एक्स्प्लोर

Nitesh Rane : नितेश राणेंचा फैसला सोमवारी, तोपर्यंत अटकेपासून दिलेला दिलासा कायम

संतोष परब हल्ला प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी पूर्ण झाली असून आमदार नितेश राणेंच्या अटकपूर्व जामीनावर सोमवारी फैसला सुनावण्याचा निर्णय न्यायालयाने घेतला आहे. 

मुंबई : आमदार नितेश राणेंच्या अटकपूर्व जामीनावरील मुंबई उच्च न्यायालयातील सुनावणी पूर्ण झाली असून न्यायालय यासंबंधी सोमवारी फैसला सुनावणार आहे. हा निकाल येईपर्यंत नितेश राणेंना अटकेपासून दिलेला दिलासा कायम ठेवण्यात आला आहे. 

संतोष परब यांच्यावर करण्यात आलेल्या हल्ल्याप्रकरणी हा खटला सुरु आहे. पण विधानसभेचे अधिवेशन सुरु असताना म्यॉव म्यॉव प्रकरण राज्य सरकारला झोंबल्याने आपल्यावर सूडबुद्धीने कारवाई करणयात येत असल्याचा दावा नितेश राणेंच्या वतीनं करण्यात आला. त्यावर संतोष परब हल्ला प्रकरण हे त्या आधीचं असून या दोन घटनांचा कोणताही संदर्भ लागत नसल्याचं राज्य सरकारच्या वतीनं न्यायालयात स्पष्ट करण्यात आलं आहे. आता या प्रकरणाची सुनावणी पूर्ण झाली असून त्यावर न्यायालय सोमवारी आपला निकाल देणार आहे. पण तोपर्यंत आमदार नितेश राणेंना अटकेपासून दिलेला दिलासा कायम ठेवण्यात आला आहे. 

काय आहे प्रकरण? 
सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीच्या रणधुमाळीत सतिश सावंत यांच्या पॅनलचे निवडणूक प्रचारक संतोष परब यांच्यावर जिवघेणा हल्ला झाला होता. हा हल्ला आमदार नितेश राणे यांच्या सांगण्यावरून झाल्याचा आरोप करून तक्रार दाखल करण्यात आली होती. या प्रकरणी पोलिसांनी आयपीसी कलम 307 (हत्येचा प्रयत्न), कलम 120 (बी) (गुन्हेगारी कट रचणे), कलम 34 (समान उद्देश) अंतर्गत गुन्हा दाखल करून आठ जणांना अटक केली आहे. 

या प्रकरणात आपल्याही अटकेची शक्यता निर्माण झाल्याने नितेश राणे आणि संदेश उर्फ गोट्या सावंत यांनी कोर्टाचे दरवाजे ठोठावले आहेत. या अर्जावर दोन दिवस युक्तीवाद झाल्यानंतर जिल्हा सत्र न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश एस. व्ही. हांडे यांनी अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला होता. ज्यात आरोपी तपासात सहकार्य करत नसल्याचा आरोप करत त्यांना ताब्यात घेऊन चौकशीची गरज असल्याचा राज्य सरकारचा दावा सत्र न्यायालयानं स्वीकारला होता. त्या विरोधात नितेश राणेंसह इतरांनी अटकपूर्व जामीनासाठी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

महत्त्वाच्या बातम्या : 

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates: संसदेचं पावसाळी अधिवेशनाचा आज दुसरा आठवडा; गृहमंत्री अमित शाह विरोधकांच्या रडारवर
Maharashtra Live News Updates: संसदेचं पावसाळी अधिवेशनाचा आज दुसरा आठवडा; गृहमंत्री अमित शाह विरोधकांच्या रडारवर
High Court: मोठी बातमी! केवळ भाषिक उल्लेखांमुळे आदिवासी ओळख बदलत नाही; मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा महत्त्वपूर्ण निर्णय
मोठी बातमी! केवळ भाषिक उल्लेखांमुळे आदिवासी ओळख बदलत नाही; मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा महत्त्वपूर्ण निर्णय
E20 Janta Party: E20 जनता पार्टीची स्थापना कोणी केली, प्रमुख मागण्या कोणत्या?; A टू Z माहिती
E20 जनता पार्टीची स्थापना कोणी केली, प्रमुख मागण्या कोणत्या?; A टू Z माहिती
Tukaram Mundhe FDA Action: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईला न्यायालयाचा मोठा झटका, 'त्या' दूध डेअरींवरील कारवाईला स्थगिती; नेमकं काय घडलं?
तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईला न्यायालयाचा मोठा झटका, 'त्या' दूध डेअरींवरील कारवाईला स्थगिती; नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

Devendra Fadnavis & Delhi : दिल्ली दूर... महाराष्ट्र मंजूर! | Special Report ABP Majha
Sanjay Shirsat Meet Abhijeet Dipke Family : शिरसाट-दिपके भेटीमागचा अर्थ काय? | Special Report
Abhijeet Dipke JantarMantar: धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा, दिपके म्हणाले, कॉक्रोचसे पंगा नहीं लेना
Dharmendra Pradhan Resing CJP : झुरळांचा प्रहार, झुकलं सरकार, A to z स्टोरी
Dharmendra Pradhan Resing CJP : झुरळांचा लढा, सरकारला लढा Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पोरांपोरींना रस्त्यावर पाडून सोलून काढल्यानंतर दिल्ली पोलिस आता पीएम मोदींविरोधातील पोस्ट, व्हिडिओ आणि कमेंट्स काढून टाकण्यासाठी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मना नोटीस पाठवणार
पोरांपोरींना रस्त्यावर पाडून सोलून काढल्यानंतर दिल्ली पोलिस आता पीएम मोदींविरोधातील पोस्ट, व्हिडिओ आणि कमेंट्स काढून टाकण्यासाठी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मना नोटीस पाठवणार
High Court: मोठी बातमी! केवळ भाषिक उल्लेखांमुळे आदिवासी ओळख बदलत नाही; मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा महत्त्वपूर्ण निर्णय
मोठी बातमी! केवळ भाषिक उल्लेखांमुळे आदिवासी ओळख बदलत नाही; मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा महत्त्वपूर्ण निर्णय
E20 Janta Party: E20 जनता पार्टीची स्थापना कोणी केली, प्रमुख मागण्या कोणत्या?; A टू Z माहिती
E20 जनता पार्टीची स्थापना कोणी केली, प्रमुख मागण्या कोणत्या?; A टू Z माहिती
Nashik Crime: 13 वर्षीय चिमुकलीवर वारंवार अत्याचार, मानसिक अन् शारीरिक छळाला कंटाळून पीडितेनं जीवन संपवलं; शवविच्छेदनानंतर भयावह सत्य समोर आलं, नराधमास जन्मठेप
13 वर्षीय चिमुकलीवर वारंवार अत्याचार, मानसिक अन् शारीरिक छळाला कंटाळून पीडितेनं जीवन संपवलं; शवविच्छेदनानंतर भयावह सत्य समोर आलं, नराधमास जन्मठेप
Kushal Badrike In Maharashtrachi Hasiyajatra Watch Promo: 'चला हवा येऊ द्या' नंतर कुशल बद्रिके आता 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' गाजवणार; प्रोमो पाहून चाहत्यांची उत्सुकता शिगेला
'चला हवा येऊ द्या' नंतर कुशल बद्रिके आता 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' गाजवणार; प्रोमो पाहून चाहत्यांची उत्सुकता शिगेला
Maharashtra Rain Update: राज्यात आज कुठे यलो, कुठे ऑरेंज अलर्ट, तुमच्या जिल्ह्यात हवामान कसं असेल? जाणून घ्या सविस्तर
राज्यात आज कुठे यलो, कुठे ऑरेंज अलर्ट, तुमच्या जिल्ह्यात हवामान कसं असेल? जाणून घ्या सविस्तर
सेटवरच्या 'टी बॉय'पासून बॉलिवूडच्या दिग्गज दिग्दर्शकापर्यंतचा प्रवास; कित्येक नव्या कलाकारांवर दाखवला विश्वास अन् घडवले कित्येक सुपरस्टार, ओळखलं का कोण?
सेटवरच्या 'टी बॉय'पासून बॉलिवूडच्या दिग्गज दिग्दर्शकापर्यंतचा प्रवास; कित्येक नव्या कलाकारांवर दाखवला विश्वास अन् घडवले कित्येक सुपरस्टार, ओळखलं का कोण?
MPSC Paper Leak: नीटनंतर आता MPSC औषध निरीक्षक भरतीही वादात; पेपरफुटीचे गंभीर आरोप, पुराव्यांसह तक्रार, नेमकं प्रकरण काय?
नीटनंतर आता MPSC औषध निरीक्षक भरतीही वादात; पेपरफुटीचे गंभीर आरोप, पुराव्यांसह तक्रार, नेमकं प्रकरण काय?
Embed widget