एक्स्प्लोर
धुळ्यात पालकमंत्र्यांसमोर पोलिस उपअधीक्षकांची कार्यकर्त्यांना मारहाण
धुळे : एकीकडे दलित नागरिकांना होत असलेल्या मारहाणीबाबत पंतप्रधान, राष्ट्रपती चिंता व्यक्त करत असताना स्वातंत्र्यदिनीच दलित कार्यकर्त्यांना पालकमंत्र्यांच्या समक्ष मारहाण झाल्याची घटना धुळे शहरात घडली आहे.
कधी-काळी शिवसेनेचे कार्यकर्ते राहिलेल्या दलित तरुणांना बेदम मारहाण आणि अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केल्याचा आरोप होत आहे. या प्रकरणी पोलीस उपविभागीय अधिकारी हिंमतराव जाधव यांच्याविरोधात तक्रार करण्यात आली आहे.
शिवसेनेचे पदाधिकारी विशाल देसले यांनी मारहाण केल्याची तक्रार महिन्याभरापूर्वी काही दलित तरुणांनी दिली होती. शिवसेना पक्ष सोडत असल्याच्या कारणातून चक्क पोलिस ठाण्यातच विशाल देसलेनं मारहाण केल्याचा आरोप या तक्रारीत करण्यात आला होता.
विशाले देसलेवर कारवाई व्हावी, यासाठी काल या तरुणांनी पालकमंत्री दादा भुसे यांची गाडी अडवण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी उपविभागीय पोलीस अधिकारी हिंमतराव जाधव यांनी बेदम मारहाण करत अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केल्याचा आरोप संबंधित कार्यकर्त्यांनी केला आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement