एकनाथ शिदेंचा अण्णा हजारेंना फोन, दिवाळीच्या दिल्या शुभेच्छा, राळेगणसिद्धीला एकदा भेट देण्याची विनंती मान्य
दिवाळीच्या शुभमुहूर्तावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी जेष्ठ समाजसेवक पद्मभूषण अण्णा हजारे यांच्याशी व्हिडिओ कॉलद्वारे संवाद साधला.
Eknath Shinde : दिवाळीच्या शुभमुहूर्तावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी जेष्ठ समाजसेवक पद्मभूषण अण्णा हजारे ( Anna Hazare) यांच्याशी व्हिडिओ कॉलद्वारे संवाद साधला. त्यांना दिवाळी आणि नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी अण्णांनी एकदा राळेगणसिद्धीला भेट देण्याची विनंती एकनाथ शिंदे यांना केली. या विनंतीला मान देऊन लवकरच राळेगणसिद्धीला येऊन आपल्याला समक्ष भेटू असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
लवकरच राळेगणसिद्धीला भेट देण्याचा एकनाथ शिदेंनी दिला शब्द
दिवाळीच्या निमित्ताने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विशेष कार्य अधिकारी मंगेश चिवटे यांनी राळेगणसिद्धी येथे जाऊन ज्येष्ठ समाजसेवक पद्मभूषण अण्णा हजारे यांची भेट घेत त्यांचे आशीर्वाद घेतले. यावेळी मंगेश चिवटे यांनी उपमुख्यमंत्री शिंदे आणि अण्णा हजारे यांचे व्हिडिओ कॉलद्वारे बोलणे करून दिले. यावेळी या दोघांनी एकमेकांशी संवाद साधला. यावेळी अण्णा आणि राळेगणसिद्धीमधील ग्रामस्थांनी उपमुख्यमंत्री शिंदे यांना एकदा राळेगणसिद्धी गावाला भेट देण्याची आग्रहाची विनंती केली. गावकऱ्यांच्या विनंतीला मान देत उपमुख्यमंत्री शिंदे यांनी लवकरच राळेगणसिद्धीला भेट देण्याचा शब्द दिला.
नेमकं काय म्हणाले एकनाथ शिंदे?
देशभरात मोठ्या उत्साहात दिवाळीचा सण साजरा केला जात आहे. या सणा निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन देखील करण्यात आलं आहे. दरम्यान, राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या दिवाळीच्या निमित्ताने ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्याशी फोनवरुन संवाद साधत त्यांना आज दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विशेष कार्य अधिकारी मंगेश चिवटे हे राळेगणसिद्धीत गेले होते. यावेळी त्यांनी एकनाथ शिंदे यांचे अण्णा हजारे यांच्याशी बोलणे करुन दिले. यावेळी अण्णांनी तुम्ही कसे आहात? असे एकनाथ शिंदेंना विचारले. यावेळी एकनाथ शिंदे म्हणाले की, तुमच्या आशिर्वादाने मी बरा आहे. जेवढं चांगलं काम करता येईल तेवढं करायचं. चांगलं करायलाच आपल्याला देवाने पाठवलं आहे. जेवढं आपल्या हातून गोर गरीबांचं चांगलं होईल तेवढा प्रयत्न करायचा असे एकनाथ शिंदे म्हणाले. यावेळी अण्णा हजारे यांनी देखील एकनाथ शिंदे यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. तुमंच आरोग्य, तब्बेत चांगली राहू द्या, तुमचे मार्गदर्शन महाराष्ट्राला कायम राहू द्या असे एकनाथ शिंदे अण्णा हजारेंना म्हणाले.
महत्वाच्या बातम्या:
Anna Hazare: पुण्यातील बॅनरवरुन अण्णा हजारेंची नाराजी; म्हणाले, मी 90 वर्षांचा, देशातील तरुणाईला चांगलंच खडसावलं



















