एक्स्प्लोर

Crime News : धक्कादायक...कुत्र्याने मटण खाल्ले म्हणून पित्यानेच झाडली पोटच्या मुलीवर गोळी

Crime News : जेवणासाठी असलेले मटण कुत्र्याने खाल्ल्याने वडिलाने आपल्या पोटच्या मुलीवर गोळी झाडली. यात मुलीचा दुर्देवी मृत्यू झाला.

Crime News : जेवणासाठी केलेल्या मटणावर कुत्र्यानेच ताव मारल्याने झालेल्या वादात एका वडिलाने आपल्या पोटच्या मुलीचा जीव घेतला. (Father Killed Daughter) आरोपी वडिलाने गोळी झाडून विवाहित मुलीची हत्या केली.  आरोपी घटनेच्या वेळी नशेत असल्याचे म्हटले जात आहे. आरोपी वडील फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहे. ही धक्कादायक घटना तुळजापूर तालुक्यातील कार्ला येथे घडली.

ही दुर्देवी घटना रविवारी सायंकाळी घडली आहे. वीस वर्षीय मृत काजल शिंदे ही तिच्या माहेरी पतीसह राहत होती. रविवारी जेवणासाठी घरात मटण आणून काजलने रस्सा केला होता. मटणाचा रस्सा झाल्यानंतर ती घरात इतर कामे करत होती. त्याच वेळी एका कुत्र्याने  जेवणासाठी तयार केलेले हे मटण खाल्ले. हा प्रकार काजलची आई मीराने पाहिल्यानंतर तिने याचा जाब विचारण्यास सुरुवात केली. त्यातून दोघींमध्ये मोठी वादावादी झाली. या दरम्यान दारूच्या नशेत असलेले काजलचे वडील गणेश भोसले यांनी खुंटीवर टांगून ठेवलेल्या गावठी बंदुकीतून काजलवर गोळी झाली. 

वडिलांनी झाडलेली गोळी काजलच्या छातीत लागल्याने ती गंभीर जखमी झाली. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या काजलला तिच्या नातेवाईकांनी तिला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. या प्रकरणी नळदुर्ग पोलीस ठाण्यात गोळीबारात मृत्यू झालेल्या काजलचे पती मनोज सुनील शिंदे यांनी तक्रार नोंदवली. या तक्रारीनंतर गणेश भोसले व आई मीरा भोसले यांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. घटना घडल्यानंतर आरोपी गणेश भोसले फरार झाला आहे. तर, आई मीरा भोसले हिला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत. 

लग्नासाठी मुलगी देण्यास नकार दिल्याने भाच्याने मामाला संपवलं

लग्नासाठी मुलगी देण्यास नकार दिल्याने भाच्याने मामाची निर्दयीपणे हत्या केली. नांदेड (Nanded) जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यात चाभरा गावात ही वेदनादायक घटना घडली. पोलिसांनी मारेकरी भाच्याला अटक केली. नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यातील चाभरा गावात 10 सप्टेंबर रोजी खुनाची घटना घडली होती. ज्यात घराबाहेर ओसरीत गाढ झोपेत असलेल्या बालाजी दिगंबर काकडे या इसमाचा अज्ञात व्यक्तीने झोपेत डोक्यात कुऱ्हाड घालून निर्घृण खून केला होता. दरम्यान ही घटना चोरांनी केली की कुणी घातपात केला, याचा उलगडा करण्याचा मोठा यक्षप्रश्न पोलिसांपुढे होता. दरम्यान पाच दिवसाच्या तपासाअंती, बालाजी काकडे यांचा खून हा त्यांचा भाचा बंडू याने डोक्यावर कुऱ्हाडीने वार करुन केल्याचे निष्पन्न झाले 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी, खोटं वृत्त; राष्ट्रवादीच पोलीस आयुक्तांकडे तक्रार
मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी, खोटं वृत्त; राष्ट्रवादीच पोलीस आयुक्तांकडे तक्रार
Ajit Pawar: अजित पवारांनी घेतली प्रकाश आंबेडकरांची भेट; कारणही सांगितलं, नेमकं काय म्हणाले?
अजित पवारांनी घेतली प्रकाश आंबेडकरांची भेट; कारणही सांगितलं, नेमकं काय म्हणाले?
मोठं घबाड जप्त, साडे तीन कोटींसह ATM व्हॅन पोलिसांच्या ताब्यात; पैशांच्या भरलेल्या बॅगा ठाण्यात
मोठं घबाड जप्त, साडे तीन कोटींसह ATM व्हॅन पोलिसांच्या ताब्यात; पैशांच्या भरलेल्या बॅगा ठाण्यात
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

TOP 25 | टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा एका क्लिकवर सुपरफास्ट ABP Majha 07 PmVidhan Sabha Super Fast | विधानसभा निवडणुकीच्या बातम्या सुपरफास्ट एका क्लिकवरAjit Pawar Malik Rally | सना मलिक, नवाब मलिकांच्या रॅलीत अजित पवारांची हजेरीABP Majha Marathi News Headlines 06 PM TOP Headlines 06 PM 07 November 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी, खोटं वृत्त; राष्ट्रवादीच पोलीस आयुक्तांकडे तक्रार
मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी, खोटं वृत्त; राष्ट्रवादीच पोलीस आयुक्तांकडे तक्रार
Ajit Pawar: अजित पवारांनी घेतली प्रकाश आंबेडकरांची भेट; कारणही सांगितलं, नेमकं काय म्हणाले?
अजित पवारांनी घेतली प्रकाश आंबेडकरांची भेट; कारणही सांगितलं, नेमकं काय म्हणाले?
मोठं घबाड जप्त, साडे तीन कोटींसह ATM व्हॅन पोलिसांच्या ताब्यात; पैशांच्या भरलेल्या बॅगा ठाण्यात
मोठं घबाड जप्त, साडे तीन कोटींसह ATM व्हॅन पोलिसांच्या ताब्यात; पैशांच्या भरलेल्या बॅगा ठाण्यात
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
Supreme Court on Government JOB : भरतीचे नियम मध्येच बदलता येणार नाहीत, सरकारी नोकऱ्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
भरतीचे नियम मध्येच बदलता येणार नाहीत, सरकारी नोकऱ्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
Maharashtra Assembly Elections 2024 : विधानसभेची खडाजंगी : नाशिक पूर्व मतदारसंघात थेट लढत, ढिकले की गीते? कोण मारणार बाजी?
विधानसभेची खडाजंगी : नाशिक पूर्व मतदारसंघात थेट लढत, ढिकले की गीते? कोण मारणार बाजी?
मोठी बातमी! दाऊद इब्राहिम अन् लॉरेन्स बिश्नोईच्या फोटोंचे टी-शर्ट; फ्लिपकार्टसह विक्रेत्यांवर गुन्हा दाखल
मोठी बातमी! दाऊद इब्राहिम अन् लॉरेन्स बिश्नोईच्या फोटोंचे टी-शर्ट; फ्लिपकार्टसह विक्रेत्यांवर गुन्हा दाखल
Supreme Court on POCSO : 'पाॅस्को' केस परस्पर सामंजस्याने मिटवता येणार नाही, सर्वोच्च न्यायालयाकडून उच्च न्यायालयाचा निर्णय रद्द
'पाॅस्को' केस परस्पर सामंजस्याने मिटवता येणार नाही, सर्वोच्च न्यायालयाकडून उच्च न्यायालयाचा निर्णय रद्द
Embed widget