एक्स्प्लोर

सायकलपटूंचा सांगली ते कन्याकुमारी प्रवास; 'SAY NO TO PLASTIC' आणि 'सायकल चालवा फिट रहा' संदेश

सांगलीतील कर्नाळ गावातील जिगरबाज सायकलपटूंनी सांगली ते कन्याकुमारी हा प्रवास सायकलवरून दहा दिवसात पूर्ण केला आहे. दहा दिवसात 1360 किलोमीटर सायकल प्रवास करत 'SAY NO TO PLASTIC' आणि सायकल चालवा फिट रहा हा संदेश या प्रवासाच्या माध्यमातून या सायकलपटूंनी दिला आहे.

सांगली : सांगलीतील कर्नाळ गावातील जिगरबाज सायकलपटूंनी सांगली ते कन्याकुमारी हा प्रवास सायकलवरून दहा दिवसात पूर्ण केला आहे. दहा दिवसात 1360 किलोमीटर सायकल प्रवास करत 'SAY NO TO PLASTIC' आणि सायकल चालवा फिट रहा हा संदेश या प्रवासाच्या माध्यमातून या सायकलपटूंनी दिला आहे. 1 नोव्हेंबर रोजी सांगलीतून या सायकल प्रवासाला सुरुवात झाली होती. सर्व सायकलपटूंचे नुकतेच सांगलीच आगमन झाले यावेळी कर्नाळा या त्यांच्या गावी जंगी स्वागत करण्यात आले. कर्नाळ ते कन्याकुमारी सायकल प्रवास करत गेलेले कर्नाळचे पाच जिगरबाज शनिवारी सकाळी गावात दाखल झाले. त्यांच्या गावतील ग्रामस्थांनी जंगी स्वागत केले. ढोलताशे हलगीच्या वादनात व फटाक्यांची आतषबाजी करत तसेच त्यांच्या स्वागतासाठी रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. गावातील महिलांनी औक्षण करीत या सर्वांचे स्वागत केले. 1360 किमीचा सायकल प्रवास यशस्वी केल्याने या सर्वांचे कौतुक करण्यात आले. सायकलपटूंचा सांगली ते कन्याकुमारी  प्रवास; 'SAY NO TO PLASTIC' आणि 'सायकल चालवा फिट रहा' संदेश 'SAY NO TO PLASTIC' व 'सायकल चालवा फिट रहा' हा संदेश घेऊन कर्नाळ येथील रावसाहेब मोहीते वय वर्षे 59, संदेश कदम वय वर्षे 54, अमोल पाटील वय वर्षे 34, राजू पाटील वय वर्षे 44 आणि यांना बॅकअप मॅन म्हणून प्रभाकर आंबोळे वय वर्षे 61 यांनी हा प्रवास एक नोव्हेंबर रोजी सकाळी 6 वाजता कर्नाळ येथील ग्रामदैवत हनुमानाचे दर्शन घेऊन सुरु केला होता. दररोज 130 ते 150 किमी सायकल प्रवास करत महारास्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू या तीन राज्यांत प्रवास करत हा टप्पा पार केला. 9 मुक्काम करत दहाव्या दिवशी सकाळी 11 वाजता 1360 किमी प्रवास पूर्ण केला. या प्रवासा दरम्यान सांगली जिल्ह्यातील कर्नाटक व तामिळनाडू येथील व्यावसायिक यांनी या पाच जणांचे स्वागतही केले होते. हा प्रवास यशस्वी करुन हे जिगरबाज शनिवार कर्नाळ येथे आले, यावेळी त्यांचे गावात जल्लोषपूर्ण वातावरणात जोरदार स्वागत करण्यात आले. यावेळी त्यांची जीप मधून मिरवणूक काढण्यात आली. यावेळी तरुणांसह महिला पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते. या यशस्वी प्रवासाबद्दल हनुमान मंदीर येथे या सर्वांचा ग्रामस्थांनी सत्कार केला. हा सायकल प्रवास यशस्वीरित्या पूर्ण केल्याने या ग्रुप ने भविष्यात याहीपेक्षा जास्त अंतराची सायकल मोहीम करताना आलेले आपले अनुभव शेअर केले.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sarpanch Viral Video : सरपंच साहेब गर्लफ्रेंडसोबत 'लाँग ड्राईव्ह'वर, बायकोनं थेट चौकात पकडलं अन् गर्लफ्रेंडच्या झिंज्या धरुन रस्त्यावर फोडून काढलं!
Video : सरपंच साहेब गर्लफ्रेंडसोबत 'लाँग ड्राईव्ह'वर, बायकोनं थेट चौकात पकडलं अन् गर्लफ्रेंडच्या झिंज्या धरुन रस्त्यावर फोडून काढलं!
Priyanka Gandhi In Kolhapur : प्रियांका गांधी प्रथमच कोल्हापुरात अन् जुना सहकारी दिसताच विमानतळावर ताफा अचानक जागेवर थांबला! बोलवून केली विचारपूस
प्रियांका गांधी प्रथमच कोल्हापुरात अन् जुना सहकारी दिसताच विमानतळावर ताफा अचानक जागेवर थांबला! बोलवून केली विचारपूस
हौसेने चप्पल चिन्ह घेतलं, आता आचारसंहितेच्या कचाट्यात, मतदानाला चप्पल घालून येण्यास बंदी
हौसेने चप्पल चिन्ह घेतलं, आता आचारसंहितेच्या कचाट्यात, मतदानाला चप्पल घालून येण्यास बंदी
Eknath Shinde Exclusive : भाजप वापरून फेकून देते, ठाकरेंच्या 'त्या' वक्तव्यावर एकनाथ शिंदेंचा पलटवार, म्हणाले 'उद्धव ठाकरे पण तेच...'
भाजप वापरून फेकून देते, ठाकरेंच्या 'त्या' वक्तव्यावर एकनाथ शिंदेंचा पलटवार, म्हणाले 'उद्धव ठाकरे पण तेच...'
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sharad Pawar Bag Checking Baramati : बारामतीत शरद पवारांच्या बॅगची तपासणीNagpur Congress :भाजपच्या तक्रारीनंतर निवडणूक अधिकाऱ्यांनी काढले प्रियंका गांधींचे होर्डींग्जCM Eknath Shinde : माहीमचा गोंधळ ते मुख्यमंत्रीपद..एकनाथ शिंदेंची स्फोटक मुलाखत!TOP 80 : सकाळच्या 8 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 17 नोव्हेंबर  2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sarpanch Viral Video : सरपंच साहेब गर्लफ्रेंडसोबत 'लाँग ड्राईव्ह'वर, बायकोनं थेट चौकात पकडलं अन् गर्लफ्रेंडच्या झिंज्या धरुन रस्त्यावर फोडून काढलं!
Video : सरपंच साहेब गर्लफ्रेंडसोबत 'लाँग ड्राईव्ह'वर, बायकोनं थेट चौकात पकडलं अन् गर्लफ्रेंडच्या झिंज्या धरुन रस्त्यावर फोडून काढलं!
Priyanka Gandhi In Kolhapur : प्रियांका गांधी प्रथमच कोल्हापुरात अन् जुना सहकारी दिसताच विमानतळावर ताफा अचानक जागेवर थांबला! बोलवून केली विचारपूस
प्रियांका गांधी प्रथमच कोल्हापुरात अन् जुना सहकारी दिसताच विमानतळावर ताफा अचानक जागेवर थांबला! बोलवून केली विचारपूस
हौसेने चप्पल चिन्ह घेतलं, आता आचारसंहितेच्या कचाट्यात, मतदानाला चप्पल घालून येण्यास बंदी
हौसेने चप्पल चिन्ह घेतलं, आता आचारसंहितेच्या कचाट्यात, मतदानाला चप्पल घालून येण्यास बंदी
Eknath Shinde Exclusive : भाजप वापरून फेकून देते, ठाकरेंच्या 'त्या' वक्तव्यावर एकनाथ शिंदेंचा पलटवार, म्हणाले 'उद्धव ठाकरे पण तेच...'
भाजप वापरून फेकून देते, ठाकरेंच्या 'त्या' वक्तव्यावर एकनाथ शिंदेंचा पलटवार, म्हणाले 'उद्धव ठाकरे पण तेच...'
Ajit Pawar: अजितदादा पुन्हा भावनिक, म्हणाले, 'बारामतीला माझ्या कामाची किंमत नाही, कॅनलचं पाणी बंद झाल्यावर माझी आठवण येईल'
शरद पवारांनी सांगितलं, आता पुढच्याला संधी द्या; अजितदादा म्हणाले, बाकीच्यांनी गोट्या खेळायच्या का?
Benjamin Netanyahu : इस्रायल पीएम नेतान्याहूंच्या घरावर महिन्याभरात दुसऱ्यांदा बाॅम्ब हल्ला; दारात आगीचे गोळे पडले
Video : इस्रायल पीएम नेतान्याहूंच्या घरावर महिन्याभरात दुसऱ्यांदा बाॅम्ब हल्ला; दारात आगीचे गोळे पडले
Navneet Rana: अमरावतीत नवनीत राणांच्या सभेत जोरदार राडा, राणांच्या अंगावर खुर्च्या भिरकावल्या, 40 जणांवर गुन्हे दाखल
अमरावतीत नवनीत राणांच्या सभेत जोरदार राडा, राणांच्या अंगावर खुर्च्या भिरकावल्या, 40 जणांवर गुन्हे दाखल
Kalicharan Maharaj : जो हिंदू हिताबाबत बोलेल, त्यालाच मतदान करा, कालीचरण महाराजांचं मोठं वक्तव्य; म्हणाले, हिंदू धर्मगुरूंनीही...
जो हिंदू हिताबाबत बोलेल, त्यालाच मतदान करा, कालीचरण महाराजांचं मोठं वक्तव्य; म्हणाले, हिंदू धर्मगुरूंनीही...
×
Embed widget