![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Cyrus Mistry Death : सायरस मिस्त्री यांच्या अपघातानंतर माजी सहकारी योगेश जोशी म्हणाले...
Cyrus Mistry Death : सायरस मिस्त्री यांचे अपघाती निधन म्हणजे माझ्यासाठी हा मोठा धक्का असल्याचे त्यांचे माजी सहकारी योगेश जोशी यांनी म्हटले आहे. योगेश जोशी हे टाटा ग्रृपचे जनसंपर्क अधिकारी होते.
![Cyrus Mistry Death : सायरस मिस्त्री यांच्या अपघातानंतर माजी सहकारी योगेश जोशी म्हणाले... Cyrus Mistry Death Cyrus Mistry former colleague Yogesh Joshi shared his memories Cyrus Mistry Death : सायरस मिस्त्री यांच्या अपघातानंतर माजी सहकारी योगेश जोशी म्हणाले...](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/09/04/5b8997af5da70ab2d050ad5d8648be621662300022909328_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Cyrus Mistry Death : उद्योगपती सायरस मिस्त्री यांचे आज अपघाती निधन झाले आहे. सायरस मिस्त्री (Cyrus Mistry ) यांच्या अपघाती निधनानंतर सर्वच स्तरातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. त्यांचे माजी सहकारी योगेश जोशी (yogesh joshi) यांनी माझ्यासाठी हा मोठा धक्का असल्याचे म्हटले आहे. योगेश जोशी यांनी सायरस मिस्त्री (Cyrus Mistry ) यांच्यासोबत काम केले आहे. जोशी हे टाटा ग्रृपचे (tara group) जनसंपर्क अधिकारी (Public Relations Officer) असताना सायरस मिस्त्री यांच्यासोबत अनेक वेळा सहवास लाभल्याचे जोशी यांनी सांगितले.
“ही अत्यंत धक्कादायक बातमी आहे. ते टाटा ग्रुपचे चेअरमन असताना मी त्यांच्यासोबत काम केलं होतं. बॉम्बे हाऊसमध्ये त्यांनी पहिल्यांदा प्रवेश केला तेव्हा त्यांचं स्वागत करण्यासाठी मीच होतो. त्या चार वर्षांच्या कार्यकाळात बराचसा सहवास मला लाभला. बोर्ड बैठकीच्या दृष्टीने अनेकदा त्यांच्यासोबत भेट व्हायची. सेंट्रल बँकेचे चेअरमन टंकसाळे यांची भेट त्यांनी नाकारली होती, तेव्हा आपले बँकेसोबत पूर्वापार संबंध असून त्यांना भेट नाकारत नाही असं सांगितलं होतं. त्यांनी ते लगेच ऐकून घेतलं होतं आणि भेटण्यासाठी होकार दिला होता,” अशी आठवण योगेश जोशी यांनी सांगितली.
सायरस मिस्त्री (Cyrus Mistry ) यांचा आज दुपारी सव्वा तीन वाजण्याच्या दरम्यान पालघर (Palghar) येथे अपघात झाला. अपघात झाल्यानंतर सायरस मिस्त्री (Cyrus Mistry ) यांचा जागीच मृत्यू झाला आहे. सायरस मिस्त्री हे 2013 ते 2016 या दरम्यान टाटा उद्योग समूहाच्या अध्यक्षपदी होते. आज दुपारी सव्वातीन वाजल्याच्या सुमारास अहमदाबादवरुन ते मुंबईला येत होते. त्यावेळी हा अपघात झाल्याची माहिती आहे. मर्सिडिस गाडीतून ते प्रवास करत होते. डिव्हायडला गाडी धडकल्यामुळे हा अपघात झाल्याची माहिती पालघर पोलीस अधीक्षकांनी दिली आहे. या अपघाताच्या चौकशीचे आदेश राज्य सरकारकडून देण्यात आले आहेत.
अपघात झाल्यानंतर दोघांचा जागीच मृत्यू झाला तर इतर दोघांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. जखमी झालेल्या दोघांवर रूग्णालयात उपचार सुरू आहेत.
महत्वाच्या बातम्या
Cyrus Mistry passed away : सायरस मिस्त्रींच्या निधनावर सर्व स्तरातून प्रतिक्रिया; पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री शिंदेंही हळहळले
Cyrus Mistry : कार अपघातात सायरस मिस्त्री यांचं निधन, उपमुख्यमंत्री फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)