एक्स्प्लोर

'उद्धव ठाकरे आमचे नेते; त्यांना आम्ही कुठलंही प्रत्युत्तर देणार नाही' : दीपक केसरकर 

Deepak Kesarkar On Shiv Sena Uddhav Thackeray :उद्धव ठाकरे यांच्याबद्दल आम्हाला नेहमीच आदर आहे. नाती जपण्यात जी गोडी आहे ती राजकारणात नाही, असं शिवसेनेचे बंडखोर आमदार दीपक केसरकर यांनी म्हटलं आहे.

Deepak Kesarkar PC : उद्धव ठाकरे यांच्या वक्तव्याला आम्ही उत्तर देणार नाही. त्यांच्या वक्तव्यांवर उत्तर द्यायचं की नाही याबाबत एकनाथ शिंदे हे निर्णय घेतील. त्यांनी सांगितल्यानंतरच उत्तर देऊ. उद्धव ठाकरे आमचे नेते आहेत. त्यांच्याबद्दल आम्हाला नेहमीच आदर आहे. नाती जपण्यात जी गोडी आहे ती राजकारणात नाही, असं शिवसेनेचे बंडखोर आमदार दीपक केसरकर यांनी म्हटलं आहे. गोव्यात त्यांनी पत्रकारांशी आज संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते. केसरकर पुढे म्हणाले की, आम्ही कोणतंही सेलिब्रेशन करणार नाहीत. विधानसभेत बहुमत मिळाल्यानंतरही आम्ही सेलिब्रेशन करणार नाहीत, असं केसरकर म्हणाले. आमचे उद्धव ठाकरे नेते आहेत. त्यांच्यासोबत भावना जोडलेल्या आहेत. उद्धव ठाकरे यांना राष्ट्रवादी काँग्रेस आणि राष्ट्रीय काँग्रेस जवळचे वाटत असतील तर हा भ्रम कधीतरी दूर होईल, असंही केसरकर म्हणाले. 

एकनाथ शिंदे यांना पक्षातून काढून टाकल्याबाबत विचारलं असता केसरकर म्हणाले की, शिंदेंविरोधात केलेली कारवाई शिवसेनेला शोभणारी नाही, ही कारवाई लोकशाहीला शोभणारी नाही. याबाबत त्यांना रीतसर उत्तर पाठवण्यात येईल, असंही केसरकर म्हणाले. एकनाथ शिंदे यांना नेते पदावरून हटवल्याचं पाठवलेलं पत्र बेकायदशीर आहे. यावर कायदेशीर उत्तर देऊ.  त्यांनी ऐकलं नाही तर पुढील भूमिका घेऊ.  सभागृहाच्या नेत्याचा अपमान होतो तेव्हा हक्कभंग येतो. इतकं हे पद महत्वाचं आहे, असं केसरकर यांनी यावेळी म्हटलं. 
 
आमचा लढा महाराष्ट्राच्या विकासासाठी असणार आहे. फडणवीसांच्या कॅबिनेटमध्ये येण्यानं मजबुती मिळाली आहे. भाजप आणि शिवसेनेची मनं जुळणं गरजेचं आहे. एकनाथ शिंदे आता राज्याचे कुटुंबप्रमुख आहेत, त्यांच्या नेतृत्वात राज्याचा विकास नक्की करु, आत्महत्या मुक्त महाराष्ट्रचा संकल्प आम्ही घेतलाय, असंही ते म्हणाले.

शिवसेनेच्या स्वाक्षरी मोहिमेवर बोलताना केसरकर म्हणाले की, 20 रुपयांचा वडापाव खाणाऱ्यांना 100 रुपयांचं प्रतिज्ञापत्र का? पक्षात राहण्यासाठी प्रतिज्ञापत्र नव्हे तर प्रेमाचं बंधन हवं, शिवबंधन हेच प्रेमाचं बंधन आहे, असं केसरकर म्हणाले. आम्ही शिवबंधन आज सुद्धा घालतो. शिवबंधन बाळासाहेब ठाकरे यांची आठवण म्हणून घालतो. आम्ही खरे सैनिक आहोत.  आम्ही सर्व कार्यकर्त्याना सांगू इच्छितो असे अॅफिडेबिट केल्यानंतर काहीही होत नाही, असंही केसरकरांनी सांगितलं. 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

अशोक मामांच्या 'साडे माडे तीन'चा पुन्हा कल्ला, टीझर रिलीज; सैराट फेम अभिनेत्री दिसणार प्रमुख भूमिकेत
अशोक मामांच्या 'साडे माडे तीन'चा पुन्हा कल्ला, टीझर रिलीज; सैराट फेम अभिनेत्री दिसणार प्रमुख भूमिकेत
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 जानेवारी 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 जानेवारी 2026 | सोमवार
आठवडा झाला तरी 'एबी फॉर्म' सापडेना, अपक्ष उमेदवार राष्ट्रवादीचा कसा झाला? पिंपरीतील आयुक्तांनी दिलं उत्तर
आठवडा झाला तरी 'एबी फॉर्म' सापडेना, अपक्ष उमेदवार राष्ट्रवादीचा कसा झाला? पिंपरीतील आयुक्तांनी दिलं उत्तर
Pune NCP : अजितदादांच्या राष्ट्रवादीचे पुण्यातील कार्यालय बळकावलेल्या जागेवर, 300 कोटींच्या व्यवहाराशी पार्थ पवारांचा थेट संबंध; विजय कुंभार यांचा दावा
अजितदादांच्या राष्ट्रवादीचे पुण्यातील कार्यालय बळकावलेल्या जागेवर, 300 कोटींच्या व्यवहाराशी पार्थ पवारांचा थेट संबंध; विजय कुंभार यांचा दावा

व्हिडीओ

CM Devendra Fadnavis Parbhani : लाडक्या बहणींना लखपती बनवणार, देवाभाऊची मोठी घोषणा
Aaditya Thackeray Mumbai : आदित्य ठाकरे यांची भाजपवर सडकून टीका
Kishori Pednekar Mumbai : 'भाजप आणि सेनेने धमक्या दिल्या नाहीत आजूबाजूला चाय कम किटली गरम असता'
Amit Thackeray Solapur : अमित ठाकरेंकडून बाळासाहेब सरवदेयांच्या कुटुंबियांचं सांत्वन
Gulabrao Patil Jalgaon : मला सर्वांसोबत आय लव यू करावं लागतं गुलाबराव पाटलांची तुफान फटकेबाजी

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अशोक मामांच्या 'साडे माडे तीन'चा पुन्हा कल्ला, टीझर रिलीज; सैराट फेम अभिनेत्री दिसणार प्रमुख भूमिकेत
अशोक मामांच्या 'साडे माडे तीन'चा पुन्हा कल्ला, टीझर रिलीज; सैराट फेम अभिनेत्री दिसणार प्रमुख भूमिकेत
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 जानेवारी 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 जानेवारी 2026 | सोमवार
आठवडा झाला तरी 'एबी फॉर्म' सापडेना, अपक्ष उमेदवार राष्ट्रवादीचा कसा झाला? पिंपरीतील आयुक्तांनी दिलं उत्तर
आठवडा झाला तरी 'एबी फॉर्म' सापडेना, अपक्ष उमेदवार राष्ट्रवादीचा कसा झाला? पिंपरीतील आयुक्तांनी दिलं उत्तर
Pune NCP : अजितदादांच्या राष्ट्रवादीचे पुण्यातील कार्यालय बळकावलेल्या जागेवर, 300 कोटींच्या व्यवहाराशी पार्थ पवारांचा थेट संबंध; विजय कुंभार यांचा दावा
अजितदादांच्या राष्ट्रवादीचे पुण्यातील कार्यालय बळकावलेल्या जागेवर, 300 कोटींच्या व्यवहाराशी पार्थ पवारांचा थेट संबंध; विजय कुंभार यांचा दावा
शिवशाही बस अन् दुचाकीचा भीषण अपघात; तीन युवक जागीच ठार, हायवेवर मोठी गर्दी
शिवशाही बस अन् दुचाकीचा भीषण अपघात; तीन युवक जागीच ठार, हायवेवर मोठी गर्दी
माझी तब्येत ठीक, शुगर वाढली होती; नारायण राणेंनी दिली माहिती, राजकीय निवृत्तीबाबतही स्पष्टच सांगितलं
माझी तब्येत ठीक, शुगर वाढली होती; नारायण राणेंनी दिली माहिती, राजकीय निवृत्तीबाबतही स्पष्टच सांगितलं
Nashik Municipal Election 2026 : नाशिक महानगरपालिका: प्रभाग निहाय पक्षीय उमेदवारांची 'अशी' होणार लढत, उमेदवारांची यादी एका क्लिकवर
नाशिक महानगरपालिका: प्रभाग निहाय पक्षीय उमेदवारांची 'अशी' होणार लढत, उमेदवारांची यादी एका क्लिकवर
Tanaji Sawant : तुळजाभवानीच्या भक्तांना आता प्रसाद म्हणून ड्रग्जची पुडी दिली जाईल; तानाजी सावंत यांचा भाजपवर घणाघात
तुळजाभवानीच्या भक्तांना आता प्रसाद म्हणून ड्रग्जची पुडी दिली जाईल; तानाजी सावंत यांचा भाजपवर घणाघात
Embed widget