![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Nitin Gadkari: नितीन गडकरींना बेळगावच्या जेलमधून धमकीचा फोन; देवेंद्र फडणवीस स्पष्ट म्हणाले...
Nitin Gadkari Threats Call: गडकरींना जो धमकीचा कॉल आला, तो आम्ही अतिशय गांभीर्याने घेतला आहे. तत्काळ तो कॉल ट्रेस करून गुन्हा दाखल केला आहे.
![Nitin Gadkari: नितीन गडकरींना बेळगावच्या जेलमधून धमकीचा फोन; देवेंद्र फडणवीस स्पष्ट म्हणाले... Devendra fadanvis on Union minister Nitin Gadkari Threats Call nagpur latest marathi news update Nitin Gadkari: नितीन गडकरींना बेळगावच्या जेलमधून धमकीचा फोन; देवेंद्र फडणवीस स्पष्ट म्हणाले...](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/12/28/327e29ace699ec2ecdea76b0b2c110a61672248287729398_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Union minister Nitin Gadkari Threats Call: गडकरींना जो धमकीचा कॉल आला, तो आम्ही अतिशय गांभीर्याने घेतला आहे. तत्काळ तो कॉल ट्रेस करून गुन्हा दाखल केला आहे. कॉल करणारा आरोपी बेळगावच्या जेल मधून कॉल करत होता, तिथे त्याने मोबाईल मिळवून हे कॉल केले आहेत. त्यामागे त्याचा हेतू काय आणि त्याच्या पाठीमागे आणखी कोणी आहे का? याची पडताळणी पोलीस विभाग करेल.. जेलमध्ये फोन कसा केला याचा तपास कर्नाटक सरकार करत आहे, ते कारवाई करतील, असे राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. ते नागूपरमध्ये बोलत होते.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना धमकीचा फोन बेळगाव तुरुंगातून आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. बेळगावच्या तुरुंगात कैदेत असलेल्या जयेश कांथा नावाच्या सराईत गुन्हेगाराने हा कॉल केल्याची माहिती मिळाली आहे. जयेश कांथा याने काही वर्षांपूर्वी केरळ मध्ये जाऊन धर्म परिवर्तन केले असल्याची माहिती, मिळाली आहे. जयेश कांथा याने याने तुरुंगाच्या आत नियमबाह्य पद्धतीने असलेल्या फोनच्या माध्यमातून कॉल केल्याचं समोर आले आहे...
यापूर्वी 2016 मध्ये तो जेल तोडून पळून गेला होता... शिवाय त्याने जेलमधूनच अशाच पद्धतीने अनेक वेळा पूर्वी ही मोठे अधिकारी आणि इतरांना धमकीचे कॉल केल्याची माहिती आहे. गडकरी यांच्या कार्यालयात देण्यात आलेल्या धमकी मागे एकटा जयेश आणि त्याची टोळी आहे... की अंडरवर्ल्डचे काही मोठे गॅंगस्टर यामागे आहे... याचा तपास सध्या पोलीस करत आहे. नागपूर पोलिसांची एक टीम तातडीने बेळगावला रवाना झाली आहे.
केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना धमकीचा फोन आल्या प्रकरणी तपास करण्यासाठी बेळगावातील हिंड लगा जेलमध्ये नागपूर पोलीस शनिवारी रात्री दाखल झाल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. नितीन गडकरी यांना शनिवारी सकाळी धमकीचा फोन आला होता. त्यानंतर त्यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. पोलीस खात्याने हे प्रकरण गांभीर्याने घेतले असून नागपूर पोलीस बेळगावात दाखल झाले आहेत. कोल्हापूर ,सांगली आणि बेळगाव पोलीस त्यांना तपासात मदत करत आहेत. शनिवारी रात्री दोन तासाहून अधिक कल जेलमध्ये शोध मोहीम राबवण्यात आली असून रविवारी पुन्हा जेलमध्ये शोध मोहीम राबवून तपास करण्यात येणार आहे.
इतर महत्त्वाची बातमी:
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)