Dahihandi Pune : दहीहंडी जल्लोषाला गालबोट; कुठे धारदार शस्त्राने वार तर कुठे हाणामारी...
पुण्यातील विविध परिसरात मोठ्या उत्साहात दहीहंडी पार पडली, मात्र काही ठिकाणी दहीहंडी उत्सवाला गालबोल लागलं आहे. कुठे हाणामारी झाली तर कुठे धारदार शस्त्राने वार करण्यात आले आहेत.
पुणे : पुण्यातील विविध परिसरात मोठ्या उत्साहात (Dahihandi Pune) दहीहंडी पार पडली मात्र काही ठिकाणी दहीहंडी उत्सवाला गालबोल लागलं. दहीहंडी पाहत असताना धक्का लागल्याच्या कारणावरून झालेल्या वादातून एका तरुणावर धारदार शस्त्राने वार करण्यात आले आहे. यात एक तरुण जखमी झाला आहे. ही घटना सिंहगड कॉलेज कॅम्पसमध्ये असलेल्या एमबीएन कॉलेज समोरील सार्वजनिक रस्त्यावर घडली. या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
दहीहंडी पाहत असताना धक्का लागल्याने हा सगळा प्रकार घडला. प्रवीण लोंढे असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी ध्रुव विश्वास लंकेश्वर याने तक्रार दिली आहे. सिंहगड कॉलेज कॅम्पसमध्ये असलेल्या एनबीएन कॉलेज समोरील सार्वजनिक रस्त्यावर दहीहंडी पाहण्यासाठी गेले होते. त्यानंतर ध्रुव आणि त्याचा मित्र सुजल दहीहंडी उत्सवाचा कार्यक्रम संपल्यानंतर घरी निघाले होते. या दरम्यान रस्त्याने चालत असताना धक्का लागला आणि शिवीगाळ करून मारहाण करायला सुरुवात केली. आरोपीने मारहाण करत थेट धारदार शस्त्राने ध्रुव याच्या बरगडीवर वार करून जखमी केलं आहे.
आप्पा बळवंत चौकात हाणामारी
दहीहंडी फुटल्यानंतर दोन गटात वाद होऊन हाणामारी झाली. यानंतर तातडीनं पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी जमावाला सावरलं. हा वाद ढोल ताशा पथकाचे कार्यकर्ते आणि मंडळाचे कार्यकर्ते यांच्यात वाद झाला होता. सुरुवातीला ढोल ताशा पथकाच्या वादकांनी मंडळाच्या एका कार्यकर्त्याला बेदम मारलं. मात्र तिथे उपस्थित असलेल्या काही पोलिसांनी मध्यस्थी करत त्या कार्यकर्त्याला तिथून बाजूला काढलं. मात्र त्यानंतर मंडळाचे कार्यकर्तेदेखील आले आणि त्यांनीदेखील मारहाण करायला सुरुवात झाली. या सगळ्या प्रकारामुळे काही वेळ गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं. या प्रकारामुळे दहीहंडी उत्सवाला गालबोटदेखील लागलं होतं.
पुण्यात विविध ठिकाणी राडे...
पुण्यात प्रत्येक चौकात दहीहंडी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला मात्र याच उत्सावाला अनेक ठिकाणी गालबोटदेखील लागलं. अनेक ठिकाणी मुलींची छेड काढल्या गेली तर अनेक ठिकाणी क्षुल्लक कारणांवरुन तरुण भिडले. त्यासोबतच काही प्रमाणत दहीहंडी फोडायला आलेल्या गोविंदा पथकातील तरुणांनादेखील किरकोळ जखमा झाल्या आहेत. मात्र सात्री 10 वाजण्यापूर्वी शहरातील सगळ्या दहीहंड्या फोडण्यात आल्या होत्या. शहरात मोठा पोलीस बंदोबस्तदेखील तैनात होता.
इतर महत्वाच्या बातम्या :