एक्स्प्लोर
सायरस मिस्त्री शनी शिंगणापूरला पूजेसाठी दाखल

अहमदनगर : टाटा सन्सच्या अध्यक्षपदावरुन हकालपट्टी झाल्यानंतर सायरस मिस्त्री शनी शिंगणापूरला शनीच्या दर्शनासाठी दाखल झाले आहेत. हकालपट्टी झाल्यानंतर गेल्या काही दिवसात मिस्त्री वेगवेगळ्या बाबींमुळे चर्चेत राहिले आहेत. आज शनी शिंगणापूरला दाखल झाल्यावर सायरस मिस्त्रींनी शनीला अभिषेक घालून पूजा केली आहे. सोबतच त्यांनी शिर्डीला जाऊन साईबाबांचं दर्शनही घेतलं आहे. सध्याच्या टाटा गृपच्या चेअरमन पदावरील हकालपट्टीच्या पार्श्वभूमीवर दर्शन घेतल्याची चर्चा सुरु झाली आहे. तसंच साडेसातीतून सुटकेसाठी शनीला साकडे घातल्याचंही बोललं जात आहे. दरम्यान टाटा सन्सच्या अध्यक्षपदावरुन हकालपट्टी झाल्यानंतर काल त्यांना टाटा स्टीलच्या अध्यक्षपदावरुन काढून टाकण्यात आलं आहे. टाटा स्टीलकडून काल त्यासंबंधी अधिकृतपणे घोषणा करण्यात आली आहे.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
व्यापार-उद्योग
निवडणूक
राजकारण






















