एक्स्प्लोर

विरोधानंतरही आमदार प्रताप सरनाईक यांच्यावर राज्य सरकार मेहरबान

अनधिकृत बांधकामाचा ठपका ठेवत ठाणे महानगरपालिकेने प्रताप सरनाईक यांच्या कंपनीला तीनकोटी 33 लाख दंड ठोठावला होता. यापैकी या कंपनीने 25 लाखांची रक्कम महापालिकेकडे जमा करण्यात आली होती.

मुंबई : शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या कंपनीच्या दंड माफ प्रकरणावरुन भाजप आक्रमक झाली आहे. सरनाईक यांच्या ठाण्यातील इमारतीचा दंड माफ करण्याचा निर्णय कालच्या  मंत्रिमंडळबैठकीत घेण्यात आला होता.  या निर्णयाला उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वित्त विभागाने विरोध केला होता. तरीही राज्य सरकारने मंत्रीमंडळ  बैठकीत निर्णय घेतला. त्यामुळे या विरोधात भाजपनेविरोध करत महाविकास आघाडी सरकारवर  जोरदार टीका केली आहे. 

शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी ठाण्यातील पोखरण रोड क्रमांक 1 येथे उभारलेल्या छाबय्याविहंग गार्डन प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. कारण ठाणे महानगरपालिकेने 2008 मध्ये या कंपनीला दंड ठोठावला होता. आणि आता राज्य सरकारने मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेऊन हा दंड माफ केला आहे. 

अनधिकृत बांधकामाचा ठपका ठेवत ठाणे महानगरपालिकेने प्रताप सरनाईक यांच्या कंपनीला तीनकोटी 33 लाख दंड ठोठावला होता. यापैकी या कंपनीने 25 लाखांची रक्कम महापालिकेकडे जमा करण्यात आली होती. उर्वरित तीन कोटी आठ लाखांची रक्कम व त्यावरील 18 टक्के दराने व्याजाची एक कोटी 25 लाखांची रक्कम सरनाईक यांच्याकडून बाकी होती.  मात्र  एकूण  21 कोटी रक्कम होत असल्याचा आरोप भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी केलाय.

काय आहे वित्त विभागाचा अभिप्राय?

  • सदरचा दंड हा ठाणे महानगर पालिकेचा आर्थिक स्त्रोताचा एक भाग आहे 
  • महानगरपालिकांना विविध विकास कामांसाठी शासनाकडून निधी उपलब्ध केला जात असल्याने महानगरपालिकेचा तोटा हा राज्य शासनाचा आर्थिक तोटा अप्रत्यक्ष भाग आहे.
  • विना परवानगी बांधकाम करण्यात आल्याने अनियमितता आहे. त्याचा दंड आकारला जाणे आवश्यक आहे 
  • अशी गंभीर अनियमितता होऊ नये यासाठी दाम दुप्पट दंड लावणे योग्य राहील
  • याप्रकरणी दंड माफ केल्यास भविष्यात पूर्वधोरण म्हणून वापर केला जाण्याची शक्यता आहे.
  • कोविडच्या पार्श्‍वभूमीवर राज्याचे महसूल उत्पन्न मोठ्या प्रमाणावर घटले आहे.
  • तसेच यासाठीच्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी मोठ्या प्रमाणावर निधी खर्च होत आहे.
  • त्यातच सदर प्रकरणी दंड माफ केल्यास या मार्गाने प्राप्त होणारा महसूल बुडणार आहे.
  •  त्यामुळे ठाणे महापालिकेस प्राप्त होणारी रक्कम माफ केल्यास वित्त विभागाची सहमती देता येणार नाही.
  • त्यामुळे नगर विकास विभागाचा प्रस्तुत प्रस्ताव अमान्य करण्यात यावा.

वित्त विभागाचा हा सरळ आणि स्पष्ट अभिप्राय असतानाही राज्य सरकारने मंत्रिमंडळाच्या बैठकीतहा प्रस्ताव घेऊन दंड माफ केला आहे. फक्त दंड माफ नाही तर भोगवटा प्रमाणपत्र देण्याचे आदेशही मंत्रिमंडळाच्या बैठकीतून महापालिकेला देण्याचा हा प्रस्ताव होता. त्यामुळे आपल्या आमदाराला खूश करण्यासाठी राज्य सरकार आणि नगरविकास विभाग प्रयत्न करत असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे . त्यामुळे राज्यातील मोठ्या प्रमाणावर असलेल्या अनधिकृत बांधकामांना राज्य सरकार असाच आश्रय देणार का असा प्रश्न आता उपस्थित होतोय.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

 

महत्त्वाच्या बातम्या

Abhijeet Dipke : अमित शाह असताना जर परदेशातून फंडिंग होत असेल तर हे कसले चाणक्य? अभिजीत दिपकेंचा टोला
अमित शाह असताना जर परदेशातून फंडिंग होत असेल तर हे कसले चाणक्य? अभिजीत दिपकेंचा टोला
Abhijeet Dipke : लाठीचार्ज झाल्यानंतर सगळे संतापले, मी फुटपाथवर रडत बसलो, पण...; 20 जुलैला नेमकं काय झालं? अभिजीत दिपकेंची पुढची भूमिका काय?
लाठीचार्ज झाल्यानंतर सगळे संतापले, मी फुटपाथवर रडत बसलो, पण...; 20 जुलैला नेमकं काय झालं? अभिजीत दिपकेंची पुढची भूमिका काय?
गावाची ओढ लहानपणापासूनच, मला सरपंच व्हायचं होतं पण... अभिजीत दिपकेंनी माझा कट्ट्यावर सांगितला किस्सा
गावाची ओढ लहानपणापासूनच, मला सरपंच व्हायचं होतं पण... अभिजीत दिपकेंनी माझा कट्ट्यावर सांगितला किस्सा
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 2 ऑगस्ट 2026 | रविवार
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 2 ऑगस्ट 2026 | रविवार

व्हिडीओ

Special Report on Palghar : खड्ड्यांत महामार्ग, धोक्यात प्रवास, मनोर-भिवंडी मार्ग मृत्यूचा प्रवास | ABP Majha
Maharashtra Freedom Conversion Act : धर्मांतरावर बंधन, कायद्याचं संरक्षण, विरोधकांचं आक्षेप का?
Dhananjay Munde On Gym : सर्वच क्षेत्रातलं वजन कमी झालंय, मी जिम करतोय
Tukaram Mundhe at Majha Katta | तुकाराम मुंढे कसे घडले?, डॅशिंग अधिकाऱ्याचा बेधडक कट्टा
Nitesh Rane on Sanjay Raut : संजय राऊत 420, अमित शाहांवर टीका करण्याची त्याची लायकी नाही

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Abhijeet Dipke : लाठीचार्ज झाल्यानंतर सगळे संतापले, मी फुटपाथवर रडत बसलो, पण...; 20 जुलैला नेमकं काय झालं? अभिजीत दिपकेंची पुढची भूमिका काय?
लाठीचार्ज झाल्यानंतर सगळे संतापले, मी फुटपाथवर रडत बसलो, पण...; 20 जुलैला नेमकं काय झालं? अभिजीत दिपकेंची पुढची भूमिका काय?
Ajinkya Rahane : निवृत्त झाल्यानंतर अजिंक्य रहाणेला BCCI दरमहा किती पेन्शन देणार? मुंबई क्रिकेट असोसिएशन किती पैसे देणार? 
निवृत्त झाल्यानंतर अजिंक्य रहाणेला BCCI दरमहा किती पेन्शन देणार? मुंबई क्रिकेट असोसिएशन किती पैसे देणार? 
Silver Foil On Sweets : मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत
मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत
PM Modi : आधी मुलीने माफी मागितली, आता आईने मोदींचे आभार मानले, म्हणाली... पंतप्रधानांनी माफ केल्याने मुलीला नवीन जीवन मिळाले
आधी मुलीने माफी मागितली, आता आईने मोदींचे आभार मानले, म्हणाली... पंतप्रधानांनी माफ केल्याने मुलीला नवीन जीवन मिळाले
Abhijeet Dipke: अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?
अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?
केरळ आणि कर्नाटकमध्ये पावसाचे थैमान, भूस्खलनामुळे 11 जणांचा जीव गेला, 8 बेपत्ता; किश्तवारमध्ये ढगफुटीमुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले, बद्रीनाथ महामार्ग तब्बल 20 मीटर खचला
केरळ आणि कर्नाटकमध्ये पावसाचे थैमान, भूस्खलनामुळे 11 जणांचा जीव गेला, 8 बेपत्ता; किश्तवारमध्ये ढगफुटीमुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले, बद्रीनाथ महामार्ग तब्बल 20 मीटर खचला
Bankipur by-election: बिहार पोटनिवडणुकीचा धडकी भरवणारा एक्झिट पोल, भाजपला विद्यार्थी आंदोलनाचा पहिला फटका बसणार, प्रशांत किशोर इतिहास घडवणार?
बिहार पोटनिवडणुकीचा धडकी भरवणारा एक्झिट पोल, भाजपला विद्यार्थी आंदोलनाचा पहिला फटका बसणार, प्रशांत किशोर इतिहास घडवणार?
Devendra Fadnavis: तज्ज्ञांच्या मते किमान 70 टक्के रोजगाराचे स्वरूप येणाऱ्या दिवसात AI मुळे बदलेल; रोजगार जाणार नाही, पण...; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
तज्ज्ञांच्या मते किमान 70 टक्के रोजगाराचे स्वरूप येणाऱ्या दिवसात AI मुळे बदलेल; रोजगार जाणार नाही, पण...; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
Embed widget