एक्स्प्लोर

फडणवीस प्रामाणिक आणि हुशार, भविष्यात त्यांना केंद्रात मोठी संधी मिळण्याची शक्यता; उद्धव ठाकरेंची मुख्यमंत्र्यांवर स्तुतीसुमने

Devendra Fadnavis Birthday : 'महाराष्ट्राचा नायक' या कॉफी टेबल बुकमधून ज्येष्ठ नेते शरद पवार, उद्धव ठाकरे, नितीन गडकरींसह अनेक नेत्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या राजकीय प्रवासाचे कौतुक केलं आहे.

मुंबई : देवेंद्र फडणवीस हे अतिशय हुशार राजकारणी असून भविष्यात त्यांना केंद्रात मोठी जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे असं सांगत उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांवर कौतुकाचा वर्षाव केला. समोर आलेल्या आव्हानांवर आपल्या अभ्यासू आणि मुत्सद्दी स्वभावाने मात करुन त्यांनी आपली विश्वासार्हता वाढवली असं उद्धव ठाकरे म्हणाले. देवेंद्र फडणवीसांची प्रतिमा ही एक गतिमान, अभ्यासू आणि पक्षनिष्ठ राजकारणी अशी आहे असं उद्धव ठाकरे म्हणाले. राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांच्या पुढाकाराने 'महाराष्ट्राचा नायक' हे कॉफी टेबल बुक प्रकाशित करण्यात आलं आहे. त्यामध्ये उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीसांच्या राजकीय प्रवासावर आणि त्यांच्या कामगिरीवर भाष्य केलं.

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 55 व्या वाढदिवसानिमित्त सर्व स्तरातून त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. 'महाराष्ट्राचा नायक' या कॉफी टेबल बुकमधून ज्येष्ठ नेते शरद पवार, उद्धव ठाकरे, नितीन गडकरींसह अनेक महत्त्वाच्या नेत्यांनी त्यांच्या राजकीय प्रवासाचे कौतुक केलं आहे.

Uddhav Thackeray On Devendra Fadnavis : नेमकं काय म्हटलंय उद्धव ठाकरे यांनी?

महाराष्ट्राच्या राजकारणात गंगाधरराव फडणवीस यांनी एक आदर्श राजकारणी म्हणून आपली प्रतिमा निर्माण केली होती. हा वारसा अतिशय मेहनतीने आणि समर्थपणे चालवण्याचे कार्य देवेंद्र गंगाधरराव फडणवीस करत आहेत. देवेंद्र आज महाराष्ट्राचे तिसऱ्यांदा मुख्यमंत्री झाले आहेत.

त्यांच्या पहिल्या कार्यकाळात म्हणजे 2014 ते 2019 दरम्यान आम्ही त्यांच्या सोबत होतो. त्यामुळे त्यांची विषय समजून घेण्याची जिद्द, प्रश्न सोडवण्याची तळमळ आणि राज्याला न्याय देण्याचा प्रयत्न जवळून पाहता आला. नंतरच्या काळात त्यांची विरोधी पक्षनेता म्हणून काम करण्याची धडपडही जवळून पाहता आली. देवेंद्रजी एक हुशार आणि प्रामाणिक राजकारणी आहेत.

Devendra Fadnavis Birthday : कामाची धडाडी आणि नेतृत्वक्षमता

फडणवीस यांनी वयाच्या अवघ्या 22 व्या वर्षी नागपूर महानगरपालिकेत नगरसेवक म्हणून प्रवेश केला आणि वयाच्या 27 व्या वर्षी ते नागपूरचे सर्वात तरुण महापौर बनले. ही उपलब्धी त्यांच्याप्रारंभिक काळातील धडाडी आणि नेतृत्वक्षमतेची साक्ष देते. त्यांचा अभ्यासू स्वभाव आणि कायदेशीर, आर्थिक तसेच प्रशासकीय विषयांवरील सखोल ज्ञान त्यांना भाजपातील इतर सदस्यांपासून वेगळे ठरवते. त्यांनी कायद्याची पदवी, व्यवसाय व्यवस्थापनात पदव्युत्तर पदवी आणि बर्लिनमधून प्रकल्प व्यवस्थापनात डिप्लोमा मिळवला आहे.

Devendra Fadnavis Coffee Table Book : राजकारणाला सांस्कृतिक आणि सामाजिक जोड

त्यांचे पुस्तक ‘अर्थसंकल्प सोप्या भाषेत’ हे त्यांच्या जटिल विषयांना साध्या भाषेत मांडण्याच्या क्षमतेचे द्योतक आहे. फडणवीस यांनी नेहमीच सर्वसामान्य नागरिकांना केंद्रस्थानी ठेवून काम केले. नझूल जमिनीच्या नूतनीकरणासारख्या प्रश्नांवर त्यांनी तीव्र लढा दिला आणि कामगार, झोपडपट्टीवासीय यांच्या हक्कांसाठी आवाज उठवला. 2014 मध्ये वयाच्या 44 व्या वर्षी ते महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री बनले. फडणवीस यांनी राजकीय कारकीर्दीला सांस्कृतिक आणि सामाजिक जोड दिली.

Devendra Fadnavis Political Journey : वडिलांचा वारसा समर्थपणे चालवला

त्यांनी मराठी पुस्तके लिहिली, ज्यामध्ये सामाजिक आणि आर्थिक विषयांचा समावेश आहे. त्यांच्या वडिलांना आणीबाणीच्या काळात तुरुंगवास भोगावा लागला होता, ज्यामुळे त्यांच्यावर राजकीय संस्कार खोलवर झाले. या पार्श्वभूमीवरही त्यांनी स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण केली.

फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वारशाला चालना देण्यासाठी विविध उपक्रमांना पाठिंबा दिला. त्यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना भाजपा युती सरकारने मराठी चित्रपट, नाट्य आणि लोककलांना प्रोत्साहन देण्यासाठी धोरणे राबवली.

Maharashtra CM History : अभ्यासू आणि मुत्सद्दी नेता

देवेंद्र फडणवीस यांना राजकीय कारकीर्दीत अनेकदा विविध विषयांमुळे अडचणींचा सामना करावा लागला. तरीही, त्यांनी आपल्या अभ्यासू आणि मुत्सद्दी स्वभावाने या आव्हानांचा सामना केला आहे. फडणवीस यांच्या 2014-2019 च्या कार्यकाळात महाराष्ट्राने औद्योगिक आणि आर्थिक प्रगती केली. ‘मेक इन महाराष्ट्र’ आणि ‘मॅग्नेटिक महाराष्ट्र’ सारख्या योजना त्यांच्या नेतृत्वाखाली राबवल्या गेल्या, ज्यामुळे त्यांच्या पक्षात त्यांची विश्वासार्हता वाढली.

Maharashtra Leaders In Central Government : भविष्यात केंद्रात मोठी संधी मिळणार

फडणवीस यांना भविष्यात राष्ट्रीय पातळीवर महत्त्वाची जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे, कारण त्यांचा अभ्यासू स्वभाव आणि प्रशासकीय कौशल्य पक्षाला उपयुक्त ठरेल. देवेंद्र फडणवीस यांची भाजपमधील प्रतिमा ही एक गतिमान, अभ्यासू, आणि पक्षनिष्ठ नेते अशी आहे. महाराष्ट्रात पक्षाला मजबूत करण्यात त्यांना यश मिळाले आहे. त्यांचे आर्थिक आणि सामाजिक धोरणांचे यश, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी असलेली जवळीक आणि केंद्रीय नेतृत्वाचा पाठिंबा यामुळे त्यांचे स्थान दृढ आहे.

भविष्यात त्यांना देशाच्या राजकारणात आणि त्यांच्या मनातील योजनांत यश मिळो, ही मनःपूर्वक शुभेच्छा!

ही बातमी वाचा:

एबीपी माझामध्ये गेल्या पाच वर्षांपासून कार्यरत, सध्या असोसिएट प्रोड्युसर. ब्रेकिंग, राजकारण, समाजकारण आणि अर्थकारणाच्या बातम्यांचा अनुभव. राजकीय आणि सामाजिक विश्लेषणात्मक बातम्यांवर भर. राज्यशास्त्र आणि इतिहास विषयांचा अभ्यासक.

Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Palghar : मॅरेथॉनमध्ये तृतीय क्रमांक पटकावला, पण धाप लागल्याने दहावीच्या विद्यार्थिनीला मृत्यूने कवटाळले, पालघरमधील घटना
मॅरेथॉनमध्ये तृतीय क्रमांक पटकावला, पण धाप लागल्याने दहावीच्या विद्यार्थिनीला मृत्यूने कवटाळले, पालघरमधील घटना
ITC : आयटीसीचा सरकारी विमा कंपन्यांना फटका, दोन दिवसात 13740 कोटी स्वाहा, तोटा कधी भरुन निघणार?
ITC : आयटीसीचा सरकारी विमा कंपन्यांना फटका, दोन दिवसात 13740 कोटी स्वाहा, तोटा कधी भरुन निघणार?
Donald Trump : आमच्या तेल कंपन्यांना त्यांनी बाहेर फेकलं, अमेरिकेच्या व्हेनेझुएलावरील हल्ल्यानंतर ट्रम्प यांचा व्हिडिओ व्हायरल 
आमच्या तेल कंपन्यांना त्यांनी बाहेर फेकलं,व्हेनेझुएलावरील हल्ल्यानंतर ट्रम्प यांचा व्हिडिओ व्हायरल 
सदानंद दातेंनी स्वीकारला पोलीस महासंचालकपदाचा पदभार; 26/11 मध्ये दहशतवाद्यांशी लढणारे डॅशिंग अधिकारी
सदानंद दातेंनी स्वीकारला पोलीस महासंचालकपदाचा पदभार; 26/11 मध्ये दहशतवाद्यांशी लढणारे डॅशिंग अधिकारी

व्हिडीओ

Aaditya Thackeray on Coffee With Kaushik : Raj-Uddhav ठाकरे बंधू विरोधकांना सपाट करणार: आदित्य ठाकरे
Manjusha Nagpure PMC Election : पुण्यात भाजपचा उमेदवार बिनविरोध;मंजुषा नागपुरेंची पहिली प्रतिक्रिया
Eknath Shinde Full Speech Mumbai : पहिला वार राज-उद्धव ठाकरेंवर; एकनाथ शिंदेंचं घणाघाती भाषण
Devendra Fadnavis : मुंबईचा महापौर महायुतीचा, हिंदू, मराठीच; फडणवीसांचा एल्गार, ठाकरे बंधूंवर प्रहार
Ashish Shelar Majha Katta : ठाकरे की पवार, भाजपसोबत कोण येणार, राजकारणात नवा बॉम्ब : माझा कट्टा

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Palghar : मॅरेथॉनमध्ये तृतीय क्रमांक पटकावला, पण धाप लागल्याने दहावीच्या विद्यार्थिनीला मृत्यूने कवटाळले, पालघरमधील घटना
मॅरेथॉनमध्ये तृतीय क्रमांक पटकावला, पण धाप लागल्याने दहावीच्या विद्यार्थिनीला मृत्यूने कवटाळले, पालघरमधील घटना
ITC : आयटीसीचा सरकारी विमा कंपन्यांना फटका, दोन दिवसात 13740 कोटी स्वाहा, तोटा कधी भरुन निघणार?
ITC : आयटीसीचा सरकारी विमा कंपन्यांना फटका, दोन दिवसात 13740 कोटी स्वाहा, तोटा कधी भरुन निघणार?
Donald Trump : आमच्या तेल कंपन्यांना त्यांनी बाहेर फेकलं, अमेरिकेच्या व्हेनेझुएलावरील हल्ल्यानंतर ट्रम्प यांचा व्हिडिओ व्हायरल 
आमच्या तेल कंपन्यांना त्यांनी बाहेर फेकलं,व्हेनेझुएलावरील हल्ल्यानंतर ट्रम्प यांचा व्हिडिओ व्हायरल 
सदानंद दातेंनी स्वीकारला पोलीस महासंचालकपदाचा पदभार; 26/11 मध्ये दहशतवाद्यांशी लढणारे डॅशिंग अधिकारी
सदानंद दातेंनी स्वीकारला पोलीस महासंचालकपदाचा पदभार; 26/11 मध्ये दहशतवाद्यांशी लढणारे डॅशिंग अधिकारी
एबी फॉर्म गिळलेल्या उमेदवाराची माघार, मग मच्छिंद्र ढवळेंचा अर्ज मंजूर कसा? निवडणूक आयोगानेच सांगितलं
एबी फॉर्म गिळलेल्या उमेदवाराची माघार, मग मच्छिंद्र ढवळेंचा अर्ज मंजूर कसा? निवडणूक आयोगानेच सांगितलं
पोलीस बंदोबस्तात मनसे पदाधिकाऱ्याची अंत्ययात्रा, मोठी गर्दी; शहरात तणाव, राजकीय वादातून हत्या
पोलीस बंदोबस्तात मनसे पदाधिकाऱ्याची अंत्ययात्रा, मोठी गर्दी; शहरात तणाव, राजकीय वादातून हत्या
Venezuela : राष्ट्रपती निकोलस मादुरो अमेरिकेच्या ताब्यात, व्हेनेझुएलाचं नेतृत्त्व कोण करणार? नाव आघाडीवर असलेल्या डेल्सी रॉड्रिग्ज नेमक्या कोण?
राष्ट्रपती निकोलस मादुरो अमेरिकेच्या ताब्यात, व्हेनेझुएलाचं नेतृत्त्व कोण करणार? डेल्सी रॉड्रिग्ज यांचं नाव आघाडीवर
बीडमध्ये सह्याद्री वनराईला दुसऱ्यांदा आग, सयाजी शिंदेंचा संताप; अजित पवारांना भेटणार, काय म्हणाले शिंदे
बीडमध्ये सह्याद्री वनराईला दुसऱ्यांदा आग, सयाजी शिंदेंचा संताप; अजित पवारांना भेटणार, काय म्हणाले शिंदे
Embed widget