एक्स्प्लोर

'गोरगरिबांचे हाल करणाऱ्या लॉकडाऊनचे नावही नको', अजित पवारांचा लॉकडाऊनला विरोध!

सध्या कोरोनाची दुसरी लाट येत असताना पुन्हा राज्यातील काही मंत्री लॉकडाऊन बाबत वक्तव्यं करत असताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मात्र आपल्या शैलीत लॉकडाऊनला विरोध दर्शवला आहे.

पंढरपूर : सध्या कोरोनाची दुसरी लाट येत असताना पुन्हा एकदा राज्याचे मंत्री लॉकडाऊन बाबत वक्तव्यं करत असताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मात्र आपल्या शैलीत लॉकडाऊनला विरोध दर्शवला आहे. 'गोरगरिबांचे हाल करणाऱ्या लॉकडाऊनचे नावही नको' अशा शब्दात त्यांनी आपला विरोध दर्शवला आहे. गेल्या नऊ महिन्यापासून हातावर पोट असलेल्या बारा बलुतेदारांची अवस्था फारच बिकट झाली आहे. रोज काम केले तर त्यांचे घर चालते अशांना लॉकडाऊनचा फटका बसतो. तरीही केंद्र आणि राज्य सरकारने ज्या ज्या वेळी लॉकडाऊन घोषित केले तेव्हा हा सर्व समाज निमूटपणे आदेश पाळत आलाय, असे सांगत कोरोना वाढू नये याची काळजी घेऊयात असे अजित पवार म्हणाले..

तुम्ही कधी आषाढीची पूजा करणार? आषाढीची पूजा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होत असते, तुम्ही कधी आषाढीची पूजा करणार? असं विचारलं असता पांडुरंगाने जे दिलंय त्यात समाधान मानावे आणि पुढे चालावे अशा शब्दात अजित पवारांनी सध्या तरी उपमुख्यमंत्रीपदावरच समाधानी असल्याचे सांगितले. वारकरी संप्रदाय समंजस असून काही मंडळींनी वेगळी भूमिका घेतली असली तरी त्यांच्या भूमिकेस राज्यातील वारकऱ्यांचा पाठिंबा नसल्याचे अजित पवारांनी सांगितले. कोरोनामुळे केंद्र व राज्यात कर जमा होण्याचे प्रमाण खूपच कमी असल्याने दिलेल्या निधीचा योग्य वापर होत नसेल तर कारवाई करावी लागेल असा इशाराही अजित पवारांनी यावेळी दिला.

कोरोनाचे संकट दूर होऊ दे आणि लवकर लस येऊन कोरोना मुक्ती मिळू दे राज्यावरील कोरोनाचे संकट दूर होऊ दे आणि लवकर लस येऊन कोरोना मुक्ती मिळू दे, असं साकडं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विठुरायाला घातलं. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली राज्याची भरभराट होऊ दे, असंही अजित पवारांनी विठुरायाला साकडे घातले आहे. उपमुख्यमंत्र्यांनी सपत्नीक कार्तिकी एकादशीनिमित्त विठ्ठल रुक्मिणीची महापूजा केली.

आषाढी राज्यावर आलेले कोरोनाचे संकट दूर होऊ दे , कोरोनाची लस लवकर उपलब्ध होऊन जगाची यातून सुटका कर असे साकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विठुरायाला घातले . आज पहाटे कार्तिकी एकादशीची शासकीय महापूजा अजित पवार व त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्या हस्ते संपन्न झाली. यावेळी कवडूजी भोईर व कुसुमाबाई भोईर हे मानाचे वारकरी दाम्पत्य महापूजेत सामील झाले होते.

सध्या राज्यातील शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होत आहे , शेतकरीही अडचणीत आलाय अशावेळी लवकरात लवकर कोरोनाची लस आल्यास जगाला व राज्याला दिलासा मिळेल असे अजित पवारांनी महापूजेनंतर बोलताना सांगितले. यावेळी येताना यात्रा अनुदानाचा चेक घेऊन आल्याचे सांगताना आषाढीच्यावेळी दिलेल्या चेकचे पैसे जमा झाले नव्हते ही आमची चूक असल्याने ती आता दुरुस्त केल्याचे अजित पवारांनी सांगितले. वारकऱ्यांच्या नाराजीबाबत अधिकाऱ्यांनी चर्चा केल्यानंतर हा प्रश्न सुटला व चांगला मार्ग निघाल्याचे सांगताना वारकरी नेहमी नियम व कायद्याचे पालन करणारे असल्याची पुष्टीही अजित पवारांनी जोडली .

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Raj Thackeray: 1 खासदार असणारे अजित पवार 42 जागा कसे जिंकू शकतात, राज ठाकरेंनी गणित मांडलं,  विधानसभा निकालाची पिसं काढली!
विधानसभेचा निकाल शॉकिंग, अजित पवार 42 जागा कसे जिंकू शकतात? राज ठाकरेंना संशय
Raj Thackeray : संघाचे लोकही मला म्हणाले, इतना सन्नाटा क्यू है भाई? रोज रात्री निवडून आलेले बायकोला सांगतात चिमटा काढ; राज ठाकरेंकडून निकालाची चिरफाड
संघाचे लोकही मला म्हणाले, इतना सन्नाटा क्यू है भाई? रोज रात्री निवडून आलेले बायकोला सांगतात चिमटा काढ; राज ठाकरेंकडून निकालाची चिरफाड
Devendra Fadnavis : धनंजय मुंडेंचा राजीनामा घेणार का? फडणवीस म्हणाले, अजितदादा जी भूमिका घेतील तीच अधिकृत असेल!
धनंजय मुंडेंचा राजीनामा घेणार का? फडणवीस म्हणाले, अजितदादा जी भूमिका घेतील तीच अधिकृत असेल!
Mumbai : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आदित्य ठाकरे आमनेसामने येणार, वेळ अन् ठिकाण सुद्धा ठरलं! भाजप-शिवसेना अन् काँग्रेसचे आमदार भिडण्याची शक्यता
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आदित्य ठाकरे आमनेसामने येणार, वेळ अन् ठिकाण सुद्धा ठरलं! भाजप-शिवसेना अन् काँग्रेसचे आमदार भिडण्याची शक्यता
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Raj Thackeray Mumbai : 4-5 जागा येतील की नाही असं वाटत असताना अजित पवार 42 जागा मिळाल्या- ठाकरेDevendra Fadanvis PC : Dhananjay Munde यांच्या राजीनाम्याबाबात फडणवीसांचं मोठं वक्तव्यDevendra Fadnavis On Dhananjay Munde : धनंजय मुंडेंबाबत अजितदादांची अधिकृत भूमिका आहे : फडणवीसSpecial Report MNS Raj Thackeray : मनसेच्या मेळाव्यात युतीची घोषणा की स्वबळाची ?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Raj Thackeray: 1 खासदार असणारे अजित पवार 42 जागा कसे जिंकू शकतात, राज ठाकरेंनी गणित मांडलं,  विधानसभा निकालाची पिसं काढली!
विधानसभेचा निकाल शॉकिंग, अजित पवार 42 जागा कसे जिंकू शकतात? राज ठाकरेंना संशय
Raj Thackeray : संघाचे लोकही मला म्हणाले, इतना सन्नाटा क्यू है भाई? रोज रात्री निवडून आलेले बायकोला सांगतात चिमटा काढ; राज ठाकरेंकडून निकालाची चिरफाड
संघाचे लोकही मला म्हणाले, इतना सन्नाटा क्यू है भाई? रोज रात्री निवडून आलेले बायकोला सांगतात चिमटा काढ; राज ठाकरेंकडून निकालाची चिरफाड
Devendra Fadnavis : धनंजय मुंडेंचा राजीनामा घेणार का? फडणवीस म्हणाले, अजितदादा जी भूमिका घेतील तीच अधिकृत असेल!
धनंजय मुंडेंचा राजीनामा घेणार का? फडणवीस म्हणाले, अजितदादा जी भूमिका घेतील तीच अधिकृत असेल!
Mumbai : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आदित्य ठाकरे आमनेसामने येणार, वेळ अन् ठिकाण सुद्धा ठरलं! भाजप-शिवसेना अन् काँग्रेसचे आमदार भिडण्याची शक्यता
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आदित्य ठाकरे आमनेसामने येणार, वेळ अन् ठिकाण सुद्धा ठरलं! भाजप-शिवसेना अन् काँग्रेसचे आमदार भिडण्याची शक्यता
Beed News : बीडमध्ये DPDC बैठकीवेळी धनंजय मुंडेंच्या भावाला पोलिसांनी गेटवरच रोखलं; जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर नेमकं काय घडलं?
बीडमध्ये DPDC बैठकीवेळी धनंजय मुंडेंच्या भावाला पोलिसांनी गेटवरच रोखलं; जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर नेमकं काय घडलं?
Beed Ajit Pawar: बीड जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत अजितदादांच्या बाजूला कोण बसलं, धनंजय मुंडेंना कुठे बसवलं?
बीड डीपीडीसीच्या बैठकीत अजितदादांच्या बाजूला कोण बसलं, धनंजय मुंडेंना कुठे बसवलं?
Param 8000 is India First Supercomputer : आता अमेरिकेच्या एआयला चीनचे चॅलेंज, पण तेव्हा अमेरिकेनं भारताला ठेंगा दाखवताच राजीव गांधी जिद्दीला पेटले; देशाच्या पहिल्या सुपर काॅम्प्युटरची 'परम' कहाणी!
आता अमेरिकेच्या एआयला चीनचे चॅलेंज, पण तेव्हा अमेरिकेनं भारताला ठेंगा दाखवताच राजीव गांधी जिद्दीला पेटले; देशाच्या पहिल्या सुपर काॅम्प्युटरची 'परम' कहाणी!
Ladki Bahin Yojana : ...ज्या महिलांना योजनेचा लाभ गेलाय, त्या कुणाच्याही खात्यातून पैसे घेणार नाही,आदिती तटकरेंनी संभ्रम दूर केला
30 लाख अपात्र लाभार्थ्यांचा आकडा ना मुख्यमंत्री, ना उपमुख्यमंत्री अन् माझ्याकडे, आदिती तटकरे नेमकं काय म्हणाल्या?
Embed widget