एक्स्प्लोर

Cyrus Mistry : कार अपघातात सायरस मिस्त्री यांचं निधन, उपमुख्यमंत्री फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश

Cyrus Mistry: प्रसिद्ध उद्योगपती सायरस मिस्त्री यांचं कार अपघातात निधन झालं आहे. 

Cyrus Mistry: प्रसिद्ध उद्योगपती सायरस मिस्त्री यांचं कार अपघातात निधन झालं आहे. पालघर येथे त्यांच्या कारचा अपघातात झाला. या अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला असल्याची माहिती पालघर जिल्हा अधीक्षकांनी दिली. यानंतर आता राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याप्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी ट्वीट करत चौकशीचे आदेश दिले आहेत. ते म्हणाले की, 'प्रख्यात उद्योगपती सायरस मिस्त्री यांच्या निधनाने उद्योग आणि आर्थिक जगताची मोठी हानी झाली आहे. भारताची आर्थिक शक्ती ओळखणारे, एक उमदे असे ते व्यक्तिमत्व होते. विनम्रता हा त्यांचा स्थायीभाव होता. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबियांच्या, आप्तस्वकियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. ॐ शांति ! पालघरनजिक झालेल्या या दुर्दैवी अपघाताबाबत माहिती घेतली असून राज्याच्या पोलिस महासंचालकांना या अपघाताची सखोल चौकशी करण्यास सांगितले आहे.'

कर्तबगार, भविष्यवेधी उद्योजकाच्या जाण्याने हानी: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

सायरस मिस्त्री यांना श्रद्धांजली वाहताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, 'टाटा सन्सचे माजी प्रमुख सायरस मिस्त्री यांच्या निधनाचे वृत्त ऐकून धक्का बसला. ते केवळ एक यशस्वी उद्योजक नव्हते तर उद्योग विश्वातील एक तरुण, उमदे आणि भविष्यवेधी व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात होते. एक कर्तबगार उद्योजक आपल्यातून गेला आहे. ही केवळ मिस्त्री कुटुंबियांची नव्हे तर देशातील उद्योग विश्वाची मोठी हानी आहे. सायरस मिस्त्री यांना भावपूर्ण श्रद्धांजली.'

दरम्यान, आज दुपारी सव्वातीन वाजल्याच्या सुमारास अहमदाबातवरुन ते मुंबईला येत होते. त्यावेळी हा अपघात झाल्याची माहिती आहे. मर्सिडिस गाडीतून ते प्रवास करत होते. डिव्हायडला गाडी धडकल्यामुळे हा अपघात झाल्याची माहिती पालघर पोलीस अधीक्षकांनी दिली आहे. यातच आता इतके मोठे उद्योगपती असूनही अहमदाबाद ते मुंबई 523 किमीचा प्रवास रस्त्याने का करत होते. त्यांच्याकडे स्वतःचे खासगी विमान असूनही त्यांनी रस्त्याने प्रवास करायचा निर्णय का घेतला असावा, हे आणि असे अनेक प्रश्न आता सोशल मीडियावर विचारले जाऊ लागले आहेत.  

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

SSC Result 2026 Exam: दहावीचा निकाल झटपट पाहण्यासाठी कोणत्या वेबसाईटचा वापर कराल? SMS वर रिझल्ट कसा मिळवाल?
दहावीचा निकाल झटपट पाहण्यासाठी कोणत्या वेबसाईटचा वापर कराल? SMS वर रिझल्ट कसा मिळवाल?
कलिंगड खाल्ल्यानंतर मृत्यूचा संशय, असं उलगडल चौघांच्या निधनाचं रहस्य; कलिना एफएसएलच्या प्रयत्नांना मोठ यश
कलिंगड खाल्ल्यानंतर मृत्यूचा संशय, असं उलगडल चौघांच्या निधनाचं रहस्य; कलिना एफएसएलच्या प्रयत्नांना मोठ यश
तामिळनाडूचे राज्यपाल भाजपचे एजंट; विजयचा मुख्यमंत्री शपथविधी लांबणीवर, ज्येष्ठ विधिज्ञ कपिल सिब्बल यांचा संताप
तामिळनाडूचे राज्यपाल भाजपचे एजंट; विजयचा मुख्यमंत्री शपथविधी लांबणीवर, ज्येष्ठ विधिज्ञ कपिल सिब्बल यांचा संताप
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 मे 2026 | गुरुवार
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 मे 2026 | गुरुवार

व्हिडीओ

Tamil Nadu Politics : जुळत नाही आकडा, तामिळनाडूचा तिढा Special Report
Mumbai Fish Market : मासळी बाजारातला राजकीय गोंगाट, भलतीच अफवा! Special Report
Eknath Shinde Breaking : एकनाथ शिंदेंच्या हेलिकॉप्टरला वादळाचा फटका, मोठी दुर्घटना टळली
Sushma Andhare Pune : अदिती तटकरेंनी महिला बालकल्याण मंत्री म्हणून काय केलं? म्हणाल्या, झेपत नसेल तर राजीनामा द्या; सुषमा अंधारेंनी सुनावलं
Ambadas Danve PC : तोडफोड, मारहाण, मुडदे पडत असतील तर तृणमूलने एखाद्याचा मुडदा पाडला ते नैसर्गिक आहे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
SSC Result 2026 Exam: दहावीचा निकाल झटपट पाहण्यासाठी कोणत्या वेबसाईटचा वापर कराल? SMS वर रिझल्ट कसा मिळवाल?
दहावीचा निकाल झटपट पाहण्यासाठी कोणत्या वेबसाईटचा वापर कराल? SMS वर रिझल्ट कसा मिळवाल?
SSC Exam Result 2026 : दहावीच्या लाखो विद्यार्थ्यांची प्रतीक्षा आज संपणार! राज्य मंडळाकडून दुपारी 1 वाजता निकाल जाहीर होणार;  वाचा A टू Z माहिती
दहावीच्या लाखो विद्यार्थ्यांची प्रतीक्षा आज संपणार! राज्य मंडळाकडून दुपारी 1 वाजता निकाल जाहीर होणार; वाचा A टू Z माहिती
घराजवळील स्कॉर्पिओ चोरताना नगरसेवक धावले; चोरट्यांनी चक्क अंगावर घातली कार, सीसीटीव्हीत थरार
घराजवळील स्कॉर्पिओ चोरताना नगरसेवक धावले; चोरट्यांनी चक्क अंगावर घातली कार, सीसीटीव्हीत थरार
Surya Kumar Yadav : 'सूर्या'च्या घरी अवतरली परी; सूर्यकुमार यादवला कन्यारत्न, कर्णधाराने दिली गुडन्यूज, IPL खेळणार की नाही? 
टीम इंडियाचा टी 20 कॅप्टन सूर्यकुमार यादवच्या घरी अवतरली परी, पत्नी देविशानं दिला लेकीला जन्म 
कलिंगड खाल्ल्यानंतर मृत्यूचा संशय, असं उलगडल चौघांच्या निधनाचं रहस्य; कलिना एफएसएलच्या प्रयत्नांना मोठ यश
कलिंगड खाल्ल्यानंतर मृत्यूचा संशय, असं उलगडल चौघांच्या निधनाचं रहस्य; कलिना एफएसएलच्या प्रयत्नांना मोठ यश
Rohit Pawar: जय पवार म्हणाले, 2029 मध्ये सुनेत्रा वहिनी मुख्यमंत्री; रोहित पवारांची पहिली प्रतिक्रिया, आधी भाजपला...
जय पवार म्हणाले, 2029 मध्ये सुनेत्रा वहिनी मुख्यमंत्री; रोहित पवारांची पहिली प्रतिक्रिया, आधी भाजपला...
West Bengal : धगधगतं बंगाल! हत्या, गोळीबारानंतर आता हावडामध्ये बॉम्ब फोडला, भाजपचे दोन कार्यकर्ते जखमी
धगधगतं बंगाल! हत्या, गोळीबारानंतर आता हावडामध्ये बॉम्ब फोडला, भाजपचे दोन कार्यकर्ते जखमी
SSC Exam Result 2026 : दहावीचा निकाल उद्या दुपारी 1 वाजता जाहीर होणार, निकाल कुठे पाहणार, वेबसाईटची संपूर्ण यादी एका क्लिकवर
दहावीचा निकाल उद्या जाहीर होणार, निकाल कुठे पाहणार, वेबसाईटची संपूर्ण यादी एका क्लिकवर
Embed widget