शेतकऱ्यांना कर्ज न देणाऱ्या बँकांवर फौजदारी गुन्हे दाखल होणार : गृहमंत्री अनिल देशमुख
कोरोना संकट काळात आणि पेरणीसाठी शेतकऱ्यांना पीक कर्जाची आवश्यकता आहे. शेतकऱ्यांना पीक कर्ज देण्यासाठी टाळाटाळ करणाऱ्या बँकांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचा इशारा गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिला आहे.
![शेतकऱ्यांना कर्ज न देणाऱ्या बँकांवर फौजदारी गुन्हे दाखल होणार : गृहमंत्री अनिल देशमुख Criminal cases will be filed against banks that do not provide loans to farmers says Anil Deshmukh शेतकऱ्यांना कर्ज न देणाऱ्या बँकांवर फौजदारी गुन्हे दाखल होणार : गृहमंत्री अनिल देशमुख](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2020/05/12220830/Anil-Deshmukh1.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : सध्या शेतकऱ्यांचा पेरणीचा काळ आहे. यासाठी त्यांना पीक कर्जाची आवश्यकता असताना अनेक राष्ट्रीयकृत बँका या शेतकऱ्यांना कर्ज देण्यासाठी टाळाटाळ करत असल्याची बाब समोर येत आहे. ही अतिशय गंभीर बाब असून ज्या बँका शेतकऱ्यांना पीक कर्ज देणार नाहीत, त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येतील, असा गंभीर इशारा राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिला आहे.
शेतकऱ्यांना सुलभतेने कर्ज मिळावे यासाठी राज्य शासन आग्रही आहे. यासाठी राज्य शासनाच्यावतीने देखील विशेष आदेश निर्गमित करण्यात आले आहेत. असं असतानाही अनेक राष्ट्रीयकृत बँका या शेतकऱ्यांना पीक कर्ज देण्यासाठी टाळाटाळ करत असल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहेत, ही अतिशय गंभीर बाब आहे, असं अनिल देशमुख यांनी म्हटलं.
ज्या बँका पीक कर्ज देत नाही त्यांना वारंवार सूचना सुद्धा करण्यात येत आहे. शेतकऱ्यांना पीक कर्ज देण्यासाठी टाळाटाळ करीत आहेत, अशा बँकांची तक्रार जिल्हाधिकारी यांनी दिली तर अडचणीच्या काळात शेतकऱ्यांची पिळवणूक करणाऱ्या बँकांवर कडक कारवाई करण्यात येईल, अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)