देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष राजन तेलींची गोव्यात भेट; 45 मिनिटं चर्चा
Sindhudurg News : 31 डिसेंबरला सिंधुदुर्ग जिल्हा बँकेची निवडणुकीचे निकाल लागले. या निवडणुकीत भाजपचे जिल्हाध्यक्ष राजन तेली यांचा शिवसेनेचे नवखे सुशांत नाईक यानी पराभव केला.
Sindhudurg News : सिंधुदुर्ग भाजपचे जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची गोवा येथे भेट घेतली आहे. गोवा येथील सुप्रसिद्ध हॉटेल सिद्धा द दी गोवा या हॉटेलमध्ये राजन तेली यांनी देवेंद्र फडणवीस त्यांची भेट घेतली आहे. या भेटीत 45 मिनिटं या दोघांमध्ये चर्चा झाली आहे. ही नेमकी कोणत्या विषयावर चर्चा झाली, हे मात्र गुलदस्त्यात आहे.
31 डिसेंबरला सिंधुदुर्ग जिल्हा बँकेची निवडणुकीचे निकाल लागले. या निवडणुकीत भाजपचे जिल्हाध्यक्ष राजन तेली यांचा शिवसेनेचे नवखे सुशांत नाईक यानी पराभव केला. जिल्हा बँकेत भाजपची सत्ता आली खरी पण राजन तेली हे पराभूत झाल्याने भाजपची अवस्था गड आला पण सिंह गेला अशी झाली. यानंतर राजन तेली यांनी तडकाफडकी आपल्या जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला.
केंद्रीय मंत्री नारायण राणे कणकवली दाखल झालेत तरी कणकवली येथे ओम गणेश बंगला येथे झालेल्या पत्रकार परिषदेला राजन तेली उपस्थित नव्हते. त्यामुळे राजन तेली नाराज आहेत की काय? असा प्रश्न उपस्थित होत होता. यानंतर राजन तेली यांनी आपण राजीनामा दिल्याची घोषणा केली. राजन तेली यांचा हा राजीनामा मंजूर होणार की नाही? याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे. गोवा येथे दाखल झालेले विरोधी पक्ष नेते फडणवीस यांची राजन तेली यांनी भेट घेतली.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीच्या निकालाची पाच महत्वाची वैशिष्ट्यं; सविस्तर निकाल पाहा एका क्लिकवर
- सिंधुदुर्ग बँक निवडणूक : शेलार-सावंत यांच्यात रंगला मालवणी भाषेत कलगीतुरा
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा घेण्यासाठी एबीपी माझा लाईव्ह पाहा