एक्स्प्लोर
अकरावी ऑनलाईन प्रवेशाबाबतची ए टू झेड माहिती
मुंबई : अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेची सुरुवात झाली आहे. गुणवत्ता याद्या जाहीर होण्यासही सुरुवात झाली आहे. चारही याद्यांचे सुधारित वेळापत्रक आणि यादीत नाव आल्यावर करावयाची प्रक्रिया काय असते, यासंबंधी सर्व माहिती :
पहिली गुणवत्ता यादी :
- 10 जुलै – पहिली गुणवत्ता यादी जाहीर
- 11 जुलै ते 13 जुलै (सकाळी 10 ते संध्याकाळी 5) – पहिल्या यादीतील प्रवेश
- 14 जुलै (संध्याकळी 5 वा.) – रिक्त जागांचा तपशील आणि पहिल्या फेरीचे कट ऑफ वेबसाईटवर प्रसिद्ध
- 15 जुलै ते 18 जुलै (सकाळी 10 ते संध्याकाळी 5) – विद्यार्थ्यांनी पसंतीक्रम बदलणे, तसेच फॉर्म यापूर्वी भरलेला नसेल, तर भाग- आणि भाग-2 पूर्ण करणे
- 20 जुलै (संध्याकाळी 5 वा.) – दुसरी गुणवत्ता यादी जाहीर
- 21 जुलै ते 24 जुलै (सकाळी 10 ते संध्याकाळी 5) – दुसरी यादीतील प्रवेश
- 25 जुलै (संध्याकळी 5 वा.) – रिक्त जागांचा तपशील आणि पहिल्या फेरीचे कट ऑफ वेबसाईटवर प्रसिद्ध
- 26 जुलै ते 27 जुलै (सकाळी 10 ते संध्याकाळी 5) – विद्यार्थ्यांनी पसंतीक्रम बदलणे, तसेच फॉर्म यापूर्वी भरलेला नसेल, तर भाग- आणि भाग-2 पूर्ण करणे
- 29 जुलै (संध्याकाळी 5 वा.) – तिसरी गुणवत्ता यादी जाहीर
- 31 जुलै ते 1 ऑगस्ट (सकाळी 10 ते संध्याकाळी 5) – तिसरी यादीतील प्रवेश
- 2 ऑगस्ट (संध्याकळी 5 वा.) – रिक्त जागांचा तपशील आणि पहिल्या फेरीचे कट ऑफ वेबसाईटवर प्रसिद्ध
- 3 ऑगस्ट ते 4 ऑगस्ट (सकाळी 10 ते संध्याकाळी 5) – विद्यार्थ्यांनी पसंतीक्रम बदलणे, तसेच फॉर्म यापूर्वी भरलेला नसेल, तर भाग- आणि भाग-2 पूर्ण करणे
- 6 ऑगस्ट (संध्याकाळी 5 वा.) – चौथ्या गुणवत्ता यादी जाहीर
- 7 जुलै ते 8 ऑगस्ट (सकाळी 10 ते संध्याकाळी 5) – चौथ्या यादीतील प्रवेश
- पहिला पसंतीक्रम दिलेल्या उच्च माध्यमिक शाळा किंवा ज्युनियर कॉलेज विद्यार्थ्यास प्रवेश मिळाला असल्यास, त्या ज्युनियर कॉलेजात आपली मूळ प्रमाणपत्रे आणि झेरॉक्स कॉपी सादर करुन प्रवेश घेणं बंधनकारक आहे. त्यानंतर अशा विद्यार्थ्यांची नावं संबंधित शाखेच्या पुढील फेऱ्यांसाठी ब्लॉक करण्यात येतील.
- पहिल्या पसंतीक्रमाव्यतिरिक्त अन्य पसंतीक्रमांकाचे उच्च माध्यमिक शाळा किंवा ज्युनियर कॉलेज मिळाल्यास, त्या विद्यार्थ्याना ते कॉलेज मान्य असल्यास दिलेल्या वेळेत आपला प्रवेश निश्चित करावयचा आहे. मूळ प्रमाणपत्र, झेरॉक्स कॉपी आणि प्रवेश फी भरुन प्रवेश निश्चित करु शकतील. त्यानंतर अशा विद्यार्थ्यांची नावं संबंधित शाखेच्या पुढील फेऱ्यांसाठी ब्लॉक करण्यात येतील. मात्र, दिलेल्या वेळेत या विद्यार्थ्यांनी संबंधित महाविद्यालयात प्रवेश निश्चित न केल्यास त्यांना पुढील फेरीसाठी पसंतीक्रम बदलण्याची मुभा देण्यात येईल.
- प्रवेश मिळालेल्या उच्च माध्यमिक शाळा किंवा ज्युनियर कॉलेजमध्ये प्रवेश घेण्यापूर्वी विद्यार्थ्यांच्या सर्व कागदपत्रांची ज्युनियर कॉलेजच्या प्रवेश समितीद्वारे पडताळणी केली जाईल. अशा पडताळणीमध्ये कोणतेही कागदपत्र किंवा कॉलेजमध्ये विद्यार्थ्याला प्रवेश नाकारला जाऊ शकतो.
- अर्जदाराने पूर्ण फी भरुन प्रवेश घेतल्यानंतर त्याला संगणकीकृत प्रवेश पावती संबंधित उच्च माध्यमिक शाळा किंवा ज्युनियर कॉलेजकडून तात्काळ किंवा वेळापत्रकाप्रमाणे देण्यात येईल.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
बातम्या
नाशिक
महाराष्ट्र
Advertisement