एक्स्प्लोर

याला म्हणतात वन्यप्रेमी! राज्यप्राणी 'शेकरू'साठी स्वतःची खाजगी जागा राखीव म्हणून घोषित

महाराष्ट्राचा राज्य प्राणी असलेल्या शेकरूला तळकोकणातील वन्यप्राणी प्रेमीने स्वतःची 8 एकर जागा "शेकरु राखीव क्षेत्र" म्हणून आरक्षित केली आहे.

सिंधुदुर्ग : स्वतःची खाजगी जागा प्राण्यांसाठी राखीव ठेवल्याचं तुम्ही कधी ऐकलंय का? नाही ना? मग आम्ही तुम्हाला अशाच एका प्राणीप्रेमी अवलियाची माहिती सांगणार आहे. ज्यांनी महाराष्ट्राचा राज्य प्राणी असलेल्या 'शेकरू'साठी स्वतःची खाजगी जागा राखीव ठेवली आहे.

व्यवसायाने मानसोपचारतज्ज्ञ असलेले डॉ. रुपेश पाटकर असे या प्राणीप्रेमीचं नाव आहे. ते सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बांदा गावातील गवळीटेंब येथील आहेत. पाटकर यांनी स्वतःची लागवडीखाली असलेली खाजगी जागा महाराष्ट्राचा राज्य प्राणी असलेल्या 'शेकरू'साठी राखीव ठेवली आहे. त्याच कारणही तसंच आहे. गावातील शिकाऱ्यांपासून शेकरूच्या रक्षणासाठी त्यांनी हे पाऊल उचलले आहे. शिकाऱ्यांना समज देत डॉक्टरांनी आपल्या जागेभोवती 'शेकरू राखीव क्षेत्रा'चा चक्क फलकच लावला आहे.

..म्हणून स्वतःची खाजगी जागा राखीव ठेवण्याचा निर्णय सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महाराष्ट्र आणि गोव्याच्या सीमेवर असलेलं बांदा हे छोटेसे गाव. या गावातील गवळीटेंब येथे डॉ. रुपेश पाटकर राहतात. व्यवसायाने ते मानसोपचारतज्ज्ञ आहेत. गोव्यामध्ये कार्यरत असलेले डॉ. पाटकर सकाळी गोव्याला जाऊन संध्याकाळी पुन्हा महाराष्ट्रात परतात. गवळीटेंबमध्येच त्यांची 8 एकरावर नारळाची बागायती आहे. या बागायतीमध्ये गेल्या पंधरा वर्षांपेक्षा जास्त काळ शेकरूचा अधिवास आहे. शेकरूच्या दोन ते तीन जोड्या या बागयतीमध्ये गुण्यागोविंदाने नांदतात. या आठ एकराच्या बागायतीला डॉ. पाटकरांनी आता 'शेकरू राखीव क्षेत्र' म्हणून आरक्षित केले आहे. लोक आपल्या बागेत आलेल्या शेकरूला मारतात किंवा त्याची शिकार करतात. त्यामुळे शेकरू प्राणी दुर्मिळ होत चाललाय. शेकरू मोठ्या प्रमाणात नारळाची शहाळी खातात. त्यामुळे नारळाच्या बागेत शेकरू आल्यास लोक त्याची शिकारी करतात. त्यामुळे डॉ. पाटकर यांनी पुढाकार घेऊन शेकरूसाठी स्वतःची खाजगी जागा राखीव ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai Crime : शिक्षक की हैवान... अल्पवयीन मुलीला पाहून शिक्षक वर्गात शिरला, दरवाजा बंद केला अन्...; मुंबईत खळबळ
शिक्षक की हैवान... अल्पवयीन मुलीला पाहून शिक्षक वर्गात शिरला, दरवाजा बंद केला अन्...; मुंबईत खळबळ
Ajmer Dargah : अजमेर दर्ग्यात पीएम मोदी चादर चढवणार; दर्ग्याचे वेब पोर्टल अन् यात्रेकरूंसाठी 'गरीब नवाज' ॲपही लॉन्च केलं जाणार
अजमेर दर्ग्यात पीएम मोदी चादर चढवणार; दर्ग्याचे वेब पोर्टल अन् यात्रेकरूंसाठी 'गरीब नवाज' ॲपही लॉन्च केलं जाणार
Guardian Ministers List : उत्तर महाराष्ट्रातील मंत्र्यांना कुठल्या जिल्ह्याचं पालकमंत्रिपद मिळणार? समोर आली संभाव्य यादी
उत्तर महाराष्ट्रातील मंत्र्यांना कुठल्या जिल्ह्याचं पालकमंत्रिपद मिळणार? समोर आली संभाव्य यादी
Human Metapneumovirus Virus : चीनमध्ये पुन्हा एकदा कोरोनासारख्या व्हायरसचा उद्रेक; भारतात येण्याचा धोका आहे का? केंद्र सरकारने कोणती माहिती दिली??
चीनमध्ये पुन्हा एकदा कोरोनासारख्या व्हायरसचा उद्रेक; भारतात येण्याचा धोका आहे का? केंद्र सरकारने कोणती माहिती दिली??
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Beed Sarpanch santosh Deshmukh Case : बीड सरपंच प्रकरणात 3 जणांना अटक; A to Z Updates माझावरBeed Santosh Deshmukh Case : बीड प्रकरणी आरोपींवर सक्त कारवाई झाली पाहिजे : Anjali DamaniaSuresh Dhas On Beed Santosh Deshmukh Case : Sudarshan Ghule हा केवळ प्यादं! मुख्य आरोपी 'आका' आहे : Suresh DhasBeed Santosh Deshmukh Case : बीड हत्या प्रकरणी मुख्य आरोपी सुदर्शन घुलेसह सुधीर सांगळे ताब्यात

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Crime : शिक्षक की हैवान... अल्पवयीन मुलीला पाहून शिक्षक वर्गात शिरला, दरवाजा बंद केला अन्...; मुंबईत खळबळ
शिक्षक की हैवान... अल्पवयीन मुलीला पाहून शिक्षक वर्गात शिरला, दरवाजा बंद केला अन्...; मुंबईत खळबळ
Ajmer Dargah : अजमेर दर्ग्यात पीएम मोदी चादर चढवणार; दर्ग्याचे वेब पोर्टल अन् यात्रेकरूंसाठी 'गरीब नवाज' ॲपही लॉन्च केलं जाणार
अजमेर दर्ग्यात पीएम मोदी चादर चढवणार; दर्ग्याचे वेब पोर्टल अन् यात्रेकरूंसाठी 'गरीब नवाज' ॲपही लॉन्च केलं जाणार
Guardian Ministers List : उत्तर महाराष्ट्रातील मंत्र्यांना कुठल्या जिल्ह्याचं पालकमंत्रिपद मिळणार? समोर आली संभाव्य यादी
उत्तर महाराष्ट्रातील मंत्र्यांना कुठल्या जिल्ह्याचं पालकमंत्रिपद मिळणार? समोर आली संभाव्य यादी
Human Metapneumovirus Virus : चीनमध्ये पुन्हा एकदा कोरोनासारख्या व्हायरसचा उद्रेक; भारतात येण्याचा धोका आहे का? केंद्र सरकारने कोणती माहिती दिली??
चीनमध्ये पुन्हा एकदा कोरोनासारख्या व्हायरसचा उद्रेक; भारतात येण्याचा धोका आहे का? केंद्र सरकारने कोणती माहिती दिली??
Ind vs Aus 5th Test : सेनापती जायबंदी, मैदान सोडले, पण मावळ्यांनी कामगिरी फत्ते केली; ऑस्ट्रेलियाच्या शेपटाला वळवळण्याची संधीच दिली नाही!
सेनापती जायबंदी, मैदान सोडले, पण मावळ्यांनी कामगिरी फत्ते केली; ऑस्ट्रेलियाच्या शेपटाला वळवळण्याची संधीच दिली नाही!
अजित पवार दोन जिल्ह्याचे पालकत्व घेणार! वादात सापडलेल्या धनंजय मुंडेंचाही जिल्हा ठरला; पालकमंत्र्यांची संभाव्य यादी समोर
अजित पवार दोन जिल्ह्याचे पालकत्व घेणार! वादात सापडलेल्या धनंजय मुंडेंचाही जिल्हा ठरला; पालकमंत्र्यांची संभाव्य यादी समोर
कोहली आऊट झाल्यावर... ; नाना पाटेकरांच्या वक्तव्यानं सोशल मीडियावर खळबळ, पण नेटकरी करतायत मीम्स व्हायरल
कोहली आऊट झाल्यावर... ; नाना पाटेकरांच्या वक्तव्यानं सोशल मीडियात खळबळ, पण नेटकरी करतायत मीम्स व्हायरल
Las Vegas Tesla Truck Blast Case : नाताळच्या दुसऱ्या दिवशी भांडण अन् सहा दिवसांपूर्वी बायकोशी घटस्फोट! अमेरिकन जवानाने राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या हाॅटेलसमोर ब्लास्ट केला!
नाताळच्या दुसऱ्या दिवशी भांडण अन् सहा दिवसांपूर्वी बायकोशी घटस्फोट! अमेरिकन जवानाने राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या हाॅटेलसमोर ब्लास्ट केला!
Embed widget