एक्स्प्लोर
सदाभाऊ खोतांच्या मुलाच्या प्रचारगाडीला अपघात, दोन्ही सुनांसह 9 जखमी
सांगली : पणन राज्यमंत्री आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांच्या मुलाच्या प्रचाराच्या गाडीला अपघात झाला आहे. अपघातात खोत यांच्या दोन्ही सुना आणि काही महिला जखमी झाल्या आहेत.
सदाभाऊ खोत यांचा मुलगा सागरच्या प्रचारासाठी गाड्या निघाल्या होत्या. त्यावेळी इस्लामपूर-आष्टा रोडवर तवेरा गाडीला अपघात झाला. गाडीमध्ये सदाभाऊ खोत यांच्या दोन्ही सुना आणि कुटुंबातील महिला होत्या. इंजिनमध्ये बिघाड झाल्याने अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे.
एकूण 9 जण अपघातात जखमी झाले असून त्यांना इस्लामपूरच्या हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलं आहे. रविवारी सकाळी 10.30-11 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. सदाभाऊ खोत यांचे सुपुत्र सागर खोत हे सांगलीत जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी रिंगणात उतरले आहेत.
संबंधित बातम्या :
नागपुरात सेना उमेदवाराच्या प्रचाराच्या गाडीने 7 जणांना चिरडले!
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement