Tanaji Sawant : तुळजाभवानीच्या भक्तांना आता प्रसाद म्हणून ड्रग्जची पुडी दिली जाईल; तानाजी सावंत यांचा भाजपवर घणाघात
तुळजाभवानीच्या भक्तांना आता प्रसाद म्हणून ड्रग्जची पुडी दिली जाईल; तानाजी सावंत यांचा भाजपवर घणाघात
Embed widget