एक्स्प्लोर
कोण म्हणतंय करिअर संपलं, तेजस्विनीने पुन्हा सोनं जिंकलं!
तेजस्विनी आज 37 वर्षांची आहे. त्यामुळं अनेकांनी... झालं संपली हिचं करिअर म्हणून तिला निकालात काढलं होतं. पण त्याच तेजस्विनीने पिक्चर अभी बाकी है म्हणत सर्वांना सोनेरी कामगिरीने उत्तर दिलं.
सिडनी: ऑस्ट्रेलियातील गोल्ड कोस्टमध्ये कोल्हापूरच्या तेजस्विनी सावंतने गोल्डन कामगिरी केली. तेजस्विनी सावंतने राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत 50 मीटर रायफल थ्री पोझिशन्स प्रकारात सुवर्णपदक पटकवालं.
तेजस्विनीने वयाच्या 37 व्या वर्षी आपला फॉर्म आणि परफॉर्मन्स कायम ठेवत, जगाला आपली चमक दाखवून दिली. तेजस्विनीने 457.9 गुणांची कमाई करत नवीन गेम रेकॉर्ड नोंदवला.
तेजस्विनी सावंतनं कालच महिलांच्या 50 मीटर्स रायफल प्रोन नेमबाजीत 618.9 गुणांची नोंद करून भारताला रौप्यपदकाची कमाई करून दिली होती.
त्यानंतर तेजस्विनीने आज त्यापुढे मजल मारत सोनं टिपलं.
तेजस्विनीनं वयाच्या ३७व्या वर्षी... संसार आणि नेमबाजी अशा दुहेरी कसरतीचं आव्हान पेलून हे यश खेचून आणलं.
तेजस्विनीची चमकदार कारकीर्द
तेजस्विनी सावंतच्या आजवरच्या कारकीर्दीवर नजर टाकली तर तेजस्विनीनं 2006 आणि 2010 सालच्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमध्ये दोन सुवर्ण, दोन रौप्य आणि एका कांस्यपदकाची लूट केली होती. 2009 साली म्युनिचच्या विश्वचषकात ती 50 मीटर्स रायफल थ्री पोझिशनच्या कांस्यपदकाची मानकरी ठरली होती. मग 2010 साली ती म्युनिचमध्येच 50 मीटर्स रायफल प्रोन नेमबाजीची वर्ल्ड चॅम्पियन झाली.
अर्जुन पुरस्काराची मानकरी
तेजस्विनी सावंतची 2006 ते 2010 या चार वर्षांमधली आंतरराष्ट्रीय कामगिरी खरोखरच कमालीची आहे. याच कामगिरीनं तिला 2011 साली केंद्र शासनाचा अर्जुन पुरस्कारही मिळवून दिला. त्यामुळं खरं तर यंदाच्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत तेजस्विनीनं मिळवलेल्या रुपेरी त्यानंतर सोनेरी यशाचं प्रथमदर्शनी आश्चर्य वाटणार नाही. पण तेजस्विनीचं आठ वर्षांनी वाढलेलं वय आणि तिची वैवाहिक जीवनातली वाढती व्यस्तता लक्षात घेतली, तर तिच्या कामगिरीला शाबासकी ही द्यावीच लागेल. तेजस्विनी आज 37 वर्षांची आहे. त्यामुळं अनेकांनी... झालं संपली हिचं करिअर म्हणून तिला निकालात काढलं होतं.
लग्नानंतरही यशाची परंपरा
तेजस्विनीच्या आई सुनीता सावंत यांना आपल्या लेकीच्या कॉमनवेल्थ गेम्समधल्या पदकांची तशी सवय जुनी आहे. पण तेजस्विनीनं लग्नानंतरही यशाची परंपरा कायम राखली म्हणून त्यांना जास्त अभिमान आहे.
कोल्हापूरच्या मातीने सोनं दिलं
तेजस्विनी सावंत ही मूळची कोल्हापूरची. कोल्हापूरच्या मातीत नेमबाजीचं बीज रोवलं ते जयसिंगराव कुसाळे यांनी. तेजस्विनीनंही नेमबाजीची बाराखडी त्यांच्याकडेच गिरवली. तसंच तेजस्विनीला या खेळात करीअर करण्यासाठी तिच्या आईनं नेहमीच प्रोत्साहन दिलं.
तेजस्विनीनं लग्नानंतरही नेमबाजीतल्या करीअरमध्ये खंड पडू दिला नाही, याचं सारं श्रेय तिचंच असल्याचं तिचे पती समीर दरेकर सांगतात.
तेजस्विनीच्या यशात सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांतदादा पाटील आणि प्रशिक्षक कुहेली गांगुलीचा वाटा असल्याचं तिचे कुटुंबीय विनयानं नमूद करतात.
कोल्हापूरनं या देशाला एक तेजस्विनी सावंत दिली. पण या देशाला आज एक नाही, तर अनेक तेजस्विनींची गरज आहे. त्या पार्श्वभूमीवर, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सुरू केलेली बेटी बचाओ बेटी पढाओ ही योजना स्त्री भ्रूण हत्या रोखण्याच्या आणि शैक्षणिक आघाडीवर स्त्रियांना समान हक्क मिळवून देण्याच्या दृष्टीनं देशात महत्त्वाची भूमिका बजावत आहे. त्याच वेळी
तेजस्विनी सावंत, मधुरिका पाटकर, पूजा सहस्रबुद्धे आणि हीना सिद्धू या विवाहित मुलींनी गोल्ड कोस्टच्या भूमीवर मिळवलेलं यशही देशाची मानसिकता बदलण्यासाठी नक्कीच लाभदायक ठरणार आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
महाराष्ट्र
Advertisement