एक्स्प्लोर
गुरु आणि शिष्याच्या नात्याला काळिमा, पंढरपुरात शिक्षकांकडून मूकबधिर मुलींचे लैंगिक शोषण
ज्या मुलींना दैवाने मूकबधिर केले, ज्यांना आपली व्यथा देखील सांगता येत नाही अशा मुलींवर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न करणाऱ्या या नराधम शिक्षकांना कठोर शासन करण्याची मागणी सर्वस्तरातून केली जात आहे.
पंढरपूर : गुरु आणि शिष्याच्या नात्याला काळिमा फासणारी धक्कादायक घटना पंढरपुरात घडली आहे. पंढरपुरात निवासी मूकबधिर शाळेतील चार मुलींचा लैंगिक छळ त्याच शाळेतील शिक्षकांनी केल्याचं उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. पंढरपूर उपविभागीय पोलिसांच्या दामिनी पथकाने शाळेतील मुलींशी चर्चा करण्यासाठी भेट दिली असता हा प्रकार समोर आला.
पोलिसांच्या दामिनी पथकाला या मूकबधिर मुलींनी खाणाखुणा करुन शिक्षकांकडून चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला जात असल्याची तक्रार केली. यानंतर पोलिसांनी दुसऱ्या दिवशी मूकबधिर व्यक्तींची भाषा कळणाऱ्या विशेष शिक्षिकेला बोलावून या मुलींचा जबाब नोंदवून घेतला असता हा धक्कादायक प्रकार समोर आला.
जबाब नोंदवून घेतल्यानंतर पोलिसांनी तातडीने या शाळेतील ज्ञानोबा म्हस्के, अर्जुन सातपुते , संतोष कुलाल आणि सिद्धेश्वर वाघमोडे या चार शिक्षकांना अटक केली. त्यानंतर त्यांना न्यायालयासमोर उभे करण्यात आले. न्यायालयाने या चौघांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे .
ज्या मुलींना दैवाने मूकबधिर केले, ज्यांना आपली व्यथा देखील सांगता येत नाही अशा मुलींवर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न करणाऱ्या या नराधम शिक्षकांना कठोर शासन करण्याची मागणी सर्वस्तरातून केली जात आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
कोल्हापूर
महाराष्ट्र
विश्व
व्यापार-उद्योग
Advertisement